Home » Author Archive
सकारात्मक नकारात्मक म्हणजे नेमके काय?

सकारात्मक नकारात्मक म्हणजे नेमके काय?

Author : पंचनामा : भाऊ तोरसेकर मंत्रालयाला आग लागली, त्यानंतर चौथ्याच दिवशी पुन्हा मंत्रालयातील काम चालू झाले; असा दावा बांधकाममंत्री छगनराव भुजबळ यांनी केला होता. तेवढेच नाहीतर आगीवर प्रश्न विचारण्यापेक्षा काम सुरू झाले, त्याकडे सकारात्मक (पॉझिटिव्ह) नजरेने बघायला शिका, असा सल्ला भुजबळांनी प्रश्न विचारणार्‍या पत्रकारांना कॅमेरा समोरच दिला होता. जे काही काम...
पाकिस्तानचा दावा खोटा कसा मानावा

पाकिस्तानचा दावा खोटा कसा मानावा

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर मुंबईवरील हल्ल्यात ४० भारतीयांचा सहभाग होता असा पाकचा दावा होता. गेवराई, उदगीर होटगी अशा छोट्या गावांतून अतिरेकी तयार झाल्यावर हा दावा खोटा कसा मानायचा. दाऊद इब्राहिम, अबु सालेम, अफझल गुरू आणि आता अबु जिंदाल हे पाकिस्तानी होते का भारतीय. एखाद्या गुन्ह्यातील आरोपी सापडल्यावर पोलीस त्याच्याकडून कबुली...
मेहदी हसन : अबके हम बिछडे

मेहदी हसन : अबके हम बिछडे

Author : •अमर पुराणिक• आषाढातल्या मेघांसारखा घनगंभीर खर्जातला आवाज, विरहाच्या करूण भावनांच्या धारदार ताना, हृदय हेलावणारं आशयघन गमक अंग, ऐकणार्‍या रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत काळीज चिरणारी आकारयुक्त आलापी आणि शायरांच्या शायरीचे रागांच्या चौकटीतून आपल्यासमोर स्पष्ट चित्र उभे करणारे महान गजल सम्राट मेहदी हसन यांच्या गायकीचा महिमा काय वर्णावा? या महान कलावंताच्या निधनाने...
आदर्श ः चौकशी की चौकशीचे ढोंग

आदर्श ः चौकशी की चौकशीचे ढोंग

Author :  सडेतोड : अरुण रामतीर्थकर आदर्श सोसायटीतील प्रत्येक सदस्याच्या उत्पन्नाची चौकशी व्हायला हवी. नेमके ते न होता भलत्याच मुद्द्यावर चौकशी चालू आहे, अशी निरर्थक चौकशी असल्याने विलासराव, सुशीलकुमार हे ‘कॅज्युअल’ पद्धतीने उत्तरे देऊन गेले. एकमेकांचे परममित्र असताना परस्परांवर जबाबदारी ढकलताना ते जराही डगमगले नाहीत. कारण ही चौकशी वांझोटी आहे हे तीनही...
ओसामाची हत्या आणि अबू हमजाची अटक

ओसामाची हत्या आणि अबू हमजाची अटक

Author : पंचनामा : भाऊ तोरसेकर ओसामा बिन लादेन याला गेल्या वर्षी एका छुप्या कारवाईत अमेरिकन सेनेच्या खास तुकडीने पाकिस्तानात घुसून ठार मारले. त्या घटनेने जगात सर्वांनाच चकीत करून सोडले होते. कारण इथे शेजारी पाकिस्तानात तिथल्या लष्करी प्रशिक्षण केंद्राच्या आवारातच, एका बंदिस्त बंगल्यात ओसामाला तिथल्या फ़ौजी यंत्रणेने लपवून ठेवला होता. त्या कडेकोट...
काश्मीर : एक सद्यस्थिती!

काश्मीर : एक सद्यस्थिती!

Author : अरुण करमरकर सरकारी- प्रचारी गवगवा आणि सामान्य जनभावना यांच्यातील तफावत काश्मीरमध्ये दिसून येते. काश्मीर समस्येचे आजचे स्वरूप नेमके हेच आहे. समस्येची मुळे खोलवर रुजलेली आहेत हे खरे पण काश्मिरी जनमानस मात्र, अशांतता, अस्थिरता याला ते कंटाळलेय. राजकीय कूटनीतीपासून खूपसे अलिप्त आहे. पण या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हे नागरिक अज्ञानातून सरसकटपणे...
समाजवाद्यांना पुन्हा मस्ती आली

समाजवाद्यांना पुन्हा मस्ती आली

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर नितीशकुमार म्हणतात हिंदुत्ववादी पंतप्रधान नको. हे विधानच मूर्खपणाचे आहे. ज्या देशात ८५ टक्के लोक हिंदू आहेत त्या देशातच हिंदुत्ववादी पंतप्रधान होईल. पाकिस्तान किंवा इटलीत होणार नाही. नितीशकुमारना हिंदुत्वाची एवढी ऍलर्जी असेल तर त्यांनी नवीन पटनाईक यांचा मार्ग अवलंबावा. हिंदुत्वामुळे नव्हे, तर गरज संपताच त्यांनी भाजपाशी मैत्री...
नाकर्तेपणाची आग; शंकासंशयाचा धूर

नाकर्तेपणाची आग; शंकासंशयाचा धूर

Author : पंचनामा : भाऊ तोरसेकर एक मजेशीर किस्सा शाळकरी मुलांच्या गप्पांतुन काही वर्षापुर्वी ऐकला होता. गुरूवारी मंत्रालयाला भस्मसात करणार्‍या आगीच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर ऐकत असताना, तो किस्सा नेमका आठवला. दोन आळशी असतात. दोघेही एका बोराच्या झाडाखाली लोळत पडलेले असतात. त्यांना सगळ्याच गोष्टींचा कंटाळा असतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अचानक त्य बोरीच्या...
लोकशाही की सौदेबाजांची ठेकेदारशाही?

लोकशाही की सौदेबाजांची ठेकेदारशाही?

Author : पंचनामा : भाऊ तोरसेकर अमेरिकेतल्या राष्ट्रपती निवडणुकीला अजून पाच महिने शिल्लक आहेत. त्यातल्या डेमॉक्रेटीक पक्षाचा उमेदवार ठरलेला आहे. कारण जो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच निवडून आलेला असतो, त्याला दुसर्‍यांदा पक्षातर्फ़े आपोआपच उमेदवारी मिळत असते. सहाजिकच मागल्या खेपेस निवडणूक जिंकणारे बराक ओबामा हे त्या पक्षाचे येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीतील राष्ट्राध्यक्ष...
ओबीसी तरुणांनो, सावध व्हा!

ओबीसी तरुणांनो, सावध व्हा!

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर खर्‍या ओबीसींच्या जागा हिरावून घेण्याचा कॉंग्रेसचा कट सर्वोच्च न्यायालयामुळे उधळला गेला, पण कॉंग्रेसची मनोवृत्ती त्यातून स्पष्ट झाली. सोमवारी एका गालावर थप्पड बसली तरी बुधवारी दुसर्‍या गालावर थप्पड खाण्यासाठी तयार झाले. यातून मुस्लिमप्रेम उघड दिसते. तसेच मूळ ओबीसींवर अन्याय हा पण उघड दिसतो. पुरोगामी-प्रतिगामी, सेक्युलर-कम्युनल या निरर्थक...