Home » Blog, सडेतोड : अरुण रामतीर्थकर, स्थंभलेखक » विषय अनेक, अग्रक्रम कशाला?

विषय अनेक, अग्रक्रम कशाला?

•सडेतोड : अरुण रामतीर्थकर•

१५ मिनिटांत १०० कोटी हिंदू ठार मारतो, असे अकबर ओवैसी भारतात राहून म्हणतो, तर भारतीय सेनादल शतपट प्रबळ हे माहीत असून, त्यांचे सैनिक आपल्या हद्दीत येऊन मुुंडके कापून घेऊन जातात. त्यांनी आमचे गळे कापायचे आणि आमच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात गळा घालायचा हे बंद झाले पाहिजे. राज्यकर्ते नालायक आहेतच, पण पाकिस्तानी गायक, वादक, नट मल्ल क्रिकेटपटू यांचे कौतुक करणारे आपणही नालायक आहोत. हिंदुस्थानातातील पाकिस्तानप्रेम प्रथम संपायला पाहिजे.

वृत्तपत्रात पहिले पान बघणार्‍यांचा हा नेहेमीचा अनुभव आहे. बातम्यांच्या बाबतीत कधी कधी २ ऑक्टोबरसारखा ड्राय डे निघतो. तर कधी ३१ डिसेंबर, गटारी अमावस्येसारखी मुबलकता आहे. सध्या गटारी अमावस्या आहे. वृत्तपत्रांना पूर्वेतिहास आहे. अजून जबाबदारीची जाणीव आहे. नव्याने जन्माला आलेल्या एखाद्या वृत्तपत्रात उथळपणा दिसला, पण एकूण वृत्तपत्रे संयमित वृत्तांकन करताना दिसतात. आई नटी, बाप नट म्हणून नट झालेल्यांची गंभीर विषयावरील पोरकट प्रतिक्रिया ज्यांना पहिल्या पानावर छापण्याच्या पात्रतेची वाटली अशा मोजक्यांनी वातावरण गढूळ करण्यात धन्यता मानली. वृत्तवाहिन्यांबद्दल तर बोलायलाच नको. चर्चेला आज कोणताच सवाल नसेल तर बायकांच्या मासिक पाळीवर चर्चा ठेवली जाते. बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांचे सूत्रधार (अँकर) स्वतःला न्यायाधीश समजायला लागले आहेत. त्यातच मुबलक विषय हाती आल्याने काही वृत्तवाहिन्या पिसाळल्या आहेत.
महिना होत आला तरी अजून दिल्ली बलात्काराची चर्चा चालूच आहे. रात्री-बेरात्री प्रियकरांबरोबर हिंडणार्‍या तरुणीचे कुटुंब म्हणजे हुतात्म्याचे कुटुंब समजून प्रतिक्रिया देत आहे. एकीकडे बलात्कारानंतर खून अशा ५ प्रकरणातील फाशी राष्ट्रपती रद्द करणार. पुण्यातील अशा ताज्या प्रकारावरील हायकोर्टाचा फाशीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. विद्यमान कायद्यात असलेल्या या तरतुदींची अशी वाट लागत असताना आता कसला डोंबलाचा नवा कायदा मागताय. या प्रश्नाच्या मुळाकडे जाण्याचा काहींनी प्रयत्न केला. सरसंघचालक यांच्या भाषणातील एक संदर्भहीन वाक्य काढून दाखवायचे. जेडीयुचा प्रवक्ता शिवानंद तिवारी लगेच आवैसी आणि भागवत यांची तुलना करतो. लगेच वाहिन्यांवर चर्चा सुरू. भाजपचे ९८ आमदार नितीशकुमार सरकारचा पाठिंबा काढून घेतील असे मला वाटते. नरेंद्र मोदींचा अपमान सहन केला, पण सरसंघचालकांचा अपमान भाजपाला कसा चालतो? आसाराम बापूंना तर बेशरम म्हणत टीका झाली. आसारामबापूंनी त्या