Home » Blog » मागास ते नाहीत, आपणच आहोत

मागास ते नाहीत, आपणच आहोत

सडेतोड : अरुण रामतीर्थकर

बातमी मालदिव या छोट्याशा देशातील आहे. छोटा देश म्हणजे केवढा? राजीव गांधी पंतप्रधान असताना एल.टी.टी.इ.चे म्हणजेच लंकेतील सशस्त्र तामिळींचा १४-१५ जणांचा गट चालून गेला आणि देश चक्क ताब्यात घेतला. पंतप्रधान मोहंमद कय्यूम यांनी राजीव गांधी यांना मदत मागितली. आपल्या नौदलाची एक तुकडी लगेच रवाना झाली. भारतीय नौसेना येत आहे कळताच तामिळी बंडखोर घाबरून लगेच पळून गेले. देश मुक्त झाला. हा देश म्हणजे लंकेपेक्षा लहान असलेले हिंदी महासागरातील एक बेट आहे. मुस्लिमबहुल अर्थात सेक्युलर नाही, तर इस्लामी राज्यपद्धती मात्र कट्टरता नाही. राजधानी मालेपासून ८० किलोमीटरवरील राटोल येथील हल्लुदुफारी न्यायालयाने एक निकाल दिला. ४० वर्षांचा पुरुष आणि १७ वर्षाची मुलगी यांच्यात झालेल्या शरीरसंबंधांचे हे प्रकरण होते. मुलीच्याच पुढाकाराने हे संबंध आले होते. वैषयिक भावनेने अल्पवयीन मुलीस स्पर्श करणे हा देखील त्या देशात गुन्हा आहे. त्यामुळे या पुरुषास १० वर्ष सक्तमजुरी झाली. मुलगी अल्पवयीन असली तरी तिने पुढाकार घेतल्याचे सिद्ध झाल्याने तिला १०० चाबकाचे फटके अशी शिक्षा झाली. अल्पवयीन असल्याने आता फटके बसणार नाहीत. पुढील वर्षी ती १८ वर्षाची म्हणजे सज्ञान झाल्यावर वाढदिवसाला तिला १०० फटक्यांची भेट मिळेल.
हाच प्रकार आपल्याकडे झाला असता तर फक्त पुरुषालाच शिक्षा झाली असती; मुलीला नाही. कारण आपण पुढारलेले सुधारणावादी आहोत. पुण्यात शाळकरी मुला-मुलींचे २ हजार पालक जयंत पवारांच्या गावाबाहेरच्या हॉटेलात दारू पिऊन नाचायला परवानगी देतात. हा सुधारणावादी दृष्टिकोन. मुलगी झाली म्हणून काय झाले. तिलाही मुलासारखे स्वातंत्र्य हवेच. कॉलेजच्या नावाखाली पबमध्ये जाऊन  दारू पिऊन हिडीस नाच करणार्‍या तरुणींना झिंज्या पकडून घेणारे प्रमोद मुतालिक तालीबानी राक्षस ठरतात. मग शाळकरी मुला-मुलींना दारू प्यायला घेऊन जाणारे पवार मसिहा, एंजल्स, देवदूत म्हणायला हवेत. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यानंतर स्त्री स्वातंत्र्याचा एवढा विचार(?) पवारांनीच केला.
३१ ऑगस्ट २००१, काश्मीर खोर्‍यात महिलांनी बुरखा घालायला प्रारंभ करण्याची शेवटची तारीख, त्यानंतर बुरखा नसेल तर तरुणींच्या चेहर्‍यावर ऍसिड फेकले जाण्याचा इशारा, ३१ ऑगस्टपूर्वी महिला बुरख्यात दिसू लागल्या. गेल्या ११ वर्षांत बुरखा काश्मीरबाहेर केरळपर्यंत गेला. ऍसिड हल्ल्याची धमकी न देता. आमच्या मुली जिन पँट आणि टी शर्ट घालून कॉलेजला जाणार. मुलांची छाती आणि मुलीची छाती यातील फरक ना तिच्या आईला कळतो ना तिला. काही मुली कॉलेजलाही बुरखा घालून येतात. हे एक टोक ते एक टोक. आता तर काय इव्ह टिझिंगला ५० हजार रु. दंड आहे. इव्ह टिझिंगमागे ड्रेस महत्त्वाचा असतो हे लक्षातच घेतले जात नाही. बुरखा प्रतिगामी आणि जिन पँट व छाती न झाकणारा टी शर्ट हा ड्रेस पुरोगामी, सुधारणावादी ठरतो.
जयंत पवारांनी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यावर केवढे उपकार केले आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीला एक नवी दिशा मिळवून दिली. नतद्रष्ट पोलिसांना हा पुरोगामीपणा कळलाच नाही. त्यांनी धाड घातली ती घातली वर पवारांचे नावही जाहीर केले. पवार फॅमिलीच्या जीवावर मंत्री झालेल्या आर.आर. पाटलांना हे कसे खपावे? त्यांनी फतवाच काढला. रेव्ह पार्ट्या, चिल्लर किंवा थिल्लर पार्ट्या यावर धाड घालणे हे पोलिसांचे कामच नाही असे जाहीर केले. बोला जयंतराव. आता पुढची पार्टी कधी आयोजित करताय. पुण्यातले आणखी हजार पालक आपल्या पोरींना दारू पिऊन नाच करायला पाठवण्यासाठी आतुर झाले आहेत.
पुरोगामी, सुधारणावादी म्हणत काय चालले आहे. हाच पुरोगामीपणा असेल तर आपण प्रतिगामी होऊ. मालदिवच्या न्यायालयाचा निकाल आणि तालिबान्यांची बुरखा सक्ती सकृतदर्शनी रानटी, जंगली, प्रतिगामी वाटली तरी आजची समाजव्यवस्था, नैतिक अधःपतन पाहता आता रानटी उपायानीच उपाय केला पाहिजे. १८ वर्षांच्या मुलीस चाबकाचे १०० फटके ही शिक्षा अंगावर शहारे आणणारी असेल, पण ती जाहीर झाल्यानंतर ती मुलगी, तिच्या मैत्रिणी, समवयीन मुली या पैकी एक तरी असा आचरटपणा करेल का? कॉलेजला जाणार्‍या मुलींच्या पर्समध्ये गर्भनिरोधक गोळ्या असतात. ती सज्ञान, स्वतंत्र म्हणून दुर्लक्ष करायचे. मोबाईलवरून अश्‍लील फोटो काढून ब्लॅकमेलिंग केले अशा तक्रारी आहेत. असे करणार्‍या तरुणाला शिक्षा झालीच पाहिजे. मात्र त्याच्याबरोबर लॉजवर जाऊन विवस्त्र होणार्‍या तरुणीचा काहीच दोष नाही? आपली त्याबाबत भूमिका काय?
सेन्सॉर बोर्डावर आता टीका होत आहे. तसेच प्रौंढासाठी असलेले चित्रपट दूरदर्शनवर दाखवायचेच नाहीत असा दूरदर्शनचा निर्णय आहे. महेश भट्ट नावाचा एक बिनडोक आणि म्हटला तर देशद्रोही चित्रपट निर्माता आहे. त्याच्या राज-३ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने खूप कात्री लावली. ते सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यानाच फटकारले. असल्या घाणेरड्या गोष्टी टाळून तुम्हाला सिनेमा
रविवार, दि. २३ सप्टेंबर २०१२काढता येत नाही का असा प्रश्‍न न्यायालयाने महेश भट्टला विचारला. अशी ठोस भूमिका इतर क्षेत्रात घेतली पाहिजे. उलट ही भूमिका टीकास्पद ठरते. चाबकाचे फटके, शिरच्छेद, जमिनीत गळ्यापर्यंत गाडून डोक्यावर दगडफेक या शिक्षा जरूर रानटी आहेत. बुरखा घातलाच पाहिजे ही सक्ती योग्य नाही. मग हे केव्हा? भान असेल तेव्हा. आज आपण बेभान झालो आहोत. पशुंना ज्याप्रमाणे नैतिकता नसते. नर मादी एवढेच कळते. आपली बौद्धिक पातळी त्या स्तरावर जाऊन पोहोचली आहे. पशुप्रमाणे जीवन जगणारे आपणच रानटी मागास झालो आहोत. प्रबोधनाने अक्कल येण्याची वेळ आता राहिलेली नाही. मनापासून पटत नसला तरी तालीबानी फतवा आणि मालदिवच्या न्यायालयाचा निर्णय समाजहितैषि ठरतो.

रविवार, दि. २३ सप्टेंबर २०१२
Posted by : | on : 23 Sep 2012
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *