Home » Blog » मोगलस्तानचे कारस्थान

मोगलस्तानचे कारस्थान

मोगलस्तानचे कारस्थान
पाकिस्तान, बांग्लादेश नव्या मोगलस्तान निर्मितीच्या प्रयत्नात
 

•अमर पुराणिक•

सर्वात दुदैवाची गोष्ट म्हणजे  पश्‍चिम बंगाल विधानसभेतील ३२ टक्के  जागा आणि लोकसभेतील १८ टक्के जागेवर कोण उमेदवार निवडून येणार? हे घुसखोर ठरवतात. यापेक्षा दुदैवाची गोष्ट ती कोणती? की या देशाचा नागरिक आपला उमेदवार ठरवत नसुन या उपर्‍यांच्या मर्जीवर भारतात सत्ता कोणाची हे ठरते. यामुळे भाजपा वगळता इतर राजकिय पक्ष म्हणजे कॉंग्रेस, कम्यूनिस्ट, समाजवादी आदी पक्ष या घुसखोरांचे लांगुलचालन करत त्यांना रेशन कार्ड, निवडणूकीची ओळखपत्रे पुरवून आपला मतदानाचा गठ्‌ठा पक्का करत आहेत. याच गठ्‌ठ मतदानाच्या जोरावर निवडून आलेली मंडळी या घुसखोंराच्या विरुद्ध कारवाई न करता त्याचे तळवे चाटतात. केवळ मतपेटीचे राजकारण करत कॉंग्रेसने गेल्या ६० वर्षात सत्ता आपल्या हातात ठेवली. मुसलमानांची गठ्‌ठ मतासाठी चाटूगीरी करत मुस्लिम व्होट बँक सांभाळत आहेत. पण आता या अतिरेक्यांचे स्वप्न मोगलस्तान साकारायला या कॉंग्रेसनेच मोठा हातभार लावला आहे हे सर्वांच्या लक्षात येवू लागेल. या सर्व माहितीचा व अहवालांचा अभ्यास केल्यावर हे दिसून येते की, आता मोगलस्तानचे स्वप्न त्यांच्या दृष्टीपथात येवू लागले आहे……………………………………………………..

  मोगलस्तान हे नाव भारतातील मुस्लीमांसाठी निर्माण केल्या जाणार्‍या किंवा होवु घालणार्‍या स्वतंत्र राष्ट्राचे असुन मोगलस्तान किंवा मोगलीस्तान हे धर्मांध मुस्लिम संघटनांचे भारताच्या दुसर्‍या फाळणीचे प्रयत्न आहेत.  हे तथाकथीत नवे मुस्लिम राष्ट्र उत्तर व पुर्व भारतात निर्मीले जात आहे. यात उत्तर भारत व पुर्व भारताचा समावेश आहे आणि याची निर्मिती पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्या जोडण्यातुन होणार आहे. पाकिस्तान व बांग्लादेशाला जोडणार्‍या उत्तर भारतातील भल्यामोठ्‌या भुप्रदेशाला या मोगलस्तानात समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे.  या उत्तर व पुर्व भारतातील भुप्रदेशापैकी मुस्लीमबहुल गावांची संख्या मोठी आहे. याचाच फायदा घेत भारताची ही दुसरी फाळणी करण्याचा प्रयत्न आहे.
खरे तर याला दुसरी फाळणी म्हणणे योग्य होणार नाही कारण भारत-पाक फाळणीपुर्वीही हिंदुस्थानचे अनेक तुकडे झालेले आहेत. ही योजना आखली आहे बांग्लादेशातील जहांगीरनगर येथील ‘मोगलस्तान रिसर्च इंन्स्टीट्‌यूट’ (एम आर आय) या संस्थेने, आणि या संकल्पनेचे आश्रयदाते आहेत पाकिस्तानातील ‘इंटर सर्व्हीसेस इंटिलिजन्स’ अर्थात ‘आयएसआय’ आणि बांग्लादेशातील ‘डायरेक्टर जनरल ऑफ फोर्स इंंटीलिजन्स’ म्हणजे ‘डीजीएफएल’ या दोन संस्था. ‘मोगलस्तान रिसर्च इंन्स्टीट्‌यूट ऑफ बांग्लादेश’ या संस्थेने या तथाकथित मोगलस्तान राष्ट्राचे नकाशे प्रकाशित केले आहेत. भारतातील इस्लामी जिहादी संघटना या शस्त्रास्त्रसज्ज असुन त्यांना मोठ्‌या प्रमाणात अर्थसहाय्य शेजारच्या इस्लामिक राष्ट्रकडून होत असते. सन १९८८ मध्ये पाकिस्तानचे तत्कालिन अध्यक्ष झीया-उल-हक यांनी पुकारलेल्या भारताच्या फाळणीचा भपकेबाज व विध्वंसक अशा ऑपरेशन टोपॅकचाच हा भाग आहे.

भारतातील मुस्लीमांना बळ देऊन हिंदुुंच्या खच्चीकरणासाठी या मोगलीस्तानच्या संकल्पनेला अल कायदाचा म्होरक्या ओसामा बीन लादेनने पाठींबा दिला आहे आणि यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. लादेन बरोबरच मुंबई अंडरवर्ल्ड,  कराची स्थीत कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम, जमात-ए-इस्लाम, लष्कर-ए-तोय्यबा, जैश-ए-मोहंम्मद, हिजबूल मुजाहिदीन, हुजी, सीमी आदी अतिरेकी संघटनांनी एकत्रीत आणि बिनशर्त पाठींबा या अखंड इस्लामिक राष्ट्राच्या संकल्पनेसाठी दर्शविला आहे. सीमी (स्टूडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) आणि इंडियन मुजाहिदीन या भारतातील संघटनांनी हिंदूं विरुद्ध जिहाद पुकारला असुन यांच्या राष्ट्रद्रोही कारवाया सतत सुरु आहेतच. या संस्थांनांही मोगलस्तानची संकल्पना साकारण्यासाठी भारतांतर्गत कारस्थाने रचुन अंतर्गत कलह माजवण्यासाठी बळ पुरविण्याचे काम या अतिरेकी संघटना करीत आहेत.
लष्कर ए तोयबाने हे जाहीर केले आहे की हिंदु हे इस्लामचे वैरी आहेत आणि त्यांना एक तर धमार्ंतरीत करावे अथवा मारुन टाकावे, अशी जाहीर घोषणा करुन भारताविरुद्ध लष्कर-ए-तोयबाने ‘धर्मयुद्ध’ पुकारले आहे. लष्कर-ए-तोयबाने हे वारंवार आपल्या संकेतस्थळावरून व पत्रकाद्‌वारे सांगितले आहे की, भारतातील लोकशाहीला सुरुंग लावून हिंदुंचा पुर्ण नाश करणे, हेच त्यांचे मुख्य ध्येय आहे. जैश-ए-मोहम्मदने शपथच घेतली आहे की, फक्त काश्मिरच नव्हे तर, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर इस्लामचा हिरवा झेंडा रोवुन संपुर्ण भारत काबीज करु. असा मनसुबाच त्यांनी रचलेला आहे. हरकत उल जिहादी( हुजी) ही संघटना ही यात मागे नाही. सिमीनेही भारताला इस्लाममय करण्याचा निर्धार केला असुन भारतात इस्लामची सत्ता स्थापन करुन खिलाफतीचे पुनरुत्थान करण्याचा सीमीचा प्रयत्न आहे.  भारतातील निधर्मवाद, लोकशाही आणि राष्ट्रवाद ही भारतीय राज्यघटनेतील मुख्य बलस्थाने आहेत आणि ही तिन्ही तत्वे इस्लाम विरोधी आहेत. इंडियन मुजाहिदीननेे लखनौ, वाराणसी, फैजाबाद, बंगळूर, जयपूर, अहमदाबाद, नवीदिल्ली  आदी अनेक ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्विकारली आहे. हे इ-मेल्स इंडियन मुजाहिदीनच्या मोहम्मद बीन कासीम, महम्मद घौरी आणि मोहम्मद गजनवी आदी कुख्यात इस्लामी दहशतवाद्यांनी पाठवली आहेत. मानवजातीतील सर्वात खालच्या दर्जाचे रक्त कोणाचे असेल तर ते हिंदुंचे आहे अशी हिणवणारी भाषा ते वापरतात. हिंदुंचा इतिहास इस्लामच्या विरोधात लिहीला आहे. तो मुस्लिमांच्या दृष्टीने अपमानकारक असल्याचे ते म्हणतात. इंडियन मुजाहिदीनचे अतिरेकी इ-मेल द्वारे धमकी देतात की, इस्लाम धर्माचा स्विकार करा आणि आपला जीव वाचवा, अन्यत: विद्धंसक हार पहा आणि मरायला तयार व्हा. ते पुढे म्हणतात की, हिंदु हा सर्वात अविश्‍वसनीय असून अजुनही जगाने हिंदुंची लायकी ओळखलेली नाही. हिंदूंना आता शिवा, राम, कृष्ण, हनुमान आदी देवता वाचवायला येणार नाहीत. त्यामुळे हिंदूंना आता मुसलमान होण्याशिवाय पर्याय नाही, धर्मांतर न केल्यास हिंदूंचे गळे मात्र निश्‍चित कापू.
