Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राष्ट्रीय, स्थंभलेखक » देशभक्ती-देशद्रोह : सीमा रेषा पुसट करण्याचे कारस्थान

देशभक्ती-देशद्रोह : सीमा रेषा पुसट करण्याचे कारस्थान

•चौफेर : अमर पुराणिक•

कम्यूनिस्ट आणि कॉंग्रेस देशभक्ती आणि देशद्रोह यातील सीमा रेषा पुसट करण्याचा उद्योग करत आहेत. केवळ पुसट करण्याचाच नव्हे तर पुर्णपणे पुसुन टाकण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. आजपयर्र्त अनेक बाबतीत लक्ष्मण रेषा पुसट केल्या गेल्या आहेत पण देशभक्ती आणि देशद्रोहाच्या लक्ष्मणरेषा पुसट करण्याचा प्रयत्न या थरावर कधी झाला नव्हता. मोदी सरकार कोणत्याही राजकीय विरोधाला बळी जात नाही. कोणत्याही षडयंत्राला बळी जात नाही म्हंटल्यावर मग मोदींचा अश्‍वमेघी वारु रोखण्यासाठी डाव्या कम्युनिस्टांनी आणि कॉंग्रेसने ही अतिशय अवसान घातकी खेळी सुरु केली आहे.

CAMUNIST BREAKING INDIAपुरातन काळापासून समाजाच्या हितासाठी म्हणून भारतीय समाजाकडून काही संहिता, नीती-नियम तयार केले गेले आहेत. यात चांगले-वाईट, भले-बुरे, सुसंस्कृत-असंस्कृत, पाप-पुण्य अशा अनेक संहिता हजारो वषार्र्पासुन पाळल्या जात आहेत. यात सतत बर्‍या-वाईटाच्या लक्ष्मणरेषा समाजाकडून जपल्या गेल्या आहेत. यातून समाज, देश एकसंघ राहण्यात मोठी मदत झाली आहे. भारतीय समाजाचे हे नीती-नियम म्हणजे आपली भारतीय संस्कृती होय. हे नीती-नियम काटेकोरपणे पाळले गेल्यामुळे देश आणि समाज एकसंघ राहिला. जेव्हा-जेव्हा या नीती-नियमांची पायमल्ली झाली तेव्हा-तेव्हा आपल्या भारतीय समाजाची अपरिमित हानी झाली आहे. तेव्हा सुसंस्कृत आणि नीतीची चहाड असलेल्या समाजातील घटकानेच अशा असामाजिक आणि अराष्ट्रीय तत्वांना ठेचून काढले आहे. अशावेळी अनेकदा मोठे रक्तपात झाले आहेत. पण इतकी मोठी किंमत देवूनही आपल्या समाजातील या नीतीशील घटकाने समाज आणि देश एकसंघ ठेवला आहे.
सध्या आपल्या देशात अतिशय विचित्र वातावरण पसरवण्याचा उद्योग याच देशातील काही मंडळींनी चालवला आहे. जेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत तेव्हापासून अशा उद्योगांना वेग आला आहे. समाजातील नीतीमत्तेच्या लक्ष्मणरेखा पुसट करण्याचे उद्योग अनेकदा झाले आहेत. काळाबरोबर नीती-अनीतीच्या संकल्पनांचे परिघ सतत कमी जास्त होत राहिले आहेत. २० व्या शतकात काही बाबतीत या परिघ बदलण्याचा फायदाही झाला आहे. पण असे अपवाद खूप कमी आहेत. भाजपाप्रणित रालोआ सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आल्यापासून आपल्याच देशातील काही राष्ट्रद्रोही वृत्तींच्या मनात ही खदखद सुुरु आहे. हे लोक जनतेने बहूमताने निवडून दिलेले भाजपा सरकार थोडे दिवस सुद्धा सहन करण्याच्या मानसिकतेत नाहीत. एका बाजूला या देशाचे नागरिक मोदी सरकारबाबत समाधानी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात आणि विदेशात भारताचा गौरव वाढवण्यासाठी आणि देशाचा विकास साधण्यासाठी जे अथक प्रयत्न करत आहेत आणि त्यात यशही मिळवत आहेत तसतसा देशातील  छूप्या राष्ट्रद्रोह्यांना आणि शत्रु राष्ट्रांना पोटशुळ उठला आहे. भारतातील राजकीय पक्ष असलेल्या कॉंग्रेस आणि डाव्यांना तर संताप आणि सत्ताविरह अनावर झाला आहे. त्यासाठी एका विशिष्ठ मर्यादेत राजकारण न करता सत्तेसाठी आजपर्यत कधी नव्हे इतक्या खालच्या थराला पोहोचले आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली देश अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही प्रगती साधतोय, मोदी सर्वप्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देश प्रगतीपथावर नेत आहेत आणि देशवासी मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत याची ही खरी पोटदूखी आहे.
आजपर्यंत राजकारणातले नीती-नियम अनेकदा ओलांडले गेले आहेत. पण तरीही बर्‍याच अंशी हे नीती-नियम पाळले गेले आहेत. पण सध्या स्थिती तशी नाही. सध्या राजकीय नीती केवळ खालच्या थरालाच पोहोचली नाही तर त्याहून खालच्या पातळीवर गेली आहे. आता देशातील डावे कम्यूनिस्ट आणि कॉंग्रेस देशभक्ती आणि देशद्रोह यातील सीमा रेषा पुसट करण्याचा उद्योग करत आहेत. केवळ पुसट करण्याचाच नव्हे तर पुर्णपणे पुसुन टाकण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. आजपयर्र्त अनेक बाबतीत लक्ष्मण रेषा पुसट केल्या गेल्या आहेत पण देशभक्ती आणि देशद्रोहाच्या लक्ष्मणरेषा पुसट करण्याचा प्रयत्न या थरावर कधी झाला नव्हता. मोदी सरकार कोणत्याही राजकीय विरोधाला बळी जात नाही. कोणत्याही षडयंत्राला बळी पडत नाही म्हंटल्यावर मग मोदींचा अश्‍वमेघी वारु रोखण्यासाठी डाव्या कम्युनिस्टांनी आणि कॉंग्रेसने ही अतिशय अवसान घातकी खेळी सुरु केली आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठात असले उद्योग खूप पुर्वीपासून सुरु आहेत पण इतक्या उघडपणे कधी झाले नव्हते. आजपर्यंत राजकीय खेळीआडूनच राष्ट्रहीत बाजूला ठेऊन असले खेळ खेळले गेले आहेत.
कम्युनिस्टांच्या राष्टभक्तीवर तर बोलायलाच नको. जगभरातून हद्दपार झालेली ही लाल ब्याद भारतात अजून तग धरुन आहे. जेएनयुमध्ये ‘भारत तेरे टुकडे होंगे, भारतकी बरबादी तक जंग रहेगी’ आदी राष्ट्रद्रोही घोषणाबाजीने संपुर्ण देश संतापला होता. अशा घोषणाबाजीने उद्वेगीत आणि चिंतीत झाले नाहीत ते म्हणजे डावे कम्युनिस्ट. डाव्यांना आजपर्यंत कधीच भारताबद्दल आस्था नव्हती आणि नाही. डावे केवळ चीन आणि पुर्वीच्या कम्युनिस्ट रशियालाच मुजरे घालतात. कालबाह्य झालेला मार्क्सवाद हे लोक अजूनही सोडायला तयार नाहीत. या मार्क्सला विद्वान विचारक समजणारी ही डावी पिलावळ हे विसरतेय की मार्क्सला कधी भारत कळलाच नव्हता. मार्क्स असे मानायचा की भारतीय समाजाला इतिहासच नाही आणि भारत कधी देश नव्हता. इतकी दिव्य(की विकृत) बुद्धी असलेल्या मार्क्सला मानणार्‍या डाव्या कम्युनिस्ट पिलावळींच्या बुद्धीची कल्पना यावरुनच येते. हिंदू साम्राज्याच्या स्वर्णिम काळात भारत ‘सोने की चिडीया’ म्हणून विख्यात होता, पण मार्क्सच्या मते असे कधी नव्हतेच.
माओ सुद्धा भारताकडे कम्युनिस्ट आणि चीनी साम्राज्यवादाच्या चष्म्यातून पाहात होता. १९६२ साली भारतावर हल्ला करण्याआधी बोलवलेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल मिलीटरी कमीशनच्या बैठकीत माओ म्हणाला होता की, मुळात भारत देशच नाही आणि असला तरीही भारत एक कमजोर देश आहे आणि चीनने दिड विजय आधीच मिळवला आहे. १९६२ साली चीनने भारतावर हल्ला केल्यानंतर मांडलेला चीनचा निषेध करणारा प्रस्ताव कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया(सीपीआय)च्या राष्ट्रीय परिषदेत फेटाळून लावला होता. भारताचा औद्योगिक विकास रोखण्यासाठी कम्युनिस्टांनी सतत भारतात संपाचे हत्यार वापरुन त्यांच्या कामगार संघटनांद्वारे प्रयत्न केला ही जगजाहीर बाब आहे. पण  १९६२ च्या युद्धाप्रसंगी कम्युनिस्टांनी भारताच्या सामरिक कारखान्यात संप करवले होते. भारतीय सैन्याला हत्यारे आणि दारुगोळा मिळू नये, भारतीय सैनिक चीनी सैनिकांकडून हत्याराविना मारले जावेत म्हणून म्हणून कम्युनिस्टांनी असले राष्ट्रद्रोही कृत्य केले होते. जगाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असावी की युद्धप्रसंगी आपल्याच सैन्याला हत्यारे आणि दारुगोळा मिळू नये म्हणून हरताळ केला गेला.
कम्युनिस्ट पार्टीने भारताच्या स्वातंत्र्यलढ्‌याप्रसंगी भारत छोडो आंदोलनाचा विरोध केला होता आणि मुस्लिम लीगचा द्विराष्ट्र सिद्धांत मान्य करत स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीचे समर्थन केले होते. सरदार वल्लभभाई पटेल स्वातंत्र्यानंतर भारताचे पुन्हा एकत्रीकरण करत होते तेव्हा कम्युनिस्ट पार्टीने तेलंगणामध्ये दंगल भडकवली होती आणि स्वंतत्र राहण्याची स्वप्ने पहाणार्‍या हैदराबादच्या निजामाच्या सशस्त्र हल्ल्याचे समर्थनही केले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचेही डाव्या विचारसरणीबद्दल मत चांगले नव्हते. ज्यावेळी आझाद हिंद सेनेने ब्रिटीश फौजांवर हल्ला केला तेव्हा भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राने नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेला ‘गद्दारोंकी फौज, लुटेरोंकी सेना’ असे म्हंटले होते.
उच्च न्यायालयाकडून फटकार खावून सशर्त जामिनीवर सुटल्यानंतर कम्युनिस्ट पार्टीच्या विद्यार्थी शाखेचा नेता कन्हैया कुमार खरा आणि खोटा राष्ट्रवाद यातला फरक समजावून सांगण्याचा भामटेपणा करत होता. मार्क्स आणि माओच्या भक्तीने  भारतातील डाव्यांना देशाच्या अखंडताबाबत असे विकृत बनवले आहे, विघटनवादी बनवले आहे. भारताची ऐतिहासिक दृढ संस्कृती आणि सामाजिक रचना न कळलेला हा मार्क्स पाश्‍चिमात्य देशातील लेखकांनी लिहिलेल्या भारताच्या इतिहासाची पुस्तकं वाचून भारताबद्दल विकृत मत बनवतो, अशाची पिलावळ ही तशीच विकृत असणार ना! मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येच्युरी यांनी १९९६ साली एका लेखात भारताला अनेक राष्ट्रांचा भूभाग असे लिहिले होते. असली विकृत विचारधारा असल्यामुळे या डाव्यांची डोकी अशीच विपरीत राहिली आहे.
तिकडे जेएनयूची डाव्या विचारांची प्राध्यापिका निवेदिता मेनन विचारतेय की स्वतंत्र काश्मिर मागितले तर काय चूकले? अजून एक अशीच विकृत बाई द्रुपदी घोष नावाची. तिनेही फुटीरवाद्यांसोबत राहून स्वतंत्र काश्मिरची मागणी करत पाकिस्तानच्या घोषणा दिल्या होत्या. ही बाईही डाव्यांचीच पिलावळ आहे. डावे तथाकथित बुद्धीजीवी जसे भारताबाबत ओरडत असतात, प्रश्‍न विचारत असतात तसे त्यांनी कम्युनिस्ट चीनने तिबेट आणि झिनझियांग बळकावले त्यावर कधी प्रश्‍न उपस्थित केला नाही, चीनला कधी जाब विचारला नाही. कन्हैया कुमारसारखी डावी पिलावळ सध्या जी वळवळ करतेय ती कम्युनिस्ट अजेंडा धरुनच करतेय. काश्मिरच्या आजादीची स्वप्ने पाहणार्‍या कन्हैयाला अफजल गुरु म्हणूनच शहिद वाटतोय. हा सगळा प्रकार म्हणजे भारतीय जनतेच्या मनातून देशप्रेम आणि देशद्रोह यातील लक्ष्मणरेषा पुसुट टाकण्याचा घातक खेळ आहे. आणि असल्या घातकी सापांच्या पिलावळीला काही प्रसारमाध्यमे मोठी करताहेत हे त्याहून वाईट.

Posted by : | on : 27 March 2016
Filed under : Blog, चौफेर : अमर पुराणिक, राष्ट्रीय, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *