Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राष्ट्रीय, स्थंभलेखक » राष्ट्रद्रोही पिलावळांना आता ठेचून काढा!

राष्ट्रद्रोही पिलावळांना आता ठेचून काढा!

•चौफेर : अमर पुराणिक•

सध्या ज्यापद्धतीने जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील घटनेसारख्या राष्ट्रविरोधी घटना घडत आहेत त्यावरुन देशात अराजक माजवण्याचाच हा प्रयत्न आहेत हे स्पष्टच आहे. पाकिस्तान प्रायोजित आतंकवादाचे समर्थन राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सेक्यूलर आणि कम्यूनिस्टनेते करत आहेत. पण आता सरकारने असली राष्ट्रविरोधी कृत्ये आणि राष्ट्रविरोधकांना निर्दयपणे ठेचून काढले पाहिजे.

JNU KANDआपल्या देशातील राजकारणाचा स्थर इतका घसरला आहे की, काही नेते आपल्या राजकारणाच्या फायद्यासाठी कोणतीही भूमिका घेत आहेत. मग ती राष्ट्रद्रोहाची भूमिका का असेना. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राष्ट्रविरोधी घोषणा देण्याचा अश्‍लघ्य प्रकार तेथील कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी केला. संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरुच्या समर्थनार्थ घोषणा देत, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत, देशविरोधी घोषणा देत, देशाचे तुकडे करण्याची भाषा केली. त्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला अटक करण्यात आली तर दुसरा या कार्यक्रमाचा सूत्रधार उमर खालिद आणि त्याचे काश्मिर फुटीरवादी सहकारी फरार आहेत.अशा देशद्रोही पिलावळांचे समर्थन करण्याची आणि पाठराखण करण्याची पराकाष्टा कॉंग्रेस, कम्युनिस्ट आणि आम आदमी पार्टीने केली. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनी ही आजपर्यंतची सर्वात मोठी राजकीय चूक केली आहे.
राहूल गांधी यांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठात जाऊन भाषणबाजी करताना घटनेला राजकीय रंग देत थेट मोदी सरकारवर आरोप करत ‘सरकारच्या दबावाला भिक घालू नका, आपला आवाज सरकार दाबू पहात आहे, आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत आहे. पण मी तुमच्या पाठीशी आहे आणि कायम राहीन’ असे वक्तव्य करत या देशद्रोही कृत्यांची आणि देशद्रोह्यांची पाठराखण केली. यात आप नेते अरविंद केजरीवालही मागे राहिले नाहीत. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि कम्युनिस्टांना देशाच्या सन्मानाशी, अखंडतेशी काही देणे घेणे नाही. केवळ आपल्या राजकारणाची भाकरी भाजून घेण्यासाठी हे लोक आज कोणत्या थराला गेले आहेत. त्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मिडिया, युट्‌यूबवर व्हायरल झाला म्हणून बरे झाले. कारण काही वाहिन्यांनी फेक व्हिडीओंचा आधार घेत जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील देशविरोधी घोषणाबाजी योग्य असल्याचे सिद्ध करण्याचा आटापीटा केला.  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी आणि डी. राजा यांनी तर ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी त्यात नव्हतेच असा धडधडीत खोटारडेपणा केला. पण या व्हिडीओत कन्हैया कुमार सोबत डी. राजा यांची लेक दिसली तेव्हा लगेच घुमजाव केले. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्या या घातक भूमिकेमुळे त्यांच्या पक्षातील हजारो कार्यकर्त्यांनी पक्षत्याग केला. आम आदमी पार्टीतील जवळ जवळ ३९ हजार कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम केला आहे तर १२ लाख लोकांनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग केला आहे.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात या आधीही अशा अनेक विघातक घटना घडलेल्या आहेत. काही राष्ट्रद्रोही विचारांचे लोक जवाहरलाल नेहरु विद्यापीठाला देशद्रोह्यांचा अड्डा बनवू पहात आहेत. या घटनेचे समर्थन करण्याचा निर्लज्जपणा तेथील काही उच्चशिक्षित म्हणवून घेणार्‍या प्राध्यापकांनी केला. या संघटनेच्या बचावासाठी उतरताना या प्राध्यापकांना थोडीही चहाड उरली नाही. तर दुसर्‍याबाजूला जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील कर्मचारी संघटनेने मात्र अशा देशविघातक प्रवृत्तींचा विरोध करत देशद्रोही कृत्ये करणार्‍या विद्याथ्यार्र्ंना उघडे पाडण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे देेशप्रेमी जनतेच्या संतापाची इतकी पराकाष्टा झाली आहे की कन्हैया कुमारला न्यायालयात आणत असताना काही वकिलांनी त्याला चोप दिला.