मीडियाला कुत्र्यांची उपमा दिली हे बरे झाले. आसारामबापू हे धार्मिक गृहस्थ आहेत. प्रत्येक गावातील त्यांच्या प्रवचनास हजारो लोक स्वयंस्फूर्तीने येतात. काळ्या पैशावर चाललेली वृत्तपत्रे आणि विदेशी पैशावर चाललेल्या वृत्तवाहिन्या यांना वर्षभर ही गर्दी दिसत नाही. आसारामबापू हे असे अनुल्लेखीनय असतील तर आत्ताच त्यांच्या एका वाक्याचे भांडवल का केले जाते? नेहमी हजारो श्रोत्यांसमोर बोलणार्‍या आसारामबापूंच्या वक्तव्यात वृत्तमूल्य आहे की नाही हे आधी ठरवा. त्यांना एरवी कधीही प्रसिद्धी न देता फक्त कुप्रसिद्धीसाठी त्यांच्या भाषणांचा वापर करणार्‍या वाहिन्या पत्रकारितेशी व्यभीचार करत आहेत.
बलात्कार प्रकरणात बलात्कार्‍याप्रमाणेच स्वतः ती तरुणीही दोषी आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र या गदारोळात पाकिस्तानी सैनिकांकडून मेंढर भागात भारतीय हद्दीत येऊन २ जवानांचा शिरच्छेद ही गोष्ट प्रत्येक भारतीयाला शरमेने खाली मान घालायला लावणारी आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारतात बोलावून संबंध सुधारतील असे म्हणणार्‍यांची थोबाडे आता शिवली आहेत. एक वेळ नळीत घालून कुत्र्याचे शेपूट सरळ होईल, पण पाकडे हिंदुस्तानशी कधीही प्रेमाने वागणार नाहीत. ४०० वर्षांपूर्वी औरंगजेबाने शिखांचे धर्मगुरू तेगबहादूर यांना पकडल्यावर दिल्लीच्या चांदणी चौकात त्यांचे मस्तक कापून भाल्यावर अडकवून लोकांना पाहाण्यास ठेवले. ४०० वर्षांपूर्वीची ती रानटी जंगली वृत्ती आणि आजच्या पाकिस्तानी सैन्याची वृत्ती ही समान रक्ताने समान आहे. आता वेळ अशी आली आहे की, भारत-पाक मैत्रीचे गोडवे गाणार्‍यांना जोड्याने मारले पाहिजे. पाकशी मैत्रीचे विचार फक्त देशद्रोह्यांच्याच मनात येतील. आज माझ्यापुढे प्रश्न आहे की, हेमराज, सुधाकर यापैकी कोणाचे मस्तक कापले असेल. त्याच्या कुटुंबाने मस्तकविरहित प्रेतावर कसे अग्नीसंस्कार केले असतील. तोंडात तुळशीपत्र ठेवायला तोंडच नाही; काय अवस्था झाली असेल त्या कुटुंबाची. त्या जागी आपला भाऊ, आपला मुलगा आहे अशी कल्पना करा. पश्चिम सीमेवरील आपले हे शेजारी म्हणजे जंगली जनावरे आहेत. आपले मूर्ख, पुळचट भित्रट आणि भ्रष्ट राज्यकर्ते या जंगली जनावरांशी मैत्री करत आहेत.
या राज्यकर्त्यांना जंगली जनावराच्या पंज्यांचा फटका कधी बसत नाही. त्यांना हिना रब्बानीचा हात कुरवाळायला मिळतो. त्यांच्या मैत्रीआडून घुसखोर येतात आणि येथे होणार्‍या बॉबस्फोटात सामान्य माणसे मरतात. १० जनपथ जवळ कधी बॉबस्फोट होत नाही रेसकोर्स रोड, कृष्णमेनन मार्ग, औरंगजेब रोड येथे कधीच बॉबस्फोट होत नाही. ते होतात मुंबईच्या, दिल्लीच्या रस्त्यावर. लोकलमध्ये, बसमध्ये. आपण निवडून दिलेले नेते स्वतः कामांडोच्या गराड्यात सुरक्षित राहतात आणि सामान्य माणसाला पाकिस्तानी जनावरांपुढेे भक्ष म्हणून टाकतात. केवळ सामान्य माणसेच नाही, तर सैनिकांच्या प्राणांचीही या राज्यकर्त्यांना किंमत नाही. युद्ध नसताना किती तरी सैनिक मारले गेले. आता तर भारतीय सैनिकांचे मुंडके कापून पाकिस्तानने आव्हान दिले आहे. एका लाथेचा पाकिस्तान एवढा मुजोर कसा झाला?
संधी एकदाच येते. वारंवार येत नाही. पाकिस्तानला गलितगात्र, शरणागत बनवण्याची संधी एकदा नव्हे दोनदा आली. आपल्या दळभद्री राज्यकर्त्यांनी ती घालवली. १९६५ साली लाहोरपर्यंत धडक मारून पाक सैन्याला पूर्ण नामोहरम केले. लालबहादूर शास्त्रींनी ताश्कंदला जाऊन आयुब खानबरोबर करार केला. व्याप्त काश्मिरचा उल्लेखही न करता लष्कराने जिंकलेली भूमी परत केली. १९७१ साली पाकचे ९० हजार सैनिक पकडले होते. आपल्या कैदेत होते. इंदिरा गांधींनी भुट्टोबरोबर सिमला करार केला आणि जवानांनी पकडलेले ९० हजार पाक सैनिक सोडून दिले. याही वेळी व्याप्त काश्मिरचा प्रश्न काढला नाही. सैन्य पराक्रम गाजवून जे कमावतात ते राज्यकर्ते तहात गमावतात. अशा पराक्रमी सैन्यातील एकाचे मुंडके कापून नेणे हा प्रकार किती भयानक आहे. असाच प्रकार इस्त्रायलबाबत घडला असता तर एव्हाना गाझा पट्टी, पॅलेस्टाईनमध्ये शेकडो बॉब पडले असते. आपण आता खुलासा मागवणार, निषेध खलिता धाडणार. मुंबईवरील हल्ला विसरून क्रिकेट सामने झाले, व्हिसा प्रक्रिया सैल होणार, व्यापार वाढणार. आता हेमराज, सुधाकरच्या हत्येवर ४ दिवस आदळाआपट होईल. कारवाई होणारच नाही. एका आठवड्यात पाकिस्तान मैत्रीचे नगारे वाजू लागतात की नाही हे पाहा. कसाबच्या हल्यानंतर दोन दिवसांत मुंबई पूर्ववत झाली म्हणून शरद पवार खुष झाले होते, तर पुण्यातल्या कुस्ती स्पर्धेसाठी अजित पवारांनी पाकिस्तानी मल्ल बोलावले होते. पाकिस्तान प्रेम असे पाझरत आहे. ज्यांचे हाफ ब्लड पाकिस्तानी आहे ते आणि त्यांचे वंशज आपली माणसे मारतील, सैनिक मारतील, पण पाकिस्तानला खडाही फेकून मारणार नाही. यासाठीच आपण इतर फालतू चर्चा बंद करायला हव्यात. हिंदुस्थानच्या मध्य भागातून अकबर ओवैसी १५ मिनिटांत १०० कोटी हिंदूंची कत्तल करण्याची भाषा करतो. भारतीय सेनादल आपल्यापेक्षा शंभरपट बलवान आहे हे माहिती असूनही भारतीय सैनिकांचे मुंडके कापण्याची आगळीक पाकिस्तान करतो. आपल्याला हिजडे समजूनही छेडछाड चालू आहे. आता आपल्या संघटनशक्तीचे प्रत्यंतर आले पाहिजे. पाकिस्तानपूर्वी, आपल्या अस्तनीतील निखार्‍यांचा, पाकिस्तान प्रेमींचा प्रत्येक क्षेत्रात नायनाट हाच विचार आता अग्रभागी असायला हवा.

Posted by : | on : 22 January 2013
Filed under : Blog, सडेतोड : अरुण रामतीर्थकर, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *