Home » Blog, शैक्षणिक, शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक, स्थंभलेखक » जेऊरकरांच्या ‘अश्‍वत्था’खाली संगणक शिक्षणाचा ज्ञानयज्ञ

जेऊरकरांच्या ‘अश्‍वत्था’खाली संगणक शिक्षणाचा ज्ञानयज्ञ

• शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक•
‘अश्‍वत्थ’कडे येणार्‍या सर्व प्रकारच्या, सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याला मी एक हाडाचा शिक्षक, मार्गदर्शक म्हणून बांधील आहे, नव्हे तो माझा स्वभावच आहे, ती माझी श्रद्धा आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्राथमिक संगणक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शिक्षणाची सोय सोलापूरमध्ये एकाच छताखाली देण्यात ‘अश्‍वत्थ इन्फोटेक प्रा. लि.’ यशस्वी ठरली आहे. ज्ञानाप्रती निष्ठा व सतत ध्यास घेऊन केलेल्या कामाचे फळ म्हणजे आमचे हजारो यशस्वी विद्यार्थी व त्या विद्यार्थ्यांची अश्‍वत्थाप्रती असलेली कृतज्ञता व विश्‍वास, हेच या ज्ञानयज्ञाचे फलित असल्याचे प्रतिपादन अश्‍वत्थ इन्फोटेक प्रा. लि. चे संचालक रोहित जेऊरकर यांनी तरुण भारतशी बोलताना केले.
ROHIT JEURKAR
रोहित जेऊरकर
TEJAL JEURKAR
तेजल जेऊरकर

विद्वत्ता व ज्ञानदानाचे बाळकडू त्यांना त्यांच्या कुटुंबातूनच मिळाले. अशी संस्था सुरू करण्याची मूळ संकल्पना रोहित जेऊरकरांच्या सुविद्य पत्नी तेजल जेऊरकर यांची. तेजल जेऊरकर यांच्या प्रेरणेने व खंबीर नैतिक पाठबळाच्या जोरावर १९९२ साली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘अश्‍वत्थ इन्फोटेक’चा शुभारंभ केला. रोहित व तेजल यांच्या १६ वर्षांच्या अथक परिश्रमाने अश्‍वत्थच्या रोपट्याचे आता भल्यामोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे.  सोलापूर शहराच्या वैभवात भर टाकणारी सुंदर वास्तू २००० साली बांधली.सोलापूरच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय कंप्युटिंग ट्रेंड उपलब्ध करून देणारी ‘अश्‍वत्थ’ही अग्रमानांकित संस्था. विद्यार्थ्यांना ऍकॅडमिक एज्युकेशनबरोबरच आजच्या काळातील ऍडिशनल कॉलिफिकेशनची गरज लक्षात घेऊन २००२ साली महाराष्ट्र ज्ञानमंडळा (एमकेसीएल) बरोबर करार झाला व एमएससीआयटीची सुरुवात सोलापूरमध्ये केली. त्याचबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र अश्‍वत्थमध्ये सुरू केले. यावर्षी अथक प्रयत्नाने ‘सी-डॅक’ सेंटर सुरू केले आहे. भारतातील २४ वे ‘सी-डॅक’ सेंटर सुरू करण्याचा मान अश्‍वत्थ इन्फोटेकला मिळाला.ASHWATH
अश्‍वत्थमध्ये सध्या बेसिक ऑपरेटिंग स्कील्सअंतर्गत डिप्लोमा इन ऑफिस मॅनेजमेंट, अकांउंटस मॅनेजमेंट, ऑफिस ऑटोमेशन, मास्टर इन ऑफिस ऑटोमेशन, लेटेस्ट ऑपरेटिंग टूल्सअंतर्गत विंडोज व्हिस्टा, एम-एस ऑफिस ०७ आदी अभ्यासक्रमासह अनेक मॉड्युलर कोर्सेस आहेत. टॅली ऍकॅडमीअंतर्गत टॅली फायनान्शिअल, अकाउंटिंंग प्रोग्राम, टॅली सर्टिफाईड प्रोफेशनल, अश्‍वत्थ ग्राफिक्स अंतर्गत ग्राफिक्स, मल्टीमीडिया, ऍनिमेशन, वेब ग्राफिक्स अँड ऍनिमेशन, वेबसाईट डिझायनिंग, डी-कॅड, क्रिएटीव्ह ऍनिमेशन इंजिनीअरिंग, वेब प्रोग्रामिंग आदी अभ्यासक्रम आहेत. नेटवर्किंग व हार्डवेअर कोर्सेस  (रेड हॅट लिनक्स) उपलब्ध आहेत.  तसेच अश्‍वत्थने रेडहॅट ग्लोबल लर्निंग सर्व्हिसेस अंतर्गत रेडहॅट लिनक्स इसेन्शिअल, सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेशन, नेटवर्क सिक्युरिटी तसेच प्रोग्रामिंग स्कील्समध्येही अनेक अभ्यासक्रम उपलब्ध केले आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे करिअर प्रोग्राममध्ये बीबीए, एमसीए, बीसीए आदी कोर्सेसही आहेतच. आता या वर्षीपासून सी-डॅक, ऍक्टस डिप्लोमा व आयटी प्रोग्राम्सचे शिक्षण आता सोलापुरातच मिळणार आहे, ही विद्यार्थी, पालक व सोलापूरकरांसाठी आनंदाची बाब आहे.
ह्यूमन रिसोर्सेस डेव्हलप करण्याबरोबरच येत्या काळात बीपीओ सोर्सेसही आणण्याचा मानस रोहित जेऊरकर यांनी व्यक्त केला. प्रशिक्षणार्थींना इंटरनॅशनल सर्टिफिकेशन मिळवून देण्यासाठी अश्‍वत्थमध्ये माफक शुल्कामध्ये अद्यावत सोयी-सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढविणे व टिकवून ठेवणे आम्हाला सहज शक्य झाल्याचे रोहित व तेजल जेऊरकर यांनी सांगितले. परदेशात मोठ्या संधी असूनही माझ्या गावाच्या, सोलापूरच्या प्रेमामुळे गाव सोडू शकलो नाही. सोलापुरातच राहून सोलापूरकरांमुळे मला मोठे यश मिळाले आहे. या मातीचे व समाजाचे ऋण फेडण्याचा अश्‍वत्थच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. सोलापूरच्या प्रगतीत आपलाही सहभाग नोंदविण्याची संधी मिळाल्याबद्दल जेऊरकर दाम्पत्याने समाधान व्यक्त केले.

हैदराबादेत अद्ययावत कार्यालय सी-डॅकच्या प्रकल्पाबरोबरच दोन महत्त्वाचे प्रकल्प अश्‍वत्थ सुरू करीत असून, पहिला महाराष्ट्र ज्ञानमंडळाच्या संयुक्त विद्यमाने अश्‍वत्थ इन्फोटेकने आंध्र प्रदेशमध्ये एमएससीआयटीच्या धर्तीवर एमआयसीआयटीची सुरुवात केली असून, हैदराबादमध्ये अद्ययावत कार्यालय सुरू केले आहे. दुसरा प्रकल्प म्हणजे ‘कॅड-कॅम’च्या नवीन व अद्ययावत अभ्यासक्रमाचा प्रारंभ केला आहे.

’अश्‍वत्थ’ ‘अश्‍वत्थ’ म्हणजे पिंपळ. अनेक ऋषी-मुनींनी अश्‍वत्थाच्या वृक्षाखाली योग-साधना करून दिव्यज्ञान प्राप्त केले. पिंपळाच्या झाडाखालीच भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले, तोच बोधीवृक्ष. ‘अश्‍वत्थ’या संस्थेच्या परिसरातही पिंपळाचे पुरातन झाड आहे. या अश्‍वत्थाच्या झाडाखाली गेल्या १६ वर्षांपासून अनेक विद्यार्थी संगणकाचे अत्याधुनिक ज्ञान प्राप्त करीत आहेत.

…………………………………………….
दै. तरुण भारत, सोलापूर.
Posted by : | on : 7 Nov 2011
Filed under : Blog, शैक्षणिक, शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक, स्थंभलेखक
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *