Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, सामाजिक, स्थंभलेखक
सेलिब्रिटींच्या स्वैराचाराचे बळी, रविंद्र पाटील!

सेलिब्रिटींच्या स्वैराचाराचे बळी, रविंद्र पाटील!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• सलमान खानच्या बिईंग ह्युमनची, अमिर खानच्या सत्यमेव जयतेची तारिफ करताना प्रसार माध्यमे थकत नाहीत. माध्यमांनी यांच्या शुल्लक गोष्टींना देमार प्रसिद्धी दिली. पण रविंद्र पाटील यांची दखल कोणी घेतली नाही. आज भारतात रविंद्र पाटील यांच्यासारखे अनेक लोक आहेत. पण त्यांना आणि सत्याला वाली कोणी राहिला नाही. आपली व्यवस्था सत्याची कास पकडणार्‍यांच्या जीवनाचे मातेरे करते. सलमान खानला झालेल्या शिक्षेमुळे जनतेत अजुनही न्याय शिल्लक आहे अशी भावना निर्माण झाली ही जमेची बाजू आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी अभिनेता...
औद्योगिक विकास आणि श्रमिक संहिता विधेयक

औद्योगिक विकास आणि श्रमिक संहिता विधेयक

Author : •चौफेर : अमर पुराणिक• आजच्या स्थितीत पंतप्रधान मोदी विकासाचा जो वेग पकडू पाहात आहेत त्यासाठी श्रमिक संहिता विधेयक २०१५ पारित करुन घेणे आवश्यक ठरते. उद्योजक आणि कामगार यांच्यात योग्य समन्वय साधणार्‍या भूमिका घेत मोदी यांना वाटचाल करणे क्रमप्राप्त आहे. त्यादृष्टीने त्यांनी श्रमिक कायद्याच्या सुधारणेच्या दिशेने उचललेले पाऊल  महत्त्वपुर्ण म्हणावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तारुढ झाल्यानंतर जुलै २०१४ मध्ये कॅबिनेटच्या बैठकीत श्रमिक कायद्यातील कमतरता दूर करुन सध्या लागू असलेल्या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. सर्वात प्रथम त्यांनी श्रमिक...
संघाचे सेवा कार्य ही राष्ट्रसाधना : सुहासजी हिरेमठ

संघाचे सेवा कार्य ही राष्ट्रसाधना : सुहासजी हिरेमठ

Author : •चौफेर : अमर पुराणिक• कोणतंही सेवा कार्य म्हंटलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच नाव सर्वप्रथम पुढे येतं. कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो की, समाजिक आपत्ती असो संघाची  सेवाकार्याची शैली अप्रतिम आहे. राष्ट्रीय आणि सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थापनेपासूनच सामाजिक सुधारणा आणि समरसता निर्माण करण्यात मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘सेवा भारती’च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम अविरत राबवले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सेवा प्रमुख सुहासजी हिरेमठ यांनी संघाच्या सेवाकार्यासंदर्भात तरुण भारतशी संवाद साधत विस्तृत चर्चा...
भूमी अधिग्रहण विधेयकातील गतिरोध!

भूमी अधिग्रहण विधेयकातील गतिरोध!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• राज्यपातळीवरील छोट्‌या पक्षांमुळे १९८९ पासून राज्यसभेत महत्त्वाच्या विधेयकांबाबत मोठे गतिरोध निर्माण झाले आणि ही एक मोठी समस्या बनली. त्यामुळे अनेक विकास कामात त्याचा अडथळा निर्माण झाला. आता नव्याने पुन्हा भूमी अधिग्रहण विधेयकावरुन या गतीरोधाचा सामना मोदी सरकारला करावा लागत आहे. केवळ भूमी अधिग्रहण विधेयकच नाही तर कोणतेही मोठे विकास प्रकल्प किंवा योजना राबवण्याबाबतीत आता भाजपाच्या मोदी सरकारला यासाठी दोन हात करावे लागणार आहेत. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मे २०१४ ला...
प्रेस्टीट्यूटवृत्ती सिद्ध करण्याची अहमहमिका!

प्रेस्टीट्यूटवृत्ती सिद्ध करण्याची अहमहमिका!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• अशा विद्वानांना खरे तर जनरल सिंह यांनी योग्य नामाभिधान दिले आहे. हे देशाला लागलेले जळू आहेत. यांना राष्ट्रहिताशी काहीही देणं-घेणं नाही. फक्त विधानांचा विपर्यास्त करणे इतकच यांना हवं असतं. अशा पत्रकार आणि विद्वानांमध्ये स्वत:मधील प्रेस्टीट्यूट वृत्ती सिद्ध करण्याची जणू अहमहमिकाच लागली आहे. त्यामुळे आता या १० टक्के पत्रकारांनी कसं वागावं याचा धडा नव्याने घालून देण्याची जबाबदारी जनतेवरच येऊन पडली आहे. प्रेस्टीट्यूटवृत्ती सिद्ध करण्याची अहमहिका!युद्धग्रस्त येमेनमधून मागील आठवड्‌यापर्यंत ५६०० भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणले आहे....
भाजपाला शेतकरीविरोधी ठरवण्याची कसरत!

भाजपाला शेतकरीविरोधी ठरवण्याची कसरत!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• बहूसंख्या नागरिक आणि विशेषत: शेतकरी भूमी अधिग्रहण विधेयकाचे महत्त्व जाणून आहेत. पण ही स्वयंघोषीत विद्वानमंडळी भूमी अधिग्रहण विधेयकाबाबतीत अपप्रचार करून शेतकर्‍यांच्या पायावर कुर्‍हाड मारू पाहात आहेत. या विद्वानांनी हवा तर आपल्या पायावर धोंडा मारुन घ्यावा पण शेतकर्‍यांचे हितचिंतक असल्याचा आव आणून शेतकर्‍यांनाच बुडवण्याचा डाव खेळू नये. अर्थात शेतकरी या सर्व चाली ओळखून आहेत. ते असल्या माध्यामातील तथाकथित विद्वानांच्या कोल्हेकुईला भिख घालणार नाहीत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने ११ महिन्यांपुर्वी जोरदार यश मिळवत...
या करताच हवं होत का ‘आप’ला स्वराज्य?

या करताच हवं होत का ‘आप’ला स्वराज्य?

Author : •चौफेर : अमर पुराणिक• २८ मार्च रोजी आम आदमी पार्टीच्या तीनशेहून अधिक सदस्यीय राष्ट्रीय परिषदेत जे झाले त्याचा थोडा फार अंदाज येऊ शकत होता. पण हा वाद या थराला जाईल याची मात्र कोणाला कल्पनाही आली नसेल. आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर कार्यकारिणीतून योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकलपट्‌टी करण्यात आली. नंतर एक एक करत बर्‍याच समित्यांतून त्यांना बाजूला सारण्यात आले. त्याच बरोबर एक एक स्टिंग ऑपरेशनचे बॉम्ब फुटू लागले. अनेक आरोप प्रत्यारोप, व्हिडीओ, ऑडीओ टेप्स बाहेर आले. सोशल...
युरोपियन महासंघाची भूमिका आणि इटलीचा स्वार्थ!

युरोपियन महासंघाची भूमिका आणि इटलीचा स्वार्थ!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• युरोपियन महासंघाच्या अडमुठ्‌या भूमिकेला इटलीच कारणीभूत आहे. संपुआ सरकारने सोनिया गांधींच्या दबावाखाली घेतलेल्या चूकीच्या भूमिकेमुळे आता मोदी सरकारला संपुआ सरकारने केलेली घाण स्वच्छ करुन नव्याने मार्गाक्रमण करावे लागणार आहे. युरोपियन महासंघातील बहूसंख्य देश भारताशी सहकार्याची भूमिका ठेऊ इच्छित असताना केवळ इटलीमुळे हे प्रकरण जटील झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिल महिन्यात जर्मनी, फ्रान्स आणि कॅनडाच्या दौर्‍यावर जात आहेत. त्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. परराष्ट्र धोरणांच्या भूमिकेतून हा दौरा म्हणजे युरोप विशेषत: जर्मनी आणि...
मसरत आलमची सुटका आणि पाकची खेळी!

मसरत आलमची सुटका आणि पाकची खेळी!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• अब्दुल बासित हे पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव असूनही ते कसे ‘मिशन काश्मिर’ हा आपल्या कूटनीतीचा महत्त्वाचा हिस्सा मानतात ते जर्मनी, जिनेव्हा, न्यूयॉर्क, लंडन अशा ठिकाणी महत्त्वाच्या जागेवरील नियुक्तिदरम्यान केलेल्या त्यांच्या कार्याच्या किर्ती(?)चा अंदाज त्यांनी केलेल्या कारस्थानांचा अभ्यास केल्यास येऊ शकतो. बासित हे आपला बहूतांश वेळ काश्मिरी जिहादींना जागे आणि सक्रिय ठेवण्यात घालवतात. मसरत आलम याची सुटका होणे म्हणजे भारतात आणि विशेषत: काश्मिरमध्ये कारस्थाने करण्याचा नवा आशेचा किरण पाकचे उच्चायुक्त बासित यांना दिसत आहे. काश्मिरच्या मुद्द्यावरुन...
केजरीवालांची बेसुर ‘कजरी’ आणि आपचा बेताल ‘दादरा’!

केजरीवालांची बेसुर ‘कजरी’ आणि आपचा बेताल ‘दादरा’!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• आम आदमी पार्टीची सद्यस्थिती हेच सांगते की कशा प्रकारे मुल्य आणि आदर्शाच्या गप्पा मारणारे आम आदमी सारखे पक्ष संधी मिळताच कसे संधीसाधू होतात. जर आम आदमी पार्टीला अन्य भ्रष्ट राजकीय पक्षांसारखेच राजकारण खेळायचे असेल तर आम आदमी पार्टीची गरजच नाही, अशा पक्षांची भरमार देशभरात आहे. त्यामुळे तशाच पक्षाची भर घालण्यात काहीही हाशिल नाही. हे दिल्लीकरांसाठी सर्वात जास्त निराशजनक आहे की, दुसर्‍यांना नैतिकतेचा उपदेश देणार्‍या आणि स्वत: धूतल्या तांदळाचे असल्याचा दावा करणार्‍या, प्रत्येक हीन राजकीय...