Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, स्थंभलेखक » उत्तुंग यशाचं घर जमिनीवर

उत्तुंग यशाचं घर जमिनीवर

चिंतन : अमर पुराणिक |

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जो अभूतपुर्व विजय मिळवला तो विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या उत्तम कार्याची पावतीच आहे. या यशाचा आनंद आणि जल्लोष होणे स्वाभाविक आहे. पण देशाचा पंतप्रधान, विजयी पक्षाचा सर्वश्रेष्ठ नेता अशा कोणत्याही विजयी उन्मादात न जाता पुर्णपणे जमीनीवर राहून पक्षाच्या विजयमेळ्यात बोलतो आणि त्याचे अनुकरण इतर नेते आणि कार्यकर्ते करु लागतात यातच भाजपाच्या विचारधारेचे आणि नरेंद्र मोदी यांच्या उत्तुंग यशचे गमक आहे. प्रत्येक उत्तुंग यशाचा पाया प्रचंड मजबूत असतो आणि पाय जमिनीवरच स्थिर असतात. याचे दर्शन सार्‍या देशाला दिल्लीतील भाजपामुख्यालयात झालेल्या विजय मेळाव्यात झाले.

narendra-modi-re-Lपाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जो अभूतपुर्व विजय मिळवला तो विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या उत्तम कार्याची पावतीच आहे. या यशाचा आनंद आणि जल्लोष होणे स्वाभाविक आहे. पण देशाचा पंतप्रधान, विजयी पक्षाचा सर्वश्रेष्ठ नेता अशा कोणत्याही विजयी उन्मादात न जाता पुर्णपणे जमिनीवर राहून पक्षाच्या विजयमेळ्यात बोलतो आणि त्याचे अनुकरण इतर नेते आणि कार्यकर्ते करु लागतात यातच भाजपाच्या विचारधारेचे आणि नरेंद्र मोदी यांच्या उत्तुंग यशचे गमक आहे. प्रत्येक उत्तुंग यशाचा पाया प्रचंड मजबूत असतो आणि पाय जमिनीवरच स्थिर असतात. याचे दर्शन सार्‍या देशाला दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या विजय मेळाव्यात झाले.
या भाषणात मोदी यांनी कार्यकर्त्यांच्या चार पीढ्‌या, नेत्यांचे आणि जनतेेचे आभार तर मानलेच पण, नरेंद्र मोदी यांच्या अभ्यासाची, गहन विचारपद्धतीची आणि दूरागामी योजनांची चुणूक पहायला मिळाली. दूरागामी परिणाम करणार्‍या धोरणांचा आणि विचारधारेचा आराखडाच मोदी यांनी या भाषणात मांडला. आजपर्यंत भाजपाला मिळालेले यश ही केवळ सुरुवात आहे. खर्‍या राष्ट्र उभारणीची सुरुवात आतापासून होत असल्याचा, विकासकार्याच्या प्रारंभाचा तो शंखनादच होता.
बहूदा कोणत्याही विजयी सभेत विजयउन्माद, विजयोत्सव साजरा केला जातो. आम्ही कसे श्रेष्ठ आहोत, आम्ही कसे जिंकलो याचाच घोष केला जातो. कार्यकर्ते आणि नेत्यांचे पाय जमीनीवर नसतात. पण भाजपाने इतके भव्य यश मिळाल्यानंतरही नरेंद्र मोदी यांनी या भाषणात गंभीर आणि दूरागामी योजनांच्या कार्यान्वयनाच्या दृष्टीकोनातून विचार मांडले. मोदींचे हे विचार म्हणजे कार्यकर्ते आणि जनतेला विकास आणि राष्ट्रनिर्माणासाठी उद्यूक्त करणारे जालीम डोसच होते.
यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. पण लोकशाहीचे मुल्य आणि देशातील नागरिकांचे हित यावरच मोदी यांनी जास्त भर दिला होता. या भाषणातील एकएका मुद्द्यावर एकएक लेख होतील इतकी व्यापकता आणि गहनता या भाषणात होती. लोकशाहीत निवडणुका एक लोकशिक्षणाचे महापर्व असल्याचा आवर्जुन उल्लेख करत मोदी यांनी लोकशाहीवरील सामान्य जनतेचा विश्‍वास केवळ मतदानापर्यंतच सीमीत राहू नये, तर राष्ट्रनिर्माणात त्यांची भागीदारी वाढत जावी, मानवजातीच्या कल्याणासाठी पुढे जात राहाण्याचा संदेश दिला आहे. राष्ट्रनिर्माणात जनतेचा सहभाग किती मोठा असतो याचीच प्रचिती यातून येते.
देशातील जनते बदलत चाललेल्या मानसिकतेचा अतिशय सखोल अभ्यास आणि निरिक्षण केल्याचे मोदी यांच्या या भाषणातून स्पष्टपणे दिसून येते. बहूदा आपल्या देशात गेल्या साठ वर्षात आम्ही हे करु, ते करु, दिलेल्या आश्‍वासनांची पुर्तता करु इतक्याच मर्यादित स्वरुपात भूमिका मांडली जाताना आपण पाहिली आहे. देशाच्या विकासात ‘लोकसहभाग’ ही संकल्पनाच हद्दपार झाली होती पण मोदी यांनी सरकारबरोबरच जनतेलाही राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित केले आहे.
यात त्यांनी समाजातील सर्वच घटकांच्याबाबतीत धोरणे मांडली. गरिब, मध्यमवर्गीय, तरुण, महिला आदींबाबत विचार व्यक्त करताना थेट मुळाला हात घातला. जनता आता किती पक्व झाली आहे हे सांगताना देशाच्या अर्थशास्त्राच्या बदललेल्या रुपातून नवा भारत दिसत असल्याचे गौरवोद्गार मोदी यांनी काढले. मोदींचे हे विचार म्हणजे जनतेला दिलेले डबलबुस्टर डोसच आहेत. यामुळे जनता राष्ट्रउभारणीत हिरहिरीने सहभाग घेईल. याची प्रचिती संपुर्ण देशाने नोटबंदीच्यावेळी अनुभवलीच आहे. विरोधक प्रचंड टीका करत असताना जनता मात्र त्रास सहन करुनही खंबीरपणे मोदींच्या पाठीशी उभी होती.
मोदी यांनी देशाच्या विकासाच्या संतूलनाचे एक सूत्र सांगितले, गरिब आणि मध्यमवर्गीयांच्या माध्यमातून. असा नवा भारत आपण पहातोय की आता देशातील गरीब काही मिळण्याची इच्छा न करता काही करुन दाखवण्याच्या संधी शोधतोय हा अतिशय क्रांतीकारी बदल आहे. देशातील गरिबातील गरीब व्यक्ती, मला काही तरी दिले तर तुम्ही मला चांगले वाटाल! या मानसकितेतून बाहेर पडाला आहे. गरीब म्हणतो की माझ्या क्षमतेवर मी पुढे जावू इच्छीतो. फक्त तुम्ही माझ्यासाठी संधी उपलब्ध करुन द्या. कष्ट मी करेन. हाच नव्या भारताचा पाया आहे. यावरुन मोदी यांनी किती नेमके मर्म ओळखले आहे हे लक्षात येते. गरिबांच्या सामर्थ्यातूनच अंत्योदय साधण्याचा अतिशय अभिनव प्रकार मोदी यांनी यावेळी मांडला. पोट भरलेला माणूस इतकी धडपड करत नाही पण जो गरीब आहे असा माणूस मात्र संधी मिळाली तर प्रचंड वेगाने आणि प्रभावीपणे काम करतो हे आपण सर्वांनीच अनेकदा आपल्या अवतीभोवती पाहिले आहे. हेच नेमके मोदी यांंनी हेरले आहे.
कर न चूकवणार्‍या प्रामाणिकपणे नियमांचे पालन आणि कर्तव्यं करणार्‍या मध्यमवर्गीयांवर पडत असलेल्या ताणाची जाणिव मोदी यांना आहे. मध्यमवर्गीय पुढे जाण्यास सक्षम आहे केवळ त्यासाठी अडथळे हटवण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी मध्यमवर्गीयांना उचलाव्या लागणार्‍या देशाच्या ओझ्याबाबत तोडगा सांगताना मोदी यांनी मध्यमवर्गीयांवर गरिबांचे ओझे पडते ते हटवण्यासाठी गरिब सक्षम झाला तर आपोआपच मध्यमवर्गीयांवरील ओझ कमी होईल, केवळ त्यासाठी संकल्पाची गरज असल्याचे मोदी म्हणाले. त्यासाठी त्यांनी २०२२ साली देशाच्या ७५ व्या स्वातंत्र दिनापर्यंत सर्वांनी संकल्प घेऊन कार्य करण्याची उत्स्फुर्त प्रेरणा दिली. या एका लेखातून मोदी यांच्या भाषणातील सर्व मुद्द्यांचे पैलू मांडण शक्य नाही.
पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल म्हणजे नव्या हिंदूस्थानचा नवा पाया घातला गेल्याचे दिसत असल्याचे मोदी म्हणाले. त्यांनी निवडणुकांचं गणित बांधून वाटचाल केलेली नाही हेही यावेळी त्यांनी सांगितले. भाजपाचा विजय हा जनतेचा एक पवित्र आदेश आहे. तो आदेश पुर्ण करण्यासाठी पुर्ण क्षमतेने निरंतर प्रयत्न करु. तेव्हाच जनतेच्या अशा अपेक्षा पुर्ण करण्यात सफल होऊ असे सांगताना मोदी यांनी जनतेला वचनच दिले आहे आणि जनतेचा मोदी यंाच्यावर प्रचंड विश्‍वास आहे हे नव्याने सांगायला नको.
जनतेबाबतीत हे सांगत असतानाच मोदी यांनी खरी लढाई आता सुरु झाल्याची जाणिव कार्यकर्त्यांना अतिशय मोलाचा संदेश देत करुन दिली. त्यांनी सांगितलेले उदाहरण अतिशय समर्पक आहे. निसर्ग, प्रकृती आपल्याला शिकवत असते. कोणतेही झाड कितीका उंच होईना पण जशी फळे लागायला लागतात तसा तो झुकु लागतो. प्रकृती आपल्याला प्रेरणा देत असतो. भाजपाच्या वटवृक्षावर आता विजयरुपी फळे लागली आहेत तेव्हा सर्वात जास्त झुकण्याचे, अधिकनम्र बनण्याचे आपले कर्तव्य असल्याची जाणिव मोदी यांनी अतिशय नेमक्यापद्धतीने भाजपानेत्यांना आणि कार्यकर्त्यांना करुन दिली. हे सांगताना सत्ताही सेवेची संधी असल्याचा गर्भित इशाराही मोदी यांनी दिला.
कार्यकर्त्यांचे आभार मानताना मोदी याही वेळी जनसंघ, भाजपाच्या चार पीढ्‌यांचे कार्य आणि कष्टाची जाणिव विसरले नाहीत. लक्षावधी कार्यकर्त्यांच्या अखंड एकनिष्ट पुरुषार्थाला वंदन करत हे यश त्यांना समर्पित केले. मोदी यांनी कार्यकर्त्यांच्या साक्षीने आम्ही चूकीच्या भावनेने कोणतेही काम करणार नाही याचीही ग्वाही दिली.
भाजपाने मिळवलेले यश हे यापुढेही अनेक अडथळे पार करत मिळणार आहे. पण त्यासाठी भाजपाने अतिशय सावध आणि अखंड कार्यशील राहणे आवश्यक आहे. मोदी यांच्या नेतृत्वात देशाने विकासाचा जो वेग धरला आहे तो यापुढे निश्‍चित वाढेल यात शंका नाही. हे काम करत असताना भाजपाला आणि मोदींना अखंड सावध रहाणे त्याहून महत्त्वाचे आहे कारण उमर अब्दूल्ला यांनी नुकतीच मोदी यांच्यावर स्तूतीसुमने उधळली. ही स्तूती सरळ आहे की कोणत्या राजकीय भूमिकेतून केली हे पहाणे महत्त्वाचे आहे. पुर्वी शेख अब्दूल्ला यांनी जवाहरलाल नेहरु यांची अशीच स्तूती करुन नेहरुंचे खच्चीकरण केले होते. तीच खेळी उमर अब्दूल्ला खेळत आहेत. अर्थात मोदी ही खेळीपुर्णपणे ओळखून आहेत. मोदी असल्या हवेत वाहून जाणारे नाहीत. पण कार्यकर्ते आणि इतर वरिष्ट आणि कनिष्ट भाजपा नेत्यांनी अशा द्वेष आणि स्तूतीला बळी पडता कामा नये. राष्ट्रोद्धाराची जी मशाल पंतप्रधान मोदी घेऊन निघाले आहेत त्यात कार्यकर्त्यांची आणि जनतेची मोलची साथ अत्यावश्यक आहे. त्याच अनुषंगाने मोदी यांच्या भाषणाकडे पहावे लागेल. कारण मोदी यांच्या संबोधनात असे अनेक सुप्त मुद्दे आणि भूमिका आहेत याचा सखोल विचार होणे आणि त्याचे कार्यान्वयन होणे यातच भाजपाचे खरे यश आहे.••

Posted by : | on : 19 March 2017
Filed under : Blog, चौफेर : अमर पुराणिक, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *