Home » Blog, उद्योग भरारी, उद्योग भरारी :अमर पुराणिक, औद्योगिक, स्थंभलेखक
बालाजी अमाईन्सची विक्रमी गरुडभरारी

बालाजी अमाईन्सची विक्रमी गरुडभरारी

Author : • उद्योग भरारी : अमर पुराणिक• स्वदेशी तंत्रज्ञानाने अमाईन्स उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही एकमेव आणि जगातील पहिली कंपनी आहे. रेड्डी बंधूंनी १९८८ मध्ये एका प्लांटपासून सुरुवात करून आज १० प्लांट उभे करीत मोठी भरारी घेतली आहे. बालाजी अमाईन्सने सुरुवातीपासून संशोधन व विकासावर जोर दिलेला असून, त्यांचे प्रत्येक नवीन उत्पादन हे स्वत:च्या संशोधन व विकास विभागामधून बाहेर पडलेले आहे. यासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ‘रेकग्नायझेशन ऍन्ड इन-हाऊस आर ऍन्ड डी’ चा दर्जा देण्यात आलेला आहे. साधारणपणे...
महाराष्ट्राची संवादिनी झाली अबोल

महाराष्ट्राची संवादिनी झाली अबोल

Author : •अमर पुराणिक, सोलापूर• स्वर आणि स्वरसंवादाचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अनन्य साधारण महत्त्व आहे. संवादिनी अर्थात हार्मोनियम हे ख्याल, ठुमरी, दादरा आदी गायनशैलींच्या साथीचे वाद्य. अशा संवादिनीशी स्वरसंवाद साधणारी व्यक्ती म्हणजे कै. अप्पा जळगांवकर. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हा स्वरसंवाद संपल्यासारखे वाटते. अप्पांनी अनेक दिग्गज गायकांना संवादिनीवर साथ करीत त्या गायकांच्या गाण्याला चार चॉंद लावले. अशा या स्वरांच्या गाढ्या अभ्यासकाच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.अप्पा जळगांवकरांचा जन्म जालन्यातील जळगाव या गावी ४ एप्रिल १९२२...
कष्टकर्‍यांच्या भावना झाल्या मुक्या

कष्टकर्‍यांच्या भावना झाल्या मुक्या

Author : •अमर पुराणिक, सोलापूर• कामगार आहे मी, तळपती तलवार आहे | सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे॥ अशा शब्दांत श्रमिक, कष्टकरी आणि कामगारांच्या वेदना कवितेतून मांडत शब्दाशब्दांतून क्रांतीची बीजे पेरणारे ज्येष्ठ कविवयर्र् नारायण सुर्वे यांनी गोड, गुलाबी भावभावना आणि शृंगार आदी परंपरागत पठडीतून मराठी काव्याला मुक्त करीत रोजच्या जगण्यातील जिते-जागते संघर्षमय वास्तव साध्या आणि थेट शब्दांत मांडणार्‍या वास्तववादी काव्यरचना करण्याची अजरामर कामगिरी बजावली. कामगार, कष्टकरी, वंचित वर्गांच्या व्यथा आणि वेदनांना धारदार शब्दरूप देणार्‍या नारायण सुर्वे या थोर कवीच्या जाण्याने कवितेचे...
चित्रपटगीतसृष्टीच्या नभांगणातील तळपणारा तारा : मन्ना डे

चित्रपटगीतसृष्टीच्या नभांगणातील तळपणारा तारा : मन्ना डे

Author : •अमर पुराणिक, सोलापूर• पद्मभूषण मन्ना डे हे हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्व. चित्रपट व संगीत क्षेत्रांतील ज्येष्ठ गायक. ज्यांनी हिंदी चित्रपटगीतांना शास्त्रीय गाण्याची बैठक दिली. त्यांच्या भावपूर्ण व शुद्ध गायकीने हिंदुस्थानासह सर्व जगभरातील गानरसिकांना भुरळ घातली. अशा मन्नादांना २००७ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. या आधी पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या मन्ना डे यांना आता चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. हा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठ पार्श्‍वगायकांचा सन्मानच आहे!...
भारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा

भारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा

Author : •अमर पुराणिक, सोलापूर• भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते. ज्यांची जन्मशताब्दी आज आपण साजरी करत आहोत. भारताने केलेल्या अणु संशोधनाचा पाया याच होमी भाभांनी घातल्यामुळे आज आपला देश अण्वस्त्र संपन्न झाला आहे. अणु तंत्रज्ञानाचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक होते. वडील जहांगीर होरमजी भाभा आणि आई मेहेरबाई या दांपत्याच्या पोटी डॉ. होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी...
भारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’

भारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’

Author : •अमर पुराणिक, सोलापूर• सिद्धयोग संवर्धक प.पू. नारायणकाका महाराज ढेकणे यांचे महत्कार्य भारताच्या अभ्युदयासाठी विज्ञानवादाबरोबरच योगशास्त्राला महत्व देणे अपरिहार्य आहे. भारतातील प्राचीन योगी, ऋषी मुनींनी योगशास्त्रात असाधारण संशोधन व प्रगती केलेली होती. साधकांनी या मार्गाचा अवलंब करून राष्ट्रसाधनरूप आणि अमोघ अशा योगविद्येच्या माध्यमातून भारताच्या आणि विश्‍वाच्याही अभ्युदयासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. संपूर्ण समाजाची सर्वांगीण प्रगती जेवढी साधता येईल तेवढी साधने आवश्यक आहे. अंत:शुद्धी हीच खरी राष्ट्रसंरक्षक व संवर्धक शक्ती आहे. राष्टोद्धारसाठी शिवशक्ती शिवाय पर्याय नाही, म्हणून शक्तीचे संवर्धन करणे...
नानाजी देशमुख : एक ‘राजर्षी’

नानाजी देशमुख : एक ‘राजर्षी’

Author : •अमर पुराणिक, सोलापूर• इंदिरा गांधींविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणणारे आणि इंदिरा गांधींना पराभूत केल्यानंतर निरिच्छपणे मंत्रिपद नाकारणारे आणि त्याहूनही अधिक म्हणजे त्यानंतर चक्क राजकारण संन्यास घेणारे नानाजी देशमुख हे भारतीय राजकारणातील अतिशय वेगळे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना राजकारणातील ऋषी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. राजकारणात कुठे जायचे नि नेमके कधी थांबायचे, हे कळालेला हा भारतीय राजकारणातील कदाचित एकमेव नेता असावा.नानाजींनी अगदी छोट्या वयात माता-पित्यांचे छत्र गमावले. त्यांच्या मामांनी त्यांचे पालनपोषण केले. अतिशय गरिबीत त्यांनी आपले बालपण काढले. त्यांच्याजवळ शिक्षणासाठी...
बुद्धीबळातील भिष्माचार्य : भाऊ पडसलगीकर

बुद्धीबळातील भिष्माचार्य : भाऊ पडसलगीकर

Author : •अमर पुराणिक, सोलापूर• देशभक्ती, त्याग आणि निष्ठा या मूल्यांचे पवित्रपणे आचरण करणारी पिढी डॉ. हेडगेवारांनी घडविली. स्वयंसेवकांमध्ये ‘राष्ट्राय स्वाहा’ची वृत्ती पेरली व ‘इदं न मम’ची निष्ठा रूजविली. योगीपुरुष श्रीगुरुजींनी संघाची धुरा प्रतिकूल काळात समर्थपणे पेलली व वर्धीष्णू केली. संघाच्या मुशीतून अनेक सामान्य वाटणार्‍या पण असामान्य असणार्‍या विभूती निर्माण झाल्या. अशा विभूतींमध्ये नरहर व्यंकटेश तथा ‘भाऊ’ पडसलगीकर यांचा समावेश होतो. त्यांना बुद्धिबळातील भीष्माचार्य संबोधले जाते. असे हे भीष्माचार्य भाऊ पडसलगीकर यांचे काल दि. ७ सप्टेंबर रोजी दु:खद निधन झाले....
आशाताई : एक सृष्टिगांधर्वी

आशाताई : एक सृष्टिगांधर्वी

Author : •अमर पुराणिक, सोलापूर• आशाताईंनी ८ सप्टेंबरला शहात्तरी पार केली, या गोष्टीवर कोणाचा तरी विश्‍वास बसेल काय? पण याचं रहस्य त्या जादुई आवाजात, चमत्कारात आहे. पाळण्यात असल्यापासून आजपर्यंत आपण आशाताईंचा मखमली आवाज ऐकतो आहोत, हिंदीतही आणि मराठीतही. गेली सदुसष्ठ वर्षं सर्वांनाच आशाताईंच्या आवाजाने वेडं करून टाकलंय. आज आशाताई फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण विश्‍वात ख्यातकीर्त आहेत. जेथे जेथे त्यांचा आवाज पोहोचलाय, तेथे तेथे त्यांच्या भावूक आवाजातून भारतीय संस्कृती पोहोचली आहे. धृपदापासून ते ख्यालापर्यंत, ठुमरी-दादर्‍यापासून गझलांपर्यंत, नाट्यसंगीतापासून ते ठसकेबाज लावणीपर्यंत...