मुळात पाकिस्तानची निर्मितीच मुस्लीम राष्ट्र या संकल्पनेतून झाली. महंमद अली जीना यांची भूमिका ही फक्त आत्ताचे पाकिस्तान आणि बांग्लादेश मिळवणे अशी नव्हती, तर त्यांची मागणी या मोगलस्तानच्या नकाशाला अनुशंगुनच होती. जीना यांनी पाकिस्तानसाठी मागणी केलेल्या प्रांतात जम्मु-काश्मिर, पंजाब, हरियाणा उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल  या भारतातील राज्यांचाही समावेश होता. पण तेव्हा ही राज्ये पाकमध्ये समाविष्ट करण्यास मोठा विरोध झाला होता, त्यामुळे जिनांना पश्‍चिम पाकिस्तान(आत्ताचे पाकिस्तान) व पुर्व पाकिस्तान म्हणजे बांग्लादेश यावरच समाधान मानावे लागले. हिंदूंना भारत आणि मुसलमानांना पुर्व व पश्‍चिम पाकिस्तान (बांग्लादेश) अशी फाळणी झाल्यानंतरही मोहंमद अली जीना यांचा सचिव मन-उल-हक चौधरी हा फाळणीनंतर आसाम मध्ये रहात होता. नंतर तो आसामचा मंत्रीही झाला. १९४७ मध्ये त्यानेे जिनांना लिहीले होते की, ‘कायदे आझम!, फक्त ३० वर्षे वाट पहा पाकिस्तानला आसाम हे राज्य  भेट म्हणून देतो.’  मोगलस्तानच्या म्हणजेच महंमद अली जीनांच्या त्या स्वप्नाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम आता या अतिरेकी संघटनांनी हाती घेतले आहे.  काही अभ्यासकांच्या हे आता  दृष्टीस पडले असले तरी, याची कार्यवाही गेल्या पन्नास साठ वर्षांपासुनच सुरु आहे. अतिरेक्यांच्या वाढत्या कारवाया आणि भारतीय सेनेचे अहवाल पाहिल्यावर काही विचारवंताच्या हे लक्षात आले. तसेच या पट्‌टात वेगाने वाढलेल्या मुस्लीमांची संख्या आणि पाकिस्तान आणि बांग्लादेशातून झालेली प्रचंड मोठी घुसखोरी यामुळे ही गोष्ट हळुहळू स्पष्ट होऊ लागली आहे. या कारवाया फक्त याच म्हणजे उत्तर व पुर्व भारताच्या पट्‌ट्‌यात सुरु नसुन मुंबई, हैदराबाद, केरळ, आसाम आदी भागातही सुरु आहेत. त्यामुळे आता यात काही गुपीत वगैरे असे काही राहिले नाही. गेल्या २० वर्षांपासून सुरु असलेल्या काश्मीरमधील कारवाया याचा पुरावाच आहे. आता काश्मिर हे मुस्लिमबहुल राज्य झाले आहे. येथील हिंदूंना म्हणजेच काश्मिरी पंडितांना गेल्या वीस एक वर्षांत काश्मिर मधून पारांगद व्हावे लागले आहे. ज्या हिंदूंनी काश्मिरातून पलायन केले नाही, त्यांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. काश्मिर मधील मुसलमान भारतीय घटनेतील ३७० कलमाचा यथेच्च उपभोग घेत आहेत. लडाख मध्येही आता हिंदू व बौद्धांची हिच अवस्था आहे. येथे बहुसंख्य असलेले बौद्ध बांधव आता अल्पसंख्यक झाले आहेत. काश्मिर खोर्‍यात आज मुस्लिमांची संख्या ९८ टक्के आहे. जम्मुमधील हिंदूंवर वारंवार हल्ले करुन पळवून लावण्याचा प्रयत्न सुरु आहे.
उत्तर भारतात राजस्थानचा काही भाग पंजाब व हरियाणाचा काही भाग या पट्‌ट्‌यात तेथील लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिमांची संख्या आता  ६६ टक्क्यांवर केली आहे. येथील हिंदूंची मंदिरे मुस्लिम धर्मांधांनी तोडून टाकली आहेत. आता हळूहळू राजस्थानात पाय पसरण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुसलमानांचा जननदर प्रचंड मोठा आहे. एकेका व्यक्तीला कमीत कमी १२ ते १५ आपत्ये आहेत. ही आपत्यांची आकडेवारी फक्त याच भागातली नसून संपुर्ण भारतातच ही परिस्थिती आहे. उत्तर भारतातील मुस्लीमबहुल शहरे उदा. जुनी दिल्ली, भारतातल्या पंजाब प्रांतातील मालेरकोटा आदी भागातून जिहादी अतिरेक्यांना येथील स्थानिक मुसलमानांचे मोठ्‌या प्रमाणात संरक्षण व सहकार्य मिळत असते. या गावांबरोबरच  पश्‍चिमी उत्तर प्रदेशातील आग्रा, अलीगढ, आझमगढ, मेरठ, बीजनोर, मुझफ्फरनगर, कानपूर, वाराणसी, बरेली, सरहानपूर, मुरादाबाद आदी शहरातूनही या जिहादी अतिरेक्यांना स्थानिक मुसलमान सहकार्य करतात, आणि हे अतिरेकी प्रस्तावित मोगलीस्तानच्या या पट्‌ट्‌यात बॉम्बस्फोट, दंगली घडवून येथील हिंदूंना पारांगद व्हायला भाग पाडत आहेत. वरील सर्व गांवांसह उत्तर प्रदेशातील माऊ, लखनौ, कानपूर आदी परिसरात गेल्या दहा वर्षात मुसलमानांची संख्या वाढून ती जवळजवळ दुपटीच्यावर पोहोचली आहे.
भारत-नेपाळ सरहद्दीजवळची भारताकडील राज्ये म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार आदी भागात गेल्या काही वर्षात जवळजवळ १९०० इस्लामिक चळवळी झाल्या आहेत. या भागात मदरशांची संख्या आश्‍चर्यजनकरित्या वाढली आहे. भारत-नेपाळ सीमेवर गेल्या काही दिवसातच साधारण ११०० मदरसे भारताच्या भूमीवर निर्माण झाले आहेत आणि नेपाळच्या भूमीत ही संख्या याच प्रमाणात असल्याची माहीती सशस्त्र सीमा बलाचे डायरेक्टर जनरल तिलक काक यांनी दिली आहे. इंडियन टास्क फोर्स ऑन बॉर्डर मॅनेजमेंटने आपल्या २००० मधील अहवालात म्हटले आहे की, भारत-नेपाळ सीमेवर मदशांची संख्या खुप मोठ्‌याप्रमाणात वाढत असून अल्पसंख्यक असलेल्या मुस्लीमांची संख्या मोठ्‌या प्रमाणात वाढल्याने ते आता बहुसंंख्य झाले आहेत. भारत-नेपाळ सीमेवर भारताच्या भूभागात ३४३ मशिदी ३०० मदरशे आणि १७ मशिद वजा मदरसे प्रती दहा किमी. परिसरात आहेत. तसेच सीमेवरील नेपाळच्या भूभागात २८२ मशिदी, १८१ मदरसे आणि आठ मशिद वजा मदरसे आहेत. या मशिदी आणि मदरशांना मोठ्‌या प्रमाणात वित्त पुरवठा होत असतो. हा वित्तपुरवठा सौदी अरेबिया, इराण, कुवेत, पाकिस्तान, बांग्लादेशातून होत असतो. या मशिदी, मदरशातील उलेमा या राष्ट्रांच्या नेपाळमधील बँका, उद्योजक व दुतावासाबरोबर घनिष्ठ संबध ठेवून आहेत. या आर्थिक व्यवहारांचे संचालन इस्लामिक डेव्हलपमेंट बँक, जेद्दाह, पाकिस्तानातील हबीब बँक येथून होते. आखाती देशातील भारतीय मुस्लिमांशीही येथून व्यवहार होतो. पाकिस्तानाच्या हबीब बँकेची नेपाळ मधील हिमालया बँकेबरोबर भागीदारी झाल्यापासून त्यांनी आपले जाळे भारत-नेपाळच्या सीमावर्ती भागात मोठ्‌याप्रमाणात पसरवले आहे. परदेशी चलनाचे भारतीय चलनात परिवर्तनही नेपाळमध्येच करुन हा पैसा भारतात आणला जात असल्याचा संशय अनेक तज्ञांनी व गुप्तचर विभागाने व्यक्त केला आहे. या सीमावर्ती भागातील मशिदी व मदरशांना मुस्लिम नेते, तबलिगी जमात आणि नेपाळमधील पाकधार्जिणे नेते वेळोवेळी भेट देत असतात.
२००१ च्या सर्वेक्षणानुसार पश्‍चिम बंगाल व आसाम ही भारताची सर्वात कमकुवत बाजु ठरली आहे. भारत-बंाग्लादेश सीमेवर भारताच्याहद्‌दीत ९०५ मशिदी व ४३९ मदरसे आहेत. पश्‍चिम बंगाल मधील मुस्लिमांची संख्या तेथील एकुण लोकसंख्येच्या तुलनेत २८ टक्के इतकी आहे. तर आसाम मधील एकुण लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिमांची संख्या ३१ टक्के इतकी आहे.
ज्येष्ठ पत्रकार व भाजपा नेते अरुण शौरी यांनी सन १९९४  व २००४ मध्ये इंडियन एक्स्प्रेस दैनिकात या विषयावर सखोल अभ्यास करुन आपल्या लेखाद्वारे प्रकाश टाकला होता. पण आपल्या शासनकर्त्यांच्या डोक्यात अजुनही प्रकाश पडलेला नाही. भारतातील मुस्लिमांची संख्या सन १९५१ च्या जनगणनेप्रमाणे ९.९ टक्के होती. सन १९७१ मध्ये ती १०.८ तर १९८१ च्या जनगणनेप्रमाणे ती ११.३ इतकी होती. सन १९९१ मध्ये ती १२.१ वर पोहोचली. सध्या म्हणजे गेल्या काही वर्षात मात्र मुस्लिमांची संख्या फार वेगात वाढली असून ती २८ टक्क्यांवर पोहोचली आहे. प. बंगालच्या सीमावर्ती जिल्ह्यात मुस्लिमांची संख्या सर्वात जास्त आहे. दक्षिण व उत्तर परगणा जिल्ह्‌यात ५६ टक्के, नादीया येथे ४८ टक्के, मुर्शिदाबाद येथे ५२ टक्के, मालदा येथे ५४ टक्के आणि पश्‍चिम दिनाजपूर व इस्लामपूर येथे ६० टक्के आहे. ही आकडेवारी पाहुन अल्पसंख्यांक म्हणवून ढोल बडवून मुसलमानांचे लांगुलचालन करणार्‍या सरकारला काहीच वाटत नाही कारण याच घुसखोरांचे गठ्ठामतदानात रुपांतर करुन कॉंग्रेस सतत सत्तेत राहीली आहे. मुस्लिमांच्या या आकडेवारीने हिंदूंना आणि विचारवंतांना मात्र चक्रावून टाकले आहे. हिच स्थिती गंगा व हुगळी नदी किनार्‍याचा भाग, कुचबिहार, कटियार, पुर्णीया व पुर्व बिहारमध्ये देखील आहे. १९४८ साली त्रीपूरा येथे ५६ टक्के लोक संख्या ही अदिवासी बांधवांची होती, आता ही संख्या घटून फक्त २५ टक्क्यांवर आली आहे. चेन्नई येथील सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज यांच्या ‘रिलिजीअस डेमोग्राफी ऑफ इंडिया’ या ए.पी. जोशी, एम.डी. श्रीनिवास व जे.के. बजाज यांनी लिहिलेल्या पुस्तकातही दहा वर्षात मुस्लिम लोकसंख्येने १२.५ (१९९१) टक्क्यांवरुन ३०.३ टक्क्यांवर मोठी उडी मारली असल्याचे म्हटले आहे. ‘द पायोनिअर’ मध्ये संध्या जैन यांनी लिहीलेल्या ‘इंडियाज कॅन्सर वॉर्डस’ या लेखात हाच धोक्याचा इशारा दिला आहे. अरुणाचल प्रदेशचे आयजीपी आर. के. ओहरी आणि माजी खासदार बी.एल. शर्मा यांनीही याबाबत सावधगीरीचा इशारा दिला आहे. जे.के. बजाज व त्यांच्या विश्‍लेषक सहकार्‍यांनी येथील परिस्थितीचा अभ्यास करुन आढावा घेतला असता मोगलस्तानच्या निर्मितीसाठी बांग्लादेशच्या मोगलस्तान रिसर्च इन्स्टिट्‌यूट व आयएसआयने जी आकडेवारी व मोगलस्तान निर्मितीची पार्श्‍वभूमी मांडली आहे, या दोन्ही आढाव्यात कमालीचे साम्य असल्याचे दिसून आले.
बांग्लादेशमधील मानव अधिकार आयोगाचे कार्यकर्ते सलाम आजाद यांनी तालीबानसाठी बांग्लादेश हे सर्वोत्तम स्थान असल्याचे म्हटले आहे. मदरशामधुन जगातील सर्वोत्तम शिक्षण दिले जात असून मुस्लिम हेच जगात सर्वश्रेष्ठ असल्याची मखलाशीही हा विद्वान करतो. बीगर मुस्लिमांना मारुन, दंडून, बलात्कार करुन, विवाह करुन त्यांना बाटवले पाहिजे कारण बीगर मुस्लिम स्त्री ही ‘माल-ए-गनिमत’ आहे अशी गरळ हे मदरशातले तथाकथीत उच्चशिक्षीत लोक ओकतात. गो हत्या तर सर्रासपणे केली जाते. 
पश्‍चिम बंगालचे भाजपा नेते तथागत रॉय यंानीही यावर अनेकवेळा बोलके भाष्य केलेले आहे. केंद्रात भाजपाचे सरकार असताना याला चाप बसला होता. तेथील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष समुज्जल भटाचार्य यांनी संागीतले आहे की, पश्‍चिम बंगाल मधील आदिवासी भागात बांग्लादेशी धर्मांध मुस्लिम घुसखोरांनी पुर्ण कब्जा केला आहे आणि हळूहळू पसरत अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मेघालय आदी ठिकाणीची भूमीही बळकावली आहे. आता सिमावर्ती भागात  जे थोडेफार हिंदू रहातात त्यांना अतिशय हिन वागणूक मिळत असून आपला जीव मुळीत धरुन जगत आहेत.
केंद्रात १९९९-२००४ या कालावधीत अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातील भाजपाचे सरकार असताना तेव्हाचे गृहमंत्री लोहपुरुष लालकृष्ण अडवाणी यांनी पश्‍चिम बंगालच्या घुसखोरीच्या समस्येबाबत ठोस निर्णय घेतले होते व पश्‍चिम बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्‌टाचार्य यांच्या सरकारनेही अडवाणीची भूमिका स्विकारत कारवाई केली होती. पण २००४ च्या निवडणूकीत सत्तेत आलेल्या कॉंग्रेस प्रणित संपुआ सरकारने ही धोरणे बसणात गुंडाळून ठेवली आणि नंतर बुद्धदेवही स्वस्थ बसले. १४०० वर्षांच्या मुसलमानांच्या या जिहादी प्रयत्नाला जातीय दंगली, बॉम्बस्फोट, दंगली, हिंदुंच्या कत्तली व धर्मांतरण आदी गुप्त कारवायांनी सावकाश मुर्त रुप आणले आहे. भारत सरकार जर असेच मुस्लिम गठ्ठा मतांचे राजकारण करत मुढासारखी बसली तर मोगलस्तानची संकल्पना साकारायला वेळ लागणार नाही.
भारताच्या टास्कफोर्स ऑन बॉर्डर मॅनेजमेंटच्या अहवाला प्रमाणे एकुण १५ कोटी बांग्लादेशींनी भारतात घुसखोरी केली आहे, दरवर्षी तीन लाख बंाग्लादेशी नागरिक भारतात घुसखोरी करतात, तर एकट्‌‌‌या दिल्लीत १३ लाख बंाग्लादेशी घुसखोर राहतात. मॉर्निंग सन (४ ऑगस्ट १९९१) या बांग्लादेशी वृत्तपत्रात म्हटले आहे की, बांग्लादेशच्या सरकारने एक कोटी बांग्लादेशी हरवले असल्याचे नमुद करुन या १ कोटी लोकांनी भारतात पलायन केल्याचे म्हटले आहे.
या घुसखोरीमुळे फक्त भारताच्या अर्थव्यवस्थेवरच विपरित परिणाम होत नसुन येथील नागरिकांना याचा त्रास भोगावा लागतोय. हे बांग्लादेशी घुसखोर मुसलमान येथील हिंदुंच्या जमिनी व पैसा बळकावून उलट हिंदूंना त्रास देवून त्यांना तेथून पळवून लावत आहेत. शिवाय या घुसखोरांच्या अंतर्गत कारवायांमुळे शांततेला तडा जावून विकासाला खिळ बसते आहे. सर्वात दुदैवाची गोष्ट म्हणजे  पश्‍चिम बंगाल विधानसभेतील ३२ टक्के  जागा आणि लोकसभेतील १८ टक्के जागेवर कोण उमेदवार निवडून येणार? हे घुसखोर ठरवतात. यापेक्षा दुदैवाची गोष्ट ती कोणती? की या देशाचा नागरिक आपला उमेदवार ठरवत नसुन या उपर्‍यांच्या मर्जीवर भारतात सत्ता कोणाची हे ठरते. यामुळे भाजपा वगळता इतर राजकिय पक्ष म्हणजे कॉंग्रेस, कम्यूनिस्ट, समाजवादी आदी पक्ष या घुसखोरांचे लांगुलचालन करत त्यांना रेशन कार्ड, निवडणूकीची ओळखपत्रे पुरवून आपला मतदानाचा गठ्‌ठा पक्का करत आहेत. याच गठ्‌ठ मतदानाच्या जोरावर निवडून आलेली मंडळी या घुसखोंराच्या विरुद्ध कारवाई न करता त्याचे तळवे चाटतात.
 गृहमंत्रालयाची उदासिनता एक दिवस देशाला दहशतवाद व मोगली गुलामगीरीच्या खाईत लोटणार आहे. डीजीएफआय आणि आयएसआय या पाकिस्तान व बांग्लादेशी गुप्तचर संस्था पश्‍चिम बंगाल आणि आसाम ही भारताची दोन राज्ये युद्ध न करताच निवडणूकीद्वारे काबीज करु पहात आहेत. पश्‍चिम बंगाल राज्याच्या केबीनेट मंत्रीमंडळात  कमीतकमी ५ ताकदवान मुसलमान मंत्री आहेत.  यात अब्दूर रजाक मुल्ला ( मीनीस्टर आ्रफ लँड ऍन्ड लँन्ड  रिफॉर्मस), अनिसुर रहमान(ऍनिमल सिसोर्स डेव्हलपमेंट), मुर्तुजा हुसेन(शेती आणि पणन मंत्री), अनरुल हक(आरोग्य व तंत्रज्ञान मंत्री), आणि अब्दूल सत्तार (मिनिस्टर ऑफ मायनॉरीटी डेव्हलपमेंट आँड मदरसा एज्युकेशन) यांचा समावेश आहे.  पश्‍चिम बंगालमध्ये २९४ फैकी ४५ मुस्लिम आमदार आहेत. तर लोकसभेच्या ४२ जागांपैकी ५ जागांवर मुसलमान खासदार आहेत. यात मोहमद सलिम(कोलकाता इशान्य मतदार संघ), अबू आय्यास मंडल (कटवा मतदार संघ), अबू हसेम खान (मालदा), अब्दूल मन्नन हुसेन(मुर्शिदाबाद) आणि हन्नान मुल्ला(उलुबेरिया) यांचा समावेश आहे, आणि यासर्व आमदार, खासदार व मंत्र्यांची सरकारवर दमदार पकड आहे.
जी अवस्था प.बंगालची तीच आसामची आहे. येथील १२६ जागांपैकी २८ जागावर मुसलमान उमेदवार निवडून आले आहेत. यात रकीबल हुसेन(नागाव, मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स), इस्माईल हुसेन(दुब्री, मिनिस्टर ऑफ फ्लड), डॉ. नझर उल इस्लाम(डोबोका, अन्न व नागरी पुरवठामंत्री) आणि मिसबुल हुसेन लष्कर(बोरखोला, चचार, सहकारमंत्री) हे चौघे मंत्री आहेत. येथून दोन मुस्लिम खासदार निवडून आले आहेत, अनवर हुसेन (दुब्री) आणि ए.एफ गुलाम उस्मानी (बारपेट) आणि एकजण राज्यसभेवर गेला आहे त्या आहेत खा. अनवरा तीमुर(नागाव). अनवरा तीमुर यांच्या रुपाने मुसलमानांना येथुन मुसलमान मुख्यमंत्री ही मिळाला आहे. तसेच माजी राष्ट्रपती फक्रुद्दीनअली अहमद (लोकतोकिया) हे ही गौहाटी येथीलच, आणि सध्याच्या फ्रफुलकुमार महाता यांच्या मंत्रीमंडळात मैदुल इस्लाम बोरा (कमलपूर) आणि शुकुर अली (बारपेट) हे दोघे मंत्रीपद उपभोगत आहेत. तसेच बर्‍याच उच्चाधिकारी पदावरही मुसलमानांचीच मोठ्‌या प्रमाणात वर्णी लावली गेली आहे.
केवळ मतपेटीचे राजकारण करत कॉंग्रेसने गेल्या ६० वर्षात सत्ता आपल्या हातात ठेवली. मुसलमानांची गठ्‌ठ मतासाठी चाटूगीरी करत मुस्लिम व्होट बँक सांभाळत आहेत. पण आता या अतिरेक्यांचे स्वप्न मोगलस्तान साकारायला या कॉंग्रेसनेच मोठा हातभार लावला आहे हे सर्वांच्या लक्षात येवू लागेल. या सर्व माहितीचा व अहवालांचा अभ्यास केल्यावर हे दिसून येते की, आता मोगलस्तानचे स्वप्न त्यांच्या दृष्टीपथात येवू लागले आहे.
या घुसखोरांचे व्यवसाय म्हणजे चोर्‍या दरोडे, हिंदुंच्या जमीनी घरे बळकावणे, गुन्हेगारी, मद्यव्यवसाय, मादकद्रव्यांंचा व्यवसाय, वेश्या व्यवसाय, तस्करी आदी जेवढे म्हणून अनाधिकृत व्यवसाय असतील ते करुन या देशाच्या समाजव्यवस्थेला सुरुंग लावत आहेत. तर अतिरेकी संघटना बॉम्बस्फोट, दंगलींच्या माध्यमातून हजारो हिंदूंच्या कत्तली करत आहेत. या इस्लामी धर्मांधांना फक्त उत्तर भारतात मोगलस्तान निर्माण करुन थांंबायचे धोरण नाही तर पुढे ग्रेटर मोगलस्तानाचीही संकल्पा आहे. यात आंध्रप्रदेशातील हैदराबाद, महाराष्ट्राचा काही भाग आणि उत्तर कर्नाटक येथे उस्मानस्तान आणि केरळमध्ये मोपलास्तान ही निर्माण करण्याचे मनसुबे आहेत. (
तरुण भारत)
Posted by : | on : 27 Dec 2011
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *