Home » Blog » अण्णा, तेथे कशासाठी जाणार?

अण्णा, तेथे कशासाठी जाणार?

मुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैन
काही दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी पाकिस्तानातून एक प्रतिनिधी मंडळ, त्यांच्या राळेगणसिद्धीच्या निवासी आले. अण्णांना भेटल्यानंतर प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी त्यांना पाकिस्तानच्या दौर्‍यावर येणाचा आग्रह केला. मागील काही दिवसांपासून अण्णांचे प्रसारमाध्यमांशी जोडले जाणे, हाच या दौर्‍याचाही उद्देश होता. दिल्लीमध्ये अण्णांचे उपोषण चालू असताना पाकिस्तानातील वर्तमानपत्रांत बातम्या प्रकाशित होत होत्या की, पाकिस्तानमध्येही काही लोक अण्णांप्रमाणे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू करू इच्छितात. अण्णांचे आंदोलन सङ्गल झाल्याने पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाने भारतात येऊन अण्णांना विनंती केली की, त्यांनी पाकिस्तानमध्ये येऊन भ्रष्टाचार मिटवण्यासाठी तेथील जनेतेचे नेतृत्व करावे. पाकिस्तानबरोबच दुबईतही असेच दृश्य पाहण्यास मिळाले. तेथे भारतीयांबरोबर पाकिस्तानीही यामध्ये सामील होते. अण्णांनी पाकिस्तानी नागरिकांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि सांगितले की, ते अवश्य तेथे येतील. भारतीय वर्तमानपत्रांत जे काही प्रकाशित होत आहे त्यानुसार अण्णांनी पाकिस्तान्यांचे निमंत्रण स्वीकारले आहे. ते केव्हा पाकिस्तानात जातील हे ठरलेले नाही, परंतु पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळ या विश्‍वासाने परत गेले आहे की, अण्णा हजारे पाकिस्तान्यांच्या दु:खात सहभागी होतील आणि भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे नेतृत्व करतील, परंतु अजून तारीख ठरलेली नाही. अण्णा हजारे यांचे नेतृत्व पाकिस्तानी स्वीकारतील, यापेक्षा सुखदायक गोष्ट कोणती असू शकेल? अण्णा एक ग्रामीणवासी आहेत, परंतु ते जाणून आहेत की, पाकिस्तान सरकार त्यांना व्हिसा देणार नाही. त्यामुळे त्यांचा पाकिस्तानला जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. भारतीयांच्या शुभेच्छा आहेत की, अण्णा अवश्य पाकिस्तानात जावेत आणि पाक जनतेच्या दु:खात सहभागी व्हावेत. परंतु अण्णा काय आपण पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर आपल्या सवयीप्रमाणे ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’चा नारा देणार? जर आपणास असे करण्यास रोखले, तर मुश्कील होईल म्हणून आपण तेथे जाण्याऐवजी पाकिस्तानलाच येथे बोलावून घ्यावे. अण्णा, आपण १९६५ च्या युद्धात पाकिस्तानबरोबर केलेल्या लढाईत भाग घेतला होता. आपल्या शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह तुम्ही ट्रकमध्ये ठेवत होतात. आपल्या कपाळावर गोळी लागली होती. त्या प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांना आपण हे नाही विचारलं की, त्यावेळेस आमच्यावर तशी चढाई का केली म्हणून? ज्या पाकिस्तान्यांचे इतक्या वर्षांनंतरही हृदयपरिवर्तन झाले नाही. अण्णा, काय आता त्यांचे विचार बदलतील? आपल्या देशावर ज्यांनी अन्याय केला, त्यांचे हृदय बदलेल? जे आपणास बोलावण्यास आले होते, त्यांना या गोष्टीविषयी पश्‍चात्ताप आहे? त्याच अत्याचारी देशात जर आपण पुन्हा जाल, तर आपल्यासोबतच्या त्या शहीद जवानांचा आत्मा काय म्हणेल? काय त्यावेळेस तेथे शहीद झालेल्या आपल्या साथींना श्रद्धांजली अर्पण कराल? पाकिस्नानची सेनाही लाचार भ्रष्टाचाराशी लढण्यापूर्वी आपल्याला या गोष्टीचे चिंतन करावे लागेल की, पाकिस्तानात भ्रष्टाचारामुळे आतंकवाद आला की आतंकवादामुळे भ्रष्टाचार? जाण्याची काय आवश्यकता आहे. सारे विश्‍व सांगत आहे की, तो एक मृतप्राय देश आहे. स्वयं त्या देशातील नेत्यांनीही याचा स्वीकार केला आहे. येणार्‍या दहा वर्षांत पाकिस्तान राहील की नाही, हे सांगणे कठीण आहे. पाकिस्तानचा सीमा प्रदेश अङ्गगाणिस्तानमध्ये समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कारण सीमा प्रदेश आतंकवाद्यांचा मजबूत गड बनला आहे. या प्रदेशाला वाचवू शकेल इतकी पाकिस्तान सरकारमध्ये ताकद नाही. बलुचिस्तानमध्ये नेहमी दंगल होते. तेेथे पाकिस्तानी सरकारचे कायदे चालत नाहीत. बलुची लोकांची भाषा ङ्गारसी आहे आणि तेथील लोकांवर इराण संस्कृतीची छाप आहे. त्यांच्या चर्चसाठी प्रथम रशिया कब्जा करू इच्छित होता, परंतु नंतर अमेरिका आली. अमेरिकेने आपली स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करताच, अङ्गगाणिस्तानातील जितके लोक होते ते अमेरिकेशी दोन हात करण्यास पुढे आले. पाकिस्तानने भारतीय काश्मीरच्या ज्या भागावर आपला कब्जा मिळवला आहे, तो आता चीनच्या ताब्यात आहे. पाकिस्तान सिंध आणि पंजाबवर आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकतो, परंतु अण्णा, इस्लामाबादच्या लाल मशिदीत काय झाले, याची माहिती आपल्याला आहे. पाकिस्तानात तेथे तालिबान आणि शंभर-सव्वाशे आतंकवाद्यांचा गट ज्या प्रकारे अस्थिरता निर्माण करत आहे त्यावरून असे म्हणता येते की, जिन्नांचे पाकिस्तान खूप दिवस राहू शकणार नाही. कराचीमध्ये पाकिस्तानची सेनाही लाचार झाली आहे. पाकिस्तानच्या सर्वांत मोठ्या मित्र राष्ट्र असलेल्या अमेरिकेनेही आता त्याचे चरित्र ओळखले आहे. म्हणून पाकिस्तान राहणारच नाही, तर अण्णा तेथे कशासाठी जाणार? पाकिस्तान समाप्त होईल, असे जगातील मोठे राजनीतिज्ञ आणि मोठ्या शक्तींचे म्हणणे आहे. अण्णा, आपण आपल्या येथे आलेल्या प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांना असा आग्रह धरावा की, मी तेथे येण्याऐवजी तेथे काही राहिले असेल ते भारतात घेऊन यावे. हे आपणासाठी योग्य होईल. आपल्या दुरावलेल्या आणि अडचणीत असलेल्या पुत्रांच्या पापांना क्षमा करून आपल्यात समाविष्ट करून घेण्याची ताकद भारतमातेजवळ आहे. भारतमातेचा जयजयकार आपण उपोषणादरम्यान नेहमी केला आहे. पाकिस्तानचा जन्मच भ्रष्टाचाराने झाला आहे. सारे जग जाणून आहे की, लाहोरमध्ये ६० टक्के हिंदू होते, म्हणून विभाजनाच्या वेळी लाहोरच्या आर्य समाजी नेत्यांनी असा आवाज उठवला की, हिंदू लोकसंख्येच्या आधारावर लाहोर भारताला मिळायला हवे. विभाजनाची रेखा तयार करणार्‍या रेडक्लिङ्गने तत्कालीन आर्य समाजाच्या नेत्यांना मागणी केली की, २० लाख रुपये द्यावे आणि लाहोरला प्राप्त करावे. आर्य समाजी नेत्यांनी दिल्लीतील नेत्यांना खूप समजावले, परंतु त्यांचे काहीही चालले नाही. केवळ २० लाखामध्ये लाहोर विकला गेला. १३ ऑगस्ट २०११च्या टाइम्स ऑङ्ग इंडियाने आपल्या १७ व्या पानावर, १९४७ मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये काय चालले होते, याविषयी एक माहिती प्रकाशित केली आहे. यामध्ये ढाकाच्या ९४ वर्षीय रवींद्रनाथ दत्ता गुप्ता आणि कोमिलाचे ९० वर्षीय इंद्रकुमार सिंह नामक दोन