Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राजकीय, स्थंभलेखक
सेक्यूलर मंडळींची विकृती!

सेक्यूलर मंडळींची विकृती!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• प्रत्येक गोष्टीला पंतप्रधान मोदींना जबाबदार धरण्याची चढाओढ चालवली आहे. स्वत:ला विद्वान म्हणवून घेणार्‍या लेखक-विचारकांचा एक समुह हेच काम करतोय. ही लेखक मंडळी धडाधड साहित्य अकादमी पुरस्कार परत करत आहेत. ही तथाकथित विचारक मंडळी एक असे वातावरण निर्माण करु पहात आहेत की, देशात प्रचंड असहिष्णूता माजली आहे, सामाजिक असंतोष पसरला आहे. पण वस्तूस्थिती ही आहे की हिच सेक्यूलर विद्वान मंडळी समाजात धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. हिंदू-मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण करण्याचा उद्योग करत आहेत. दादरीच्या घटनेनंतर...
विदेशी गुंतवणूकीत उत्साहजनक वृद्धी

विदेशी गुंतवणूकीत उत्साहजनक वृद्धी

Author : •चौफेर : अमर पुराणिक• सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत विदेशी दौरे करत असल्याची ओरड काही प्रसार माध्यमांनी आणि विरोधकांनी केली आहे आणि अजूनही सुरु आहे.  लंडनमधील एका वृत्तपत्राने विदेशी गुंतवणूकीवरील अहवाल प्रसिद्ध केला आहे. गेल्या सहा महिन्यात भारताला घवघवीत अशी विदेशी गुंतवणूक लाभली आहे. विदेशी गुंतवणूकीत भारताने चीनला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारताला गेल्या वर्षीच्या तुलनेत ३३ टक्के इतकी भरघोस गुंतवणूक मिळाली आहे. या बातमीने मोदींविरुद्ध ओरड करणार्‍या प्रसारमाध्यमांना आणि विरोधकांना सणसणीत चपराक बसली आहे....
काश्मिर समस्या : निर्णायक कृतीची वेळ!

काश्मिर समस्या : निर्णायक कृतीची वेळ!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• भारतासाठी पाकव्याप्त काश्मिरचे विशेष रणनीतिक महत्त्व आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून पाकव्याप्त काश्मिरबाबत खूप सक्रीय झाला आहे. जर पाकव्याप्त काश्मिरमधील लोकांना अधिक जवळीकीने आणि सक्रिय दृष्टीकोनाने आपलेसे केले तर नरेंद्र मोदी मोठा इतिहास घडवू शकतील. कारण तेथील नागरिक स्वत:ला भारतीय म्हणवून घेऊ इच्छितात आणि मोदी सरकारच्या गुड गव्हर्ननंसने आणि वेगवान विकासकामांमुळे ते प्रभावित झाले आहेत. भाजपा काश्मिर केंद्रीत दृष्टीकोन पहिल्यापासून ठेऊन आहेच पण आता सत्ता हातात असल्यामुळे त्याला आकार देणे शक्य होणार आहे. पंतप्रधान...
सुभाषबाबूंचा आत्मा कॉंग्रेसला क्षमा करणार नाही!

सुभाषबाबूंचा आत्मा कॉंग्रेसला क्षमा करणार नाही!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• गेल्या ६० वर्षात नेताजींच्या फाईल्स दाबून ठेऊन कॉंग्रेसने खेळलेल्या अनेक घाणेरड्‌या खेळी बाहेर पडत आहेत. शिवाय यातील अनेक पुरावे, फाईल्स कॉंग्रेस सरकारने नष्ट केल्या असण्याची शक्यता जास्त आहे. केंद्रात जवळजवळ कायमच कॉंग्रेसचेच सरकार होते. पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारित त्या फाईल्स असल्यामुळे ते पुरावे नष्ट केले असल्याच्या संशयाला दुजोरा मिळतो. सेक्यूलरवादाचा जप करत कॉँग्रेसने विशेषत: नेहरु-गांधी घराण्याने मोगलशाहीच राबवली आहे. नुकतेच पश्‍चिम बंगालच्या सत्तारुढ सरकारने गेल्या शुक्रवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधीत ६४ फाईल्स सार्वजनिक केल्या....
बिहार विधानसभेची रणधूमाळी!

बिहार विधानसभेची रणधूमाळी!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• मागच्या निवडणूकीत लालूप्रसाद यादव यांच्या ‘जंगलराज’च्या विरोधात प्रचार करुन नीतिश कुमारांनी सत्ता काबिज केली होती. आता तेच लालूप्रसाद यादव यांच्या ‘जंगलराज’मध्ये सामिल झाले आहेत. त्यामुळे जनता यावेळी नीतिश कुमार यांना साथ देण्याची शक्यता नाही. नीतिश कुमार यांना आसंगाशी संग भोवणार आहे. बिहार विधानसभा निवडणूकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. जशा तारखा जाहीर झाल्या तसा निवडणूकीला रंग चढला आहे. १२ ऑक्टोबर पासून ५ नोव्हेंबर दरम्यान ५ टप्प्यात होणार्‍या या निवडणूकीचे निकाल दिवाळीपुर्वीच म्हणजे ८ नोव्हेबर...
सैनिकांच्या तपश्‍चर्येचा सन्मान!

सैनिकांच्या तपश्‍चर्येचा सन्मान!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• जेव्हा कॉंग्रेसची सत्ता होती, संपुआची सत्ता होती तेव्हा सरकारने हा प्रश्‍न सोडवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, सैनिकांच्या या मागणीप्रती सरकार उदासिन होते. न सरकारमध्ये या मागण्या पुर्ण करण्याची हिंम्मत होती ना इच्छाशक्ती! आणि आता मोदी सरकारने  तत्काळ वन रँक वन पेन्शन लागू केल्यानंतर त्याचे श्रेय लाटण्याचा अतिशय घृणास्पद प्रकार कॉंग्रेस करत आहे. सोनिया गांधी आणि राहूल गांधी याचे श्रेय लाटण्यासाठी निर्ल्लज्जासारखा प्रयत्न करत आहेत. हे कॉंग्रेसचे कृत्य केवळ हास्यास्पदच नाही तर दु:खद देखील आहे....
विकासाचे राजकारण हवे की आरक्षणाचे!

विकासाचे राजकारण हवे की आरक्षणाचे!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• दुसर्‍याचा हक्क मारुन खाण्याची मानसिकता बदलणे खूप आवश्यक आहे. सामाजिक समरसतेचे धडे पुन्हा पुन्हा घेणे आणि देणे गरजेचे बनले आहे. हीन राजकारणाचा वापर करुन कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवणारे केजरीवाल, हार्दिक पटेलसारखे अनेक लोक असतात. आरक्षणाच्या राजकारणाला बळी पडून समाजाची, देशाची राखरांगोळी न करता प्रगती कशी साधायची याचा विचार करणे आवश्यक आहे. आता त्या त्या समाजातील लोकांनीच ठरवायचे आहे की त्यांनी विकासाच्या राजकारणाला साथ द्यायची की आरक्षणासारख्या राजकारणाचा साथ द्यायची? गुजरातमधील सधन आणि संपन्न पटेल/पाटीदार समाज...
जागतिक मंदीचे संकेत!

जागतिक मंदीचे संकेत!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• अशी मंदीची परिस्थिती याहीपुर्वी अनेकदा येऊन गेली आहे. १९९५ दरम्यानही अशीच स्थिती आली होती. ती साधारणपणे २००० पर्यंत राहिली. सध्याची मंदीही २००८ सालापासून सुरु आहे. अमेरिका, इंग्लंड सारख्यादेशांना याचा मोठा फटका बसला. अजूनही ही मंदीची लाट ओसरण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट गेल्या काही महिन्यांपासून ती अधिक गडद होताना दिसतेय. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीने प्रवेश केल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही वर्षांपुर्वीच मंदीने जागतिक अर्थव्यवस्थेत प्रवेश केलेला होता. पण काही देशांच्या सक्षम नीती आणि प्रयत्नांमुळे काही...
कॉंग्रेसचा झाला संसदीय मुखभंग!

कॉंग्रेसचा झाला संसदीय मुखभंग!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• जर कॉंग्रेस आपल्या अडमुठ्‌या भूमिकेवर अडून राहणार असेल तर मग भाजपाला इतर विरोधी पक्षांना कॉंग्रेसपासून वेगळे पाडावे लागेल किंवा मग  संसद चालवल्याशिवाय शासन चालवण्याचा उपाय शोधावा लागेल. कॉंग्रेसला आपले उरले सुरले अस्तित्व शिल्लक राखायचे असेल तर अवसानघातकी राजकारण सोडणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही तर मग कॉंग्रेसचा अंत जवळ आला आहे असे म्हणावे लागेल. पण स्वत:च्या अंताबरोबरच कॉंग्रेस देशाचे फार मोठे नुकसान करत आहे, त्याला जबाबदार कॉंग्रेसच आहे. पाहता पाहता संसदेचे पावसाळी अधिवेशन...
कॉंग्रेसला ना संसदीय मुल्यांची चिंता, ना राष्ट्रहिताची!

कॉंग्रेसला ना संसदीय मुल्यांची चिंता, ना राष्ट्रहिताची!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेचा तार्किक विरोध करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे पण या अधिकाराच्या आडून अतार्किक विरोध करत संसद ठप्प करण्याचा, गोंधळ घालण्याचा अधिकार कॉंग्रेसला कोणी दिला? कॉंग्रेसची ही नीती म्हणजे नकारात्मक राजकारणाची हद्द झाली आहे. कॉंग्रेसला जशी लोकशाही मुल्यांची पर्वा नाही तशीच राष्ट्रहिताचीही पर्वा नाही. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचे दुस्साहस करत आहे ते देशाचा विकासरथ रोखण्यासाठीच. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने सर्वसामान्य जनतेचे जीवन समृद्ध करण्यासाठी आणि देश...