राष्ट्रविरोधी घोषणा देणे हे लोकशाही असलेल्या देशातील काही लोकांना छोटा अपराध वाटत असेल, पण खर्‍या राष्ट्रप्रेमी नागरिकांसाठी यापेक्षा मोठी कोणती गोष्ट असु शकेल का? की आपल्याच देशात, आपल्याच देशाविरुद्ध घोषणा दिल्या जातात, या पेक्षा मोठा अपराध काय असणार आहे? लोकशाहीचा, सहिष्णूतेचा अर्थ असा नाही की कोणीही उठावं आणि देशाची लख्तरं टांगावी. भारतवासियांसाठी देशापेक्षा, राष्ट्रसन्मानापेक्षा कोणतीही मोठी गोष्ट नाही हे असल्या दळभद्री वृत्तीच्या लोकांनी लक्षात ठेवावे, अन्यथा जनप्रक्षोभ व्हायला वेळ लागणार नाही. देशाची जनता यांना अक्षरश: पळता भूई थोडी करुन सोडेल. असल्याच राष्ट्रविघातक वृत्तीमुळे जनतेने कॉंग्रेसाला सत्ताच्यूत केले आहे हे कॉंग्रेसच्या अजुन ध्यानात येत नाहीये. देशाच्या सन्मानापेक्षा राजकारण महत्त्वाचे वाटणार्‍या राहुल गांधी आणि केजरीवालसारख्या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षाला प्रत्येक मुद्द्यावर गलिच्छ राजकारण करण्याची चटक लागली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काही सार्थक आणि रचनात्मक कामाची अपेक्षा करताच येऊ शकत नाही कारण असे नेते आपल्या पौरुषावर नाही तर विकलांग आणि विकृत मानसिकतेच्या आधारावर असले राजकारण खेळत असतात.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हफीज सईदसारख्या अतिरेक्याप्रमाणे वक्तव्ये करुन काय सिद्ध करु पहात आहेत? या बाबी आता केवळ मोदी विरोधापर्यंतच सीमित राहिलेल्या नाहीत तर असल्या नेत्यांच्या कार्यशैलीतून देशविरोधी राजकारणाची दुगर्र्ंधी येऊ लागली आहे. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनी आता तर उमर अब्दूल्ला आणि दिग्विजयसिंह यांनाही मागे टाकले आहे.  खरे तर यांना मोदी सरकार करत असलेली विकास कामे आणि देेशाची प्रगती पहावेना. सत्तेसाठी याची नीतीमत्ता रसातळाला गेली आहे. पाकिस्तान, चीनसारखे देश भारताच्या विकासाचा मार्ग रोखण्यासाठी देशाबाहेरुन आणि आतून प्रयत्न करत आहेत. प्रचंड मोठ्‌या प्रमाणात निधी खर्च करुन देशात असली अराजकता माजवणारी कृत्ये घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचे सुत्रधार राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सेक्यूलर आणि कम्यूनिस्टांसारखे लोक बनले आहेत.
नक्कीच यात दूमत नाही की कमीतकमी जेव्हा देशाच्या स्वाभिमानाच्या रक्षणाचा आणि राष्ट्ररक्षणाचा प्रश्‍न येतो तेव्हा सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकामंचावर येऊन असल्या राष्ट्रविरोधी शक्तींचा विरोध केला पाहिजे, ज्यातून दूसर्‍या देशांना आपल्या देशातील राजनीतिक शक्तीचे एकत्रीत रुप दिसले पाहिजे. पण मोदी सरकार सत्तेत आल्यापासून असे होताना दिसत नाही. मोदींवरील द्वेष प्रकट करण्याची, मळमळ ओकण्याची, विरोध करण्याची कोणतीही संधी हे असले दळभद्री विरोधक सोडण्याच्या मानसिकतेत नाहीत. भले देश खड्डयात गेेला तरी चालेल पण सत्ता आम्हालाच हवी अशी तीव्र विकृतीयुक्त वासना कॉंग्रेसची झाली आहे. सध्या ज्यापद्धतीने जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील घटनेसारख्या राष्ट्रविरोधी घटना घडत आहेत त्यावरुन देशात अराजक माजवण्याचाच हा प्रयत्न आहे. पाकिस्तान प्रायोजित आतंकवादाचे समर्थन हे नेते करत आहेत. त्यात असली सेक्यूलर आणि कम्युनिस्ट मंडळीही सामिल आहेत. पण आता सरकारने असली राष्ट्रविरोधी कृत्ये आणि राष्ट्रविरोधकांना निर्दयपणे ठेचून काढले पाहिजे.

Posted by : | on : 21 February 2016
Filed under : Blog, चौफेर : अमर पुराणिक, राष्ट्रीय, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *