Home » Blog » टोपीचा वाद आणि वादाची टोपी

टोपीचा वाद आणि वादाची टोपी

टोपीचा वाद आणि वादाची टोपी

मुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैन
 भारताच्या विभाजनाच्यावेळी गांधी टोपीच्या समानांतर जिना यांच्या टोपीची चर्चा जोरात सुरू झाली होती. विभाजन करून वेगळा पाकिस्तान निर्माण करण्याच्या बाजूने असणार्‍यांनी याला टोपी न संबोधता इंग्रजी भाषेतील ‘कॅप’ शब्दाचा प्रयोग केला. म्हणूनच ‘जिना कॅप’ म्हणून ती जास्त प्रसिद्ध झाली. ती कॉंग्रेसपेक्षा वेगळे दिसू लागल्याने ‘कॅप’ हा शब्द स्वीकारला गेला. जिना यांच्या टोपीचा रंग काळा होता आणि त्यावर केसही होतेे. आजही त्यामध्ये काहीही परिवर्तन झालेले नाही. मात्र, जिनांची विशेष ओळख असलेल्या या परंपरेला पाकिस्तानी लोकांनी जपले नाही. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सद्‌भावना मिशन अंतर्गत केलेल्या तीन दिवसीय उपवासाला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला. मोदींच्या या उपवासाबाबत पुढील अनेक दिवस तर्कवितर्क सुरूच राहणार आहेत. मात्र, कुठल्यातरी व्होटबँकेला आकर्षित करण्यासाठी आपण आपल्या सिद्धांतांशी तडजोड करणार नाही हे मोदी यांनी या उपवासादरम्यान घडलेल्या एक घटनेतून दाखवून दिल्याने ते अभिनंदनास पात्र आहेत. मोदी ज्याठिकाणी उपवास करत होते त्याठिकाणी असलेल्या प्रचंड गर्दीत अनेक प्रकारच्या टोप्या आणि शाली बघायला मिळत होत्या. भेटीसाठी येणार्‍या प्रत्येकाशी नरेंद्र मोदी यांनी गळाभेट करून त्यांचे अभिवादन स्वीकारले. नरेंद्र मोदी यांना उपस्थितांमधील कुणाच्याही वेषभूषेवर किंवा पेहरावावर आपत्ती नव्हती तर मग स्वत: मोदी यांनी काय परिधान करावे आणि कुणाकडून काय स्वीकारावे याबाबत उपस्थितांपैकी कुणालाही आपत्ती असण्याचे कारण नाही. त्यामुळेच ज्या मौलवींची टोपी मोदी यांनी घातली नाही त्या महोदयांना किंवा इतरांना याचे वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. या सद्‌भावना मिशनमध्ये कुठल्याही राजकारणाला थारा न देण्याचा मोदींचा प्रयत्न होता. त्यामुळेच अशी टोपी घातल्याने एखाद्या विशिष्ट समुदायाला मतांसाठी आकर्षित केल्याचा आरोप होऊ नये म्हणून मोदी यांनी ती टोपी घालण्यास नकार दिला. टोपी घालण्यास नकार दिल्याने कुणाचाही अपमान होत नाही. असे असते तर मग त्याच मौलवींनी भेट म्हणून दिलेली शाल त्यांनी स्वीकारलीच नसती. शाल आणि फेटा हा आमच्या देशात सन्मानाचे प्रतीक आहेत. त्यामुळे सर्वच समारंभांमध्ये याचे आदानप्रदान होते. मुस्लिम समाजातही शाल आणि फेट्याचा उपयोग केला जातो. राजस्थानमध्ये टोपीऐवजी पगडी बांधण्याचा रिवाज आहे. आपल्या उत्तराधिकार्‍याची नेमणूक करण्यासाठी त्याला पगडी बांधली जाते. मुस्लिम बादशहांच्या भाषेत याला राज्याभिषेक असे म्हटले जाते. कुठेही टोपी हा शब्द वाचायला किंवा ऐकायला मिळत नाही. तसेही आताच्या लोकशाहीत या सगळ्या गोष्टी अप्रासंगिक झाल्या आहेत. मात्र, असे असले तरी ‘सर सलामत तो पगडी हजार’, ही अतिशय जुनी म्हण अजूनही प्रचलित आहे. शाल, फेटा आणि पगडी या गोष्टी धर्म आणि संप्रदायांपेक्षा मोठ्या आहेत. परंतु, टोप्यांना आता पूर्वीसारखे महत्त्व राहिलेले नाही. राजकपूरसारख्या महान कलाकारानेदेखील आपल्या गीतातून ही गोष्ट मान्य केली आहे. ‘सर पर लाल टोपी रुसी फिर भी दिल है हिंदुस्तानी’ म्हणजेच लाल रंग ही साम्यवादाची निशाणी असली तरी माझे मन मात्र हिंदुस्तानीच आहे असा त्याचा अर्थ. म्हणूनच आपल्या उपवासाच्या कार्यक्रमाला राजकारणाचा स्पशर्र् न होऊ देण्याची दूरदृष्टी दाखविणारे मुख्यमंत्री मोदी अभिनंदनास पात्र आहेत. टोपीचे आदानप्रदान हा कायमच वादाचा विषय राहिला आहे. काही टोप्या या विशिष्ट वर्ग किंवा समुदायाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने त्यांच्या वर्गीकरणानुसार कुणीही कुणाकडे बोट दाखवू शकतो. याचाच सरळ अर्थ असा की, टोप्यांचा रंग आणि आकाराने एकाधिकार प्रस्थापित केला आहे. ही त्यांची ओळखही आहे. काही कारणामुळे जर ही टोपी बदलली तर तो टोपी बदलू असल्याचे उपहासाने म्हटले जाते. ही साहित्यातील एक प्रचलित म्हण झाली आहे. एवढेच नव्हे, तर टोपीवरून अजूनही बरेच काही बोलले जाते. उदा: टोली घालणे, टोपी फेकणे, इत्यादी. एखादी व्यक्ती कुठल्या गोष्टीचा आपल्याला योग्य वाटणारा अर्थ काढत असेल तर काय करणार? त्याने तशीच टोपी घातली असल्याने त्याचा दृष्टिकोन तसा असल्याचे म्हटले जाते. प्राचीन सभ्यतेची ओळख करून देणारे चित्र किंवा गुफांमध्ये कुठेही पुरूष किंवा स्त्री टोपी घातलेले आढळून येत नाहीत. आमच्या जवळपास सर्वच धर्मांचे महापुरूष आणि पैगंबरांचा अभ्यास केला असता कुणीही त्यांच्या डोक्यावर टोपी घातल्याचे दिसून येत नाही. पवित्र हज यात्रेला जाणार्‍या पुरूषांच्या डोक्यावरही काहीच नसते. महिलांना मात्र आपल्या डोक्यावरचा एकही केस दिसता कामा नये असे स्पष्ट निर्देश दिले जातात. महिलांनी आपले डोके झाकावे अशी अपेक्षा सर्वच धर्म आणि समाजांमध्ये केली जाते. महिलांच्या केसांना सौंदर्याचे प्रतीक मानले गेले असल्याने केसांना नैतिकता आणि लाजेशी जोडण्यात आले आहे. डोक्यावर लहानात लहान कापडही बांधले जाते किंवा भारतासारख्या देशात तर विशाल साडीदेखील डोक्यापयर्र्ंत पोहोचते. थोरामोठ्यांचा आदर करताना आणि धार्मिक व सामाजिक कार्ये करत असताना डोक्यावर पदर घेणे बंधनकारक मानले जाते. जिन्स आणि टॉप घातलेल्या अल्पवयीन मुली तुळशीला पाणी घालताना मात्र आपल्या डोक्यावर दुपट्टा बांधलेल्या आढळतात आणि यातूनच भारतीय संस्कृतीचा प्रभाव स्पष्टवणे जाणवतो. मुस्लिम समाजात दुपट्ट्याची जागा बुरखा, रिदा आणि चादर घेत असते. चर्चमध्ये जात असताना प्रत्येक वयाच्या महिलेच्या डोक्यावर स्कार्फ असतो. हे सगळे सांगण्याचे तात्पर्य एवढेच की प्रत्येक धर्मात आणि संस्कृतीमध्ये स्त्रीने आपले डोके झाकणे बंधनकारक असल्याचे आपल्या निदर्शनास येतेे. राजस्थान आणि अन्य अनेक ठिकाणी तर डोक्यावर असलेली साडी किंवा लुगड्याने चेहरा झाकला जातो. आपल्या बोली भाषेत याला घुंघट असे म्हणतात. माणसाच्या सन्मानाला टोपीशी जोडण्यात आले आहे. असे नसते तर एखाद्या चुकीच्या कामाबद्दल क्षमायाचना करणार्‍या व्यक्तीने मी तुमच्या पायाशी टोपी ठेवतो, असे कधीही म्हटले नसते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी डोक्यावर कधीही न घातलेली गांधी टोपी आज भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. मात्र, महात्मा गांधी यांनी कधीही याला विरोध केला नाही. कारण त्यावेळी ज्या टोपीचा रिवाज पडला होता ती टोपी खादीची होती. टोपी परिधान करणारा स्वत: चरख्यावर बसून ही टोपी तयार करत असे. वजनानी अतिशय हलकी असणारी ही टोपी अगदी सहजपणे धुतादेखील येत असे. महात्मा गांधी यांनी जगात आपली ओळख निर्माण करण्यासाठी कधीही या टोपीचा वापर केला नसला तरी ही टोपी म्हणजे सामान्य गांधीवादी माणसाची ओळख बनली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही टोपी कॉंग्रेसवाल्यांची जहागिरी झाली होती आणि आता ट्रेड मार्क म्हणून ओळखली जाते. भारताच्या विभाजनाच्यावेळी गांधी टोपीच्या समानांतर जिना यांच्या टोपीची चर्चा जोरात सुरू झाली होती. विभाजन करून वेगळा पाकिस्तान निर्माण करण्याच्या बाजूने असणार्‍यांनी याला टोपी न संबोधता इंग्रजी भाषेतील ‘कॅप’ शब्दाचा प्रयोग केला. म्हणूनच ‘जिना कॅप’ म्हणून ती जास्त प्रसिद्ध झाली. ती कॉंग्रेसपेक्षा वेगळे दिसू लागल्याने ‘कॅप’ हा शब्द स्वीकारला गेला. जिना यांच्या टोपीचा रंग काळा होता आणि त्यावर केसही होतेे. आजही त्यामध्ये काहीही परिवर्तन झालेले नाही. मात्र, जिनांची विशेष ओळख असलेल्या या परंपरेला पाकिस्तानी लोकांनी जपले नाही. आता तर एकाही पाकिस्तानी नेत्याच्या डोक्यावर जिना यांची ती कॅप दिसत नाही. एकवेळ अशी होती की मुस्लिम लीगचा प्रत्येक नेता व कार्यकर्ता ही कॅप घालणे म्हणजे गर्वाची गोष्ट समजत असे. आता पाकिस्तानात मुस्लिम लीग नावाचे इतके पक्ष निर्माण झाले आहेत की त्यांची संख्या मोजणेही कठीण आहे. जिनांचा पक्ष एवढ्या तुकड्यांमध्ये विभागला जाण्यावर मार्मिक टिप्पणी करणारे एक कार्टुन लाहोर येथून प्रकाशित होणार्‍या दैनिक जिन्नाने प्रकाशित केले होते. जिना कॅपचे शेकडो तुकडे हवेत उडत असल्याचे त्या कार्टुनमध्ये दाखविण्यात आले होते. ‘एक दिल के टुकडे हजार हुए, कोई यहॉं गिरा कोई वहॉं’, असे शिर्षक त्याखाली देण्यात आले होते. पाकिस्तानला जन्म देणार्‍या जिना यांच्याच टोपीचे पाकमध्येच अस्तित्व उरले नाही. मात्र, जनलोकपाल विधेयकाच्या मुद्यावर नवी दिल्ली येथे उपोषण करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या डोक्यावर गांधी टोपी होती. अण्णांच्या उपोषणाचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या देश-विदेशातील प्रसारमाध्यमांनी अण्णांच्या गांधी टोपीचा वारंवार आणि विशेष उल्लेख केला. टोपी या भारतीय शब्दाऐवजी ‘कॅप’ या शब्दाचा वापर करून आपण इंग्रजांसोबत असल्याचे जिनांच्या अनुयायांनी दाखवून दिले होते. कॅप या शब्दाचा अर्थ कळला नसला तरी तिला डोक्यावर मात्र घालून घेतले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील पायधुनी भागात एक नीमचवाला टोपी हाऊस आहे. आमच्याकडे १२५ वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या तयार केल्या जातात अशी माहिती या हाऊसचे संचालक दिवंगत सैफुद्दीन भाई यांनी एकदा दिली होती. जगातील अनेक इस्लामी देशांमध्ये आम्ही या टोप्यांचा पुरवठा करतो, असेही त्यांनी सांगितले होते. कझाकिस्तानचे लोक सगळ्यात महाग टोपी घालतात आणि त्यामध्ये खर्‍या मोत्यांचा उपयोग केला जातो. इस्लामी जगतात तुर्की टोपी खूप प्रसिद्ध आहे. या टोपीच्या मधोमध निघणारी एक बट मागच्या भागाला लटकताना दिसते. प्रत्येक टोपीत काही ना काही नाविन्य असते, असेही त्यांनी सांगितले. सैफुद्दीन भाईंच्या जमान्यात २५ ते ८०० रुपयांपर्यंतच्या टोप्या त्यांच्या दुकानात उपलब्ध होत्या. मात्र, असे असले तरी सगळ्यात स्वस्त गांधी टोपीच आहे आणि ही कुठल्याही दुकानात नव्हे तर फक्त खादी भवन येथेच उपलब्ध असते. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपवासादरम्यान मौलवींनी देऊ केलेली शाल नाकारली असती तर ते निश्‍चितच टीकेस पात्र होते. मात्र, त्यांनी अतिशय नम्रपणे आणि उत्साहाने ती शाल स्वीकारली. मौलानांनी देऊ केलेली टोपी त्यांनी डोक्यावर घालण्यास नकार दिला असेल तर तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. असे करून नरेंद्र मोदी यांनी त्या मौलानांसोबत मोठा न्याय केला आहे. मौलानांनी देऊ केलेली टोपी मोदी यांनी घातली असती तर मतांसाठी मोदी यांनी आता टोपीही घातली असा उपस्थितांचा समज झाला असता आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांच्यावर टीकाही झाली असती. मौलाना तर आपले प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी सर्व काही करत होते. परंतु, अल्पसंख्यकांची मते मिळविण्यासाठीच मोदी यांनी जाणूनबुजून असे केल्याचे आरोपही त्यांच्यावर झाले असते. त्यामुळे मौलानांनी देऊ केलेली टोपी नाकारून नरेंद्र मोदी यांनी निर्माण होणार्‍या आणखी एका वादळाला शांत केले, असेच म्हणावे लागेल.
दै. तरुण भारत, सोलापूर.

Posted by : | on : 24 Sep 2011
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *