दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या कार्यकारिणीच्या दिनांक ३ मार्च रोजी झालेल्या समारोपाच्या भाषणात भाजपाच्या चार हजार प्रतिनिधींना संबोधित करताना नरेंद्र मोदी काय बोलले आणि प्रसारमाध्यमांनी काय प्रसिद्ध केले किंवा प्रसारित केले हा नेहमीप्रमाणेच याही वेळी संशोधनाचा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी जे बोलतात त्यातील केवळ स्वत:च्या सोयीचीच विधाने तीही मूळ स्वरूपात न देता तोडून मोडून विपर्यास्त करून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये प्रसिद्ध करतात. हे भाजपा बाबतीत कायमच होते. नरेंद्र मोदींच्या बाबतीतही आजच नव्हे तर गेल्या १०-१२ वर्षांपासून सातत्याने होतेय. ते याहीवेळी झाले. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॉंगे्रसवर घणाघाती प्रहार केला. नरेंद्र मोदी यांनी केवळ राजकीय टीकाच केली नाही, तर विकास, पक्ष बळकटीकरण, राष्ट्रप्रेम, विकासाची तंत्र, विकासाचे आर्थिक ताळेबंद, सूत्रबद्ध तंत्र, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि प्रत्येक भारतीयाला नैराश्येच्या गर्तेतून बाहेर काढून त्यांच्या मनात बदलाची तीव्र इच्छा निर्माण करणे, विकासासाठी इच्छाशक्ती, भ्रष्टाचार मुक्त आणि तंत्रशुद्ध कामाचा मंत्रच मोदी यांनी या भाषणात दिला, पण प्रसारमाध्यमांनी यातील केवळ राजकीय विधाने सवंग पद्धतीने प्रसारित केली आणि दूरचित्रवाणीवरून कार्यक्रमानंतर होणार्या चर्चांमध्ये केवळ वाक्यांचा विपर्यास्त करून नकारात्मक पद्धतीने नरेंद्र मोदींबद्दल ओकता येईल तेवढी गरळ ओकत होते.
नरेंद्र मोदी म्हटले की, सर्वसामान्य भारतीय जनतेच्या नजरेसमोर येतो एक विकासपुरुष, कणखर नेता आणि कोणत्याही संकटला न घाबरणार लढाऊ राजनीतीज्ञ. लागोपाठ तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषवत केलेला गुजरातचा विकास विरोधकांसह परराष्ट्रांनाही तोंडात बोट घालायला लावणारा आहे, पण माध्यमं आणि सेक्युलरवाले गोध्राकांडातील खलनायक असेच नरेंद्र मोदींचे चित्र रंगवण्यात गेली दहा वर्षे दंग आहेत. अजूनही त्यांची डोळे उघडून वास्तव पाहण्याची आणि स्वीकारण्याची मानसिकता होत नाही, पण सतत नरेंद्र मोदींबद्दल नकारात्मक प्रचार करून एकप्रकारे या माध्यम आणि सेक्युलरवाद्यांनी एकप्रकारे मोदींची खूप मोठी मदत केली आहे. नरेंद्र मोदींना देशभरातील घराघरात नेऊन पोहोचवले, पण कीतीही खोटा प्रचार केला तरी सत्य कधीनकधी बाहेर येतेच. गेल्या दहा वर्षांत हे सत्य पुरते बाहेर आलेले आहे. याचे भान अजून यांना होत नाही. कारण गुजरात सोडून इतर सर्व भारतीयांना गेल्या दहा वर्षांत गोध्रापुराण ऐकून ऐकून सर्व भारतीयांमध्ये काय आहेत नरेंद्र मोदी? ही उत्सुकता निर्माण झाली आणि ती उत्सुकता इतकी तानली गेली की, प्रसारमाध्यमांनी सांगितलेल्या गोष्टींची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची प्रत्येक भारतीयाला इच्छा होऊ लागली. मग हा आम आदमी विचार करू लागला की, खरंच नरेंद्र मोदी इतके वाईट आहेत का? गेली १० वर्षे मोदींबद्दल ही माध्यम सांगताहेत त्याप्रमाणे मोदी खरेच राक्षसीवृत्तीचे ‘मौत के सौदागर’ आहेत का? नरेंद्र मोदींबद्दल अशा अनेक व्यमिश्र भावना लोकांच्या मनात निर्माण होऊ लागल्या. मग सतत दहा वर्षे या नरेंद्र मोदींबद्दल या नकारात्मक कथांचा प्रचार होत असताना गुजरातची जनता मात्र नरेंद्र मोदींच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. सतत भाजपा तेथे सत्तेत आहे. विकासाबाबतीत कॉंग्रेसच्या सत्ताकाळात तळाच्या क्रमांकावर गेलेला गुजरात भाजपाची आणि नरेेंद्र मोदींची सत्ता येताच उर्जितावस्था प्राप्त करतो आणि सतत प्रथम क्रमांकावर राहतो कसा? हा प्रश्न प्रत्येक नागरिकांच्या मनात घर करुलागला. आणि त्यातून मग पुढे येऊ लागले वास्तव! की मोदी हे ‘मौत के सौदागर’ नसून खरे राष्ट्रभक्त विकासपुरुष आहेत. त्यांनी प्रशासनिक, तांत्रिक, व्यापार, कृषी अशा सर्वच क्षेत्रांत नवनव्या संकल्पना प्रभावीपणे राबवून गुजरातला या वैभवाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. या नरेंद्र मोदींच्या विकास गाथेचे वास्तव समजल्यानंतर मात्र प्रत्येक भारतीयाला खरे नरेंद्र मोदी कळून चुकले आणि त्या अनुषंगाने प्रसारमाध्यमांचा खोटारडेपणाही उघड झाला. यात फेसबुक, ट्वीटर, ब्लॉगर सारख्या सोशल मीडियाचा खूप चांगला उपयोग हे वास्तव जाणून घेण्यासाठी झाला.
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या कार्यकारिणीच्या दिनांक ३ मार्च रोजी झालेल्या समारोपाच्या भाषणात भाजपाच्या चार हजार प्रतिनिधींना संबोधित करताना नरेंद्र मोदी काय बोलले आणि प्रसारमाध्यमांनी काय प्रसिद्ध केले किंवा प्रसारित केले हा नेहमीप्रमाणेच याही वेळी संशोधनाचा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी जे बोलतात त्यातील केवळ स्वत:च्या सोयीचीच विधाने तीही मूळ स्वरूपात न देता तोडून मोडून विपर्यास्त करून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये प्रसिद्ध करतात. हे भाजपा बाबतीत कायमच होते. नरेंद्र मोदींच्या बाबतीतही आजच नव्हे तर गेल्या १०-१२ वर्षांपासून सातत्याने होतेय. ते याहीवेळी झाले.
भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॉंगे्रसवर घणाघाती प्रहार केला. नरेंद्र मोदी यांनी केवळ राजकीय टीकाच केली नाही, तर विकास, पक्ष बळकटीकरण, राष्ट्रप्रेम, विकासाची तंत्र, विकासाचे आर्थिक ताळेबंद, सूत्रबद्ध तंत्र, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि प्रत्येक भारतीयाला नैराश्येच्या गर्तेतून बाहेर काढून त्यांच्या मनात बदलाची तीव्र इच्छा निर्माण करणे, विकासासाठी इच्छाशक्ती, भ्रष्टाचार मुक्त आणि तंत्रशुद्ध कामाचा मंत्रच मोदी यांनी या भाषणात दिला, पण प्रसारमाध्यमांनी यातील केवळ राजकीय विधाने सवंग पद्धतीने प्रसारित केली आणि दूरचित्रवाणीवरून कार्यक्रमानंतर होणार्या चर्चांमध्ये केवळ वाक्यांचा विपर्यास्त करून नकारात्मक पद्धतीने नरेंद्र मोदींबद्दल ओकता येईल तेवढी गरळ ओकत होते. काही माध्यमांनी तर, आपणच पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचा अविर्भाव नरेंद्र मोदींच्या संपूर्ण भाषणात होता, अशा प्रकारची सवंग टीप्पणी आपल्या बातमीत केली. मोदींच्या या भाषणावर कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींना विंचू आणि सापाची उपमा देऊन उद्धार केला. मोदींच्या भाषणातील अर्वाच्च भाषा ऐकता, मोदींकडे राष्ट्रीय नेता होण्याची क्षमता नाही, हे सिद्ध होते, असा जावईशोध कॉंग्रेसचे प्रवक्ता राजीव शुक्ला यांनी लावला. नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण अतिशय संयमी, सात्विक, कोठेही न घसरलेले होते. (यु ट्यूब आणि नरेंद्र मोदी यांच्या वेबसाईटवर हे संपूर्ण भाषण उपलब्ध आहे.) ५०-५५ मिनिटांच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी कोणावरही जहरी टीका आणि वैयक्तिक टीका केली नाही, तरीही हे कॉंग्रेसचे प्रवक्ते राजीव शुक्ला महाशयांना नरेंद्र मोदी यांची भाषा अर्वाच्च वाटली आणि शुक्ला यांनी मोदी हे राष्ट्रीय नेता होण्याच्या क्षमतेचे नाहीत असे प्रमाणपत्रही देऊन टाकले. कॉंग्रेेस नेते मणिशंकर अय्यर या महाशयांनी तर स्वत:ला विंचू चावल्याप्रमाणे भ्रमित होऊन मोदींनाच साप, विंचवाची उपमा बहाल केली. गुजरात दंगलीनंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी मोदींना ‘राजधर्म’ पाळण्याचा सल्ला दिला होता, हे मोदी विसरले का, असा सवाल नरेंद्र मोदींच्या संयमी भाषणावर कॉंग्रेसचे मंत्री मनोज तिवारी यांनी ट्विटरवर केला आहे. याला म्हणतात चोरांच्या उलट्या बोंबा. काही विकृत माध्यमांनी याही पुढे जाऊन ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांचा खडूस नेता असा उल्लेख केला. अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्याचा उल्लेख विरोधक सुद्धा आदराने करतात. पण असा अष्लध्यपणा माध्यमांनी, काही नेत्यांनी केला आहे. माध्यमाच्या या अर्वाच्च भाषेबद्दल मात्र हे सेक्यूलरवादी, मानवाधिकार, नीतीवाल्या विचारवंत(?) मंडळींंच्या तोंडाला कुलूप घातलेले असते.
या भाषणात नरेंद्र मोदी यांनी अतिशय सुसूत्र आणि कार्यकर्त्यांना कार्यप्रवण करणारे विचार मांडले. विकासाची अनेक सूत्रं सांगितली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठ पुरुषार्थाचा परिणाम काय असतो ते गुजरातमधील यशाचे उदाहरण देऊन सांगितले. काळाच्या कसोटीत खरी उतरलेली भाजपाची राजनैतिक संस्कृती आणि भाजपाची विचारधारा यावर असलेल्या प्रजेच्या विश्वासाचा परिणाम किती सकारात्मक होऊ शकतो हे मोदींनी पंडित दीनदयाल उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांचे उदाहरण देऊन सांगितले.
साधारणपणे एकाच कालावधीत स्वतंत्र झालेल्या देशांच्या म्हणजे इस्त्रायल, जपान, चीन, कोरिया आदी देशांनी प्रचंड मोठी प्रगती साधली आपण मात्र मागे पडलो. याला कारण म्हणजे राष्ट्रहीताचा विचार न करणारे, इच्छाशक्तीचा आभाव असणारे सरकार असल्यामुळे भारत मागे पडला. एका परिवाराच्या हितासाठी राष्ट्रहिताचा बळी दिला गेला. तेव्हा आपण परदेशातून मागवलेले ‘पीआयएल ४८’ गहू खात होतो. आपला कृषिप्रधान भारत देश धान्याच्या बाबतीतही स्वयंपूर्ण नव्हता, पण एका लालबहाद्दूर शास्त्रींनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला आणि संपूर्ण देशातील शेतकरी जागृत झाला. तो स्वत:च्या पायावर उभा राहिला आणि देशातील धान्याची कोठार भरून टाकली. देश कायमचा धान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला.
सकारात्मक इच्छा शक्ती काय असते? त्याचा प्रभाव काय असतो? याचे मूर्तीमंत उदारण म्हणजे राष्ट्रतेज अटलबिहारी वाजपेयी असल्याचे सांगून मोदी यांनी सकारात्मक राजकारण आणि विकासाभिमुख सरकार काय करू शकते याची आठवण कार्यकर्त्यांना करुन दिली. अटलजींनी अमेरिकेसारख्या महासत्तेच्या नाकावर टीच्चून अणुचाचणी घेतली. ११ मे च्या अणुचाचणीनंतर संपूर्ण जग भडकले, भारतावर दबाब आणू लागले, तात्काळ काही तासांत आर्थिक निर्बंध लादले, पण या दबावाला भिक न घालता आत्मविश्वास आणि बेडरवृत्ती काय असते हे अटलजींनी दाखवून देत पुन्हा १३ मे रोजी त्याहून शक्तीशाली अणुचाचणी घेतली आणि सार्या जगाला दाखवून दिले की, आम्ही झुकत नाही. अटलजींनी, भाजपाने प्रचंड आत्मविश्वासाची प्रचिती सार्या जगाला दिली. त्याचबरोबर देशवासीयांना भाजपाच्या नितीमत्तेची, ताकदीची आणि राष्ट्रनिष्ठेची प्रचिती दिली. त्यामुळे २१ व्या शतकातील सार्या जगाचे नेतृत्व करणारा देश म्हणून भारताकडे पाहू लागले. जगाने घातलेल्या निर्बंधांना भिक न घालता देशातील, परदेशातील भारतीय आप्तजनांना अटलजींनी आवाहन केले, तेव्हा या राष्ट्रपुत्रांनी परकीय गंगाजळीने देशाची तिजोरी भरून टाकली, अटलजींच्या आणि भाजपाच्या इच्छाशक्तीने हे करून दाखवले, पण २००४ नंतर कॉंग्रेस सरकारने हे सर्व घालवले, हे सांगून हाच आत्मविश्वास पुन्हा भाजपा कार्यकर्त्यात नरेंद्र मोदींनी जागृत केला आणि भाजपा कार्यकर्त्यांनी सारा देश जागृत करावा असे आवाहन केले.
मोदींनी प्रत्येक विकासकार्यांत जनसहभागाचे महत्त्व काय असते ते यावेळी विषद केले. जनसहभागाशिवाय सरकारच्या विकासाला गती येत नाही. ती गती जनसहभागाने कशी प्राप्त होते याचे ही उदाहरण कार्यकर्त्यांना दिले. गुजरातच्या जनतेला आवाहन केले की, १ पाऊल प्रत्येकाने पुढे यावे, म्हणजे संपूर्ण गुजरात ६ कोटी पावले पुढे जाईल. याचा खूप सकारात्मक फायदा झाला. भारतीय जनतेत असाच आशावाद निर्माण करणे, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रत्येक देशवासीयांना १ पाऊल पुढे येण्याचे आवाहन केले, तर देश १२५ कोटी पावले पुढे जाईल. हाच लोक सहभाग विकासात महत्त्वाच असतो हे मोदींनी यावेळी आवर्जून सांगितले, पण कोणत्याही प्रसारमाध्यमांनी हे मुद्दे भाजपा आणि मोदींच्या घोडदौडीच्या भीतीने प्रसिद्ध केले नाही. कॉंग्रेसने जनभागीदारीचे तत्त्व संपवून टाकले. त्यामुळेच देश विकासात मागे पडत असून, भाजपाची सरकारे ही जनआंदोलने आणि जनसहभागावर चालतात, विकास कार्यक्रमावर चालतात. दूरागामी प्रभाव पाडणारे बदल हे योग्य पुरोगामी नीतीच्या विकास कार्यक्रमामुळे होतात.
२००१ साली गुजरात सरकार ६७०० कोटी रुपये तोट्यात होते. पण आज ४०० कोटी नफ्यात आहे. आज वीज उत्पादनात संपूर्ण देश रसातळाला गेला आहे, पण गुजरात मात्र नफ्यात आहे. वीज उत्पादनात २००१ साली गुजरात वीज उत्पादनात २५,००० कोटी रुपये इतका तोट्यात होता, पण आता गुजरात वीज उत्पादनात ७०० कोटी रुपये नफा कमावते आहे. तेही एक पैसाही विजेचा दर न वाढवता. यासाठी काय केले तर लिकेज बंद केले. यात व्यवस्थापन, सचोटी हे पैलू महत्त्वाचे असल्याचे मोदी यांनी सांगितले. कोणतीही योजना ही कॉर्पोरेट प्लान, प्रोफेशनॅलिजम आणि टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन यावर चालते, याचे महत्त्व मोदींनी विषद केले.
भाजपा सुशासनात क्रमांक एक वर आहे. केवळ नरेंद्र मोदीच नव्हे, तर सर्व भाजपाच्या सरकारने दमदार कामगिरी केली आहे, मध्यप्रदेश सरकार विकासाचे उत्तम मॉडेल ठरले आहे. शिवराजसिंह चौहान, डॉ. रमणसिंह, जगदीश शेट्टर, मनोहर पर्रिकर यांची भाजपा शासित सरकारे सर्वोत्तम आहेत. याआधीचे मुख्यमंत्री कल्याणसिंह, सुंदरलाल पटवा, राजनाथ सिंह यांची सरकारंही सर्वेत्तम होती. प्रजेसाठी विकास, पारंपरिकता, व्यवस्थापन, सुशासन, ही सर्वच कौशल्ये भाजपा सरकारमध्ये आहे. सर्वांनीच चांगले काम केले आहे. केवळ मोदींनी नव्हे, असे नरेंद्र मोदींनी यावेळी आवर्जून सांगितले.
‘पंतप्रधान कोण होणार, नेता कोण आहे, हे भाजपात कधीही महत्त्वाचे नव्हते व नाही. आणि भाजपात अशा उत्तम नेत्यांची वाण नाही. काय महत्त्वाचे आहे तर भाजपा महत्त्वाची आहे, महत्त्वाचे आहे लक्ष्य गाठणे आणि कर्तव्य करणे. भारतीय जनतेचा अपेक्षाभंग करण्याचा आपल्याला अधिकार नाही असे सांगून मोदींनी कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण केले आहे. कॉंगे्रसपासून देशाला मुक्त करणे हे देशभक्तीचेच कार्य आहे, असे मोदी यांनी सांगितले.
देशवासीयांमध्ये पसरलेला ‘आता काही होणार नाही’ हा निराशावाद काढून टाकण्याचे आवाहन मोदींनी केले. मोदी म्हणाले की, ‘देश चल पडा है|’ देशवासीयांनी कॉंग्रेस हटवण्याचा निर्धार पक्का केला आहे. त्यामुळे आता कॉग्रेसला जनता उखडून फेकणारच आहे. २००४ ला भाजपाची सत्ता येणारच. त्यामुळे भाजपाचे सुशासन काय आहे ते देश पुन्हा अनुभवेल. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत भारत देश जगात सर्वश्रेष्ठ ठरेल, असा प्रचंड चैतन्यमयी विचार मोदी यांनी मांडला. ‘माना के अंधेरा घना है, लेकीन दिया जलाना कहां मना है’, असा आशावादी विचार मोदींनी मांडून भाजपा कार्यकर्त्यांत, जनात आणि मनामनात असे चैतन्य दिप पेटवले आहेत.
इतके सकारात्मक विचार मोदींनी मांडले असताना त्यांच्या आणि भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीला अतिशय नकारात्मक आणि हिनपणे प्रसिद्धी देऊन भाजपाचा अश्वमेघ रोखण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी केला. भाजपा आणि विशेषत: मोदींबाबत हे सुरूच आहे. पण या सर्व नकारात्मकतेचे पितळ आता उघडे पडले आहे, जनता वास्तव काय आहे ते समजून चूकली आहे. प्रचंड संकटांना तोंड देणारी जनता २०१४ च्या निवडणूकीत कॉंग्रेसला पळता भुई थोडी केल्या शिवाय राहणार नाही.