हिंदूंची भेटवार्ता प्रकाशित केली आहे. दोघांची अडचण ही होती की, विभाजनाच्या वेळी दोन्ही नगर हिंदुबहुल होते. खुलनामध्ये ९२ टक्के हिंदू होते आणि ढाका तसेच चिटगोंगमध्ये ७० टक्क्यांहून अधिक. त्या वेळी असे ठरले होते की, हे दोन्ही नगर दिल्लीच्या केंद्रीय सरकारप्रमाणे राहतील, परंतु नंतर परिस्थिती पालटली. त्यांना या गोष्टीचे दु:ख आहे की, हा निर्णय का बदलला गेला? बहुतेक विभाजन करणार्‍यांचे खिसे गरम झाले असतील. म्हणून हिंदुबहुल क्षेत्र पाकिस्तानच्या हवाली केले गेले. विभाजनासाठी सहमत आहे असे म्हणून प्रथम लॉर्ड माऊंटबॅटन, मोहम्मद अली जिना आणि जवाहरलाल नेहरू यांनी प्रथम या कागदपत्रांवर स्वाक्षर्‍या केल्या. विभाजन कसे होईल आणि कोणते क्षेत्र कुणाला मिळेल हे सर्व नंतर ठरले. म्हणून सत्य हे आहे की, विभाजनच पूर्णत: चुकीचे झाले आहे. भ्रष्ट इंग्रज विकले गेले आणि मुस्लिम लीग लोकांची चांदी झाली. म्हणून अण्णा, ज्या देशाचा पिंडच भ्रष्टाचारी आहे, त्याला अगोदर ठीक केले पाहिजे. नंतर आपण भ्रष्टाचार निवारणाच्या गोळ्या पाकिस्तान्यांना सेवन करण्यास द्यावे. विभाजनाच्या वेळी इंग्रजांना भ्रष्ट करून यांनी राजा, राजवाडे, नवाब आणि धर्मगुरूंच्या पैशाने हवे ते खरेदी केले आणि त्याचे नाव पाकिस्तान असे दिले गेले. जो खरेदी करू शकतो तो विकूही शकतो. म्हणून चीनला काय काय दिले आहे, हे कुणापासून लपून राहिले नाही. चीन सध्या भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करत आहे. पाकिस्तानला सुविधाही देत आहे आणि मनाप्रमाणे पैसा, शस्त्र आणि सुविधाही देत आहे. म्हणून आंदोलन त्या देशासाठी केले जाते जे आपल्या मातृभूमीचे रक्षण करेल. येथे तर मातृभूमीला विकण्यास आणि भारताच्या शत्रुत्वामुळे देशाला दानामध्ये देण्याची परंपरा आहे त्या देेशासाठी चारित्र्याच्या आधारावर आंदोलन करण्याचे काय औचित्य? त्यांच्यात मातृभूमी म्हणजे एक जमिनीचा तुकडा आहे म्हणून ते वंदे मातरम्‌चा विरोध करतात. देशाला विकण्याचा भ्रष्टाचार आपल्यासारखेच एक देशभक्त आणि कॉंग्रेसचे समर्पित महाराष्ट्राचे नेता नरहरी विष्णू गाडगीळ यांना पाटबंधारेमंत्र्याच्या रूपात जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर नेहरी पाणी समझोत्यासाठी पाकिस्तानला पाठवले होते. आपणास विनंती आहे की, त्यांचे जीवन (चरित्र) आपण अवश्य वाचावे, मग आपणास माहीत होईल की, पाकिस्तानच्या नेत्यांनी त्यांच्याशी कसा व्यवहार केला आहे? भारतातून कोणताही नेता बातचीत करण्यासाठी गेल्यानंतर जिना केवळ आपल्या मुंबईस्थित मलबार हिलच्या बंगल्यासंदर्भात बोलत असे. त्यांचा प्रयत्न असे की, त्यांच्या बंगल्याला कस्टोडियन प्रॉपर्टी घोषित करून भारत सरकारने त्याच्यावर कब्जा करू नये. पाकिस्तानात भारताचे प्रथम राजदूत श्री. प्रकाश यांचे पुस्तक वाचल्यानंतर आपणास सर्व प्रकार माहीत होईल. आपल्या संपत्तीची चिंता करणारे देशाची चिंता करत नसतात. भारतात भ्रष्टाचार हा धन आणि संपत्ती मिळवण्यासाठीचा आहे, परंतु पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचार आपल्या देशाला विकण्याचा आहे. अखंड भारत यावर विश्‍वास करणार्‍या आपल्या पासपोर्टवर पाकिस्तानी व्हिसाचा शिक्का मारत नसतात.
तरुण भारत, 9/29/2011
http://amarpuranik.in/?p=519
Posted by : | on : 9 October 2011
Filed under : Blog.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *