Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राजकीय, स्थंभलेखक
अर्थसंकल्पाच्या दुष्प्रचाराची राजनीती !

अर्थसंकल्पाच्या दुष्प्रचाराची राजनीती !

Author : •चौफेर : अमर पुराणिक• मोदी सरकारने भविष्यातील योजना, उर्जा, संरक्षण, उद्योग आणि शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात चांगली तरतूद केली आहे, ती जुजबी नाही. त्यांनी लांब पल्ल्याचा विचार या अर्थसंकल्पात केलेला दिसून येतो. त्यामुळे त्याचे परिणाम तात्काळ दिसुन येणारे नाहीत पण दुरागामी प्रभाव मात्र सकारात्मकच असणार हे उघडच आहे. पण मोदी सरकारवर विरोधकांनी अतिशय नकारात्मक टीका केली आहे. हा दूष्प्रचार मोदी सरकारपेक्षा देशाच्या हिताला बाधक आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत मांडलेला अर्थसंकल्प हा अतिशय संतुलित आणि दुरागामी परिणाम करणारा...
अण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच!

अण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• सरकारकडून भूमी अधिग्रहणाच्या नावाखाली शेतकरी नागवला जात असल्याची आवई उठवून शेतकर्‍याचेच नुकसान जर होत असेल तर याला जबाबदार असे आंदोलक आणि विरोधकच असणार आहेत. यात सरकार शेतकर्‍याला नागवत नसून हे आंदोलक शेतकर्‍याचे अहित करत आहेत, असे होता कामा नये. त्यामुळेच अण्णा हजारेंनी जे आंदोलन जंतर मंतरवर केले ते शेतकर्‍यांच्या हिताचे नव्हे तर अहितकारकच ठरू शकते. त्यामुळे यावेळी मात्र असेच म्हणावे लागेल की अण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच! केंद्र सरकारच्या भूमी अधिग्रहण अध्यादेशाच्या विरुद्ध अण्णा हजारे...
का काढावा लागतोय अध्यादेश?

का काढावा लागतोय अध्यादेश?

Author : •चौफेर : अमर पुराणिक• सध्या भाजपाकडे लोकसभेत बहूमत असले तरीही राज्यसभेत बहूमत नाही. त्यामुळे लोकसभेत मंजुर झालेली विधेयकं राज्यसभेत उधळून लावली जात आहेत. भाजपाचे राज्यसभेत बहूमत येण्यासाठी आणखी कमीतकमी दोन वर्षेतरी वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे सध्या अध्यादेश काढण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. अन्यथा भाजपाला विकासाची कास सोडून राज्यसभेतील बहूमताची वाट पहावी लागणार आहे. पण तोपर्यंत वाट पाहणं भाजपालाही आणि भारतीय जनतेलाही परवडणारे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने गेल्या काही दिवसांत आर्थिक सुधारणांना गती देण्याच्या...
विकासासाठी कठोर निर्णय घ्यावेच!

विकासासाठी कठोर निर्णय घ्यावेच!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• आजपर्यंत प्रशासनात परिवर्तन आणण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही. आजपयर्र्तच्या प्रत्येक सरकारला आपली सत्ता आबाधित राखण्यात रस होता. त्यासाठी हे कडू औषध घ्यायची कोणाचीही इच्छा नव्हती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तशी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. कदाचित त्यांना अनेकांची नाराजी ओढावून घ्यावी लागेल, अनेक अडथळे पार करावे लागतील. पण देशाला जर चांगले दिवस पाहायचे असतील तर मोदींच्या या भूमिकेला पाठबळ देणे आवश्यक आहे. असे कठोर निर्णय घेतल्या शिवाय ‘सब का साथ, सब का विकास’...
दिल्लीची निवडणुक दंगल!

दिल्लीची निवडणुक दंगल!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• दिल्लीच्या जनतेकडून भाजपाला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. दोन दिवसांतच निकाल जाहीर होतील. केंद्रात भाजपाचे सरकार आहेच. दिल्लीतही जर भाजपाचे सरकार आले तर दिल्लीच्या समस्या सोडवणे भाजपाला सोपे जाणार आहे. मागच्या वर्षी सत्ता देऊनही पळून गेलेल्या केजरीवाल यांना जनता नाकारण्याचीच शक्यता जास्त आहे. दिल्लीची जनता विकास मागतेय, त्यांना सक्षम सरकार हवं आहे. आता कोणता पक्ष बहुमत मिळवतो, सत्तेत येतो हे दोन दिवसांत स्पष्ट होईल आणि निवडुन आलेला पक्ष कोणत्या प्रकारचा विकास दिल्लीला देऊ शकतो हे येत्या...
ओबामांच्या दौर्‍यात मोदींची प्रभावी राष्ट्रनीती!

ओबामांच्या दौर्‍यात मोदींची प्रभावी राष्ट्रनीती!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘देहबोली’ आणि ओबामांची ‘बॉडी लॅग्वेज’ हेच सांगते की परंपरागत पध्दतींना फाटा देत नवी नीती अवलंबली गेली. आजपर्यंत भारत कायम अमेरिकेसमोर झुकलेलाच दिसला. पण यावेळी मात्र भारत अमेरिकेच्या बरोबरीने वागला. किंबहूना त्यांनी अमेरिकेच्या बरोबरीनेच नव्हे तर काही अंशी अमेरिकेला झुकायला लावल्याचे दिसते. नरेंद्र मोदी यांची दमदार परराष्ट्रनीतीचे हे उदाहरणच आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकताच भारत दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावर ते प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित...
नीती आयोग उभा करेल नवा भारत?

नीती आयोग उभा करेल नवा भारत?

Author : •चौफेर : अमर पुराणिक• योजना आयोग बंद करुन आणि नीती आयोग सुरु करुन याची सुरुवात मोदी यांनी केली आहे. अशा प्रक्रियामध्ये निष्ठा, कष्ट, सातत्य आणि पारदर्शकता असणारे लोक आल्यास अच्छे दिन येणे दूर नाही. पंतप्रधान नरेद्र मोदी कसलेले शासक आहेत. ते या गोष्टी समजू शकतात. म्हणूनच त्यांनी नव्याने नीती आयोग सुरु करुन विकासाच्या दृष्टीने नवे पर्व सुरु करण्याचा पाया घातला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक योजना केवळ कागदांवरच रंगवण्यात आल्या. देशाच्या विकासात महत्त्वपुर्ण असलेले योजना आयोगासारखे अनेक आयोग...
दहशतवाद आणि शार्ली एब्दो

दहशतवाद आणि शार्ली एब्दो

Author : •चौफेर : अमर पुराणिक• इस्लामिक दहशतवाद हळूहळू जगभर पसरतोय. सगळेच देश सावकाश सावकाश मुस्लिमबहूल होत आहेत. त्यामुळे या अतिरेक्यांचा वावर सर्वत्र वाढत चालला आहे. पॅरिस हल्ल्याच्या हल्लेखोरांना शिक्षा होईल तेव्हा होईल पण इस्लामिक धर्माच्या आवरणात लपेटलेला आतंकवाद कसा संपवणार हा खरा प्रश्‍न आहे. याचे उत्तर जेव्हा मिळेत तेव्हाच खर्‍या अभिव्यक्ती स्वातंत्र्य मोकळा श्‍वास घेईल. जगभरात फ्रांस आणि त्यांची राजधानी पॅरिस लोकशाही मुल्यं, कला, संस्कृती आणि बुद्धीमानांचा सन्मान करणारी म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र, समता आणि बंधुत्वाचा नारा येथूनच प्रथम...
पाकिस्तानच्या कथनी आणि करणीतील विरोधाभास

पाकिस्तानच्या कथनी आणि करणीतील विरोधाभास

Author : •चौफेर : अमर पुराणिक• समुद्रीमार्गाने भारतात घुसुन मुंबईवर ज्या तर्‍हेचा हल्ला २६/११ ला करण्यात आला होता तशीच स्थिती पुन्हा निर्माण होण्याची भीती पोरबंदरच्या घटनेमुळे वाटते. अतिशय भयानक असा २६/११ चा मुुंबईवरील हल्ला अजुनही देशवासीय विसरु शकले नाहीत. तशीच हिंसक आणि हिणकस चाल खेळण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान असावी अशी शंका  व्यक्त केली जातेय. पाकिस्ताने मुंबईच्या या घटनेनंतर सतत असेच सांगितले की आतंकवादाविरुद्धच्या लढ्‌यात पाक भारतासोबत आहे. परंतु ज्या तर्‍हे च्या राजनीतिक, सैन्य आणि न्ययिक हालचाली झाल्या त्या पाहता पाकिस्तानच्या कथनी...
गेले वर्ष संक्रमणाचे, चालू वर्ष संकल्पपुर्तीचे!

गेले वर्ष संक्रमणाचे, चालू वर्ष संकल्पपुर्तीचे!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• या वर्षात जितक्या योजनांची वेगवान उभारणी केली जाईल तितकी ती येत्या तीन वर्षात पुर्ण करणे सोपे जाणार आहे. तेव्हा सन २०१५ हे वर्ष भाजपाचे भवितव्य ठरवणारे वर्ष ठरणार आहे. एकंदर मोदी सरकारच्या कामांचा धडाका आणि वेग पाहता हे इप्सित भाजपा सरकार साध्य करेल यात शंका नाही. सन २०१४ ने अनेक घटना इतिहासजमा करत निरोप घेतला. देशाच्या दृष्टीने हे वर्ष अतिशय महत्त्वपुर्ण ठरले. जोरदार राजकीय संक्रमणाचे वर्ष म्हणून सन २०१४ ओळखले जाईल. तर नवे वर्ष...