सोलापूरच्या प्रगतीसाठी ज्यांनी प्रचंड प्रयत्न केले, त्यात माजी खासदार सुभाषबापू देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी १ हजार उद्योजक निर्माण करण्याचे सुभाषबापूंचे स्वप्न आहे. सोलापूर शहराच्या प्रगतीला प्रचंड वाव असताना राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे सोलापूर खूप मागे पडले असल्याची खंत सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. यासाठी सोलापुरात सर्वप्रथम एमआयडीसीचे विभागीय कार्यालय सुरू होणे अत्यावश्यक आहे. कारण सोलापुरात येऊ पाहणार्या उद्योजकाला राजकीय नेतेमंडळी आपापल्या गावाकडे नेतात किंवा न्यायला प्रवृत्त करतात; त्यामुळे सोलापुरात येणारे उद्योजक अन्य शहरांकडे जातात. ‘‘जकातीमुळे उद्योजकांची गळचेपी होत असल्याने जकात तत्काळ हटवून एकच करप्रणाली स्वीकारणे आवश्यक आहे. करेरा उद्योग सोलापुरात आलाच नाही, पण १० वर्षे त्यामुळे एमआयडीसीची जागा अडवून ठेवली गेली. आता ही जागा मोकळी झाली आहे. त्या जागा गरजूंना तत्काळ द्याव्यात. शहराचा विकास खूप अगोदर होणे आवश्यक होते, पण सर्वांचे पोट भरल्यानंतर उरले तर सोलापूरला देऊ, अशी दुजाभावाची वागणूक शासनाने सोलापूरला दिली. त्यामुळे सोलापूरकर नाईलाजाने सोलापूर सोडून जातोय आणि हे सर्व हे थांबले पाहिजे !‘‘
•सोलापूरचा औद्योगिक विकास – माजी खासदार सुभाष देशमुख
सोलापूरच्या प्रगतीसाठी ज्यांनी प्रचंड प्रयत्न केले, त्यात माजी खासदार सुभाषबापू देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी १ हजार उद्योजक निर्माण करण्याचे सुभाषबापूंचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने ते सतत प्रयत्न करीत आहेत. अशा उद्यमशील माजी खासदार व लोकमंगल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुभाषबापू देशमुख यांनी दै. तरुण भारतशी संवाद साधला. सोलापूरच्या विकासाबद्दल पोटतिडकीने बोलताना सुभाषबापू म्हणतात, ‘‘जर माझ्या स्वप्नाप्रमाणे सोलापुरात तयार होणारे १ हजार सोलापूरकर उद्योजक आणि त्याबरोबरच बाहेरील उद्योजक आले आणि स्थिरावले तर मुंबई-पुण्याकडे जाणारे तरुणांचे लोंढे थांबतील. कारण ही तरुण पिढी सोलापूरचे भविष्य आहे आणि हीच तरुण पिढी जर सोलापूर सोडू लागली तर या शहराचे भवितव्य काय राहील, याचा सर्वच सोलापूरकरांनी विशेषत: राजकीय नेत्यांनी गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. यासाठी सोलापूर विद्यापीठाचा दर्जा सुधारणे, जे विषय इतरत्र नाहीत असे अभ्यासक्रम सुरू होणे आवश्यक आहे. विद्यापीठे शहराचे भविष्य घडवतात. हा मंत्र लक्षात घेऊन विषयातील वेगळेपण, दर्जा सुधारण्याला प्राधान्य देण्याशिवाय पर्याय नाही. सोलापूरच्या प्रगतीला प्रचंड वाव असताना राजकीय इच्छाशक्तीच्या आभावामुळे सोलापूर खूप मागे पडले असल्याची खंत सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. उद्योजकांना मूलभूत सुविधा जसे की, बंद पडलेली विमानसेवा पुन्हा सुरू करणे, मुंबई-चेन्नई, मुंबई-बंगळूर, मुंबई-हैदराबाद आदी रेल्वेमार्गांची डबल लाईन आणि विद्युतीकरण करणे, पाणी, वीज, अंतर्गत रस्ते या सुविधा उद्योजकांना अग्रक्रमाने देणे क्रमप्राप्त आहे. सोलापुरात येऊ इच्छिणार्या उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी सोलापुरात सर्वप्रथम एमआयडीसीचे विभागीय कार्यालय सुरू होणे अत्यावश्यक आहे. कारण सोलापुरात येऊ पाहणार्या उद्योजकांना राजकीय नेतेमंडळी आपापल्या गावाकडे नेतात किंवा न्यायला प्रवृत्त करतात; त्यामुळे सोलापुरात येणारे उद्योजक अन्य शहरांकडे जातात. करेरा उद्योग तर सोलापुरात आलाच नाही, पण गेली १० वर्षे त्यामुळे एमआयडीसीची जागा अडवून ठेवली गेली, आता ही जागा मोकळी झाली आहे, पण त्या जागेचे वितरण गरजू उद्योजकांना तात्काळ होणे आवश्यक आहे. सोलापूर व जवळच्या परिसरात श्री सिद्धेश्वर, अक्कलकोट स्वामी समर्थ, संत दामाजी, संत सावता माळी, वडवळचे नागनाथ मंदिर, करमाळ्याची कमलादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अशी ९ तीर्थक्षेत्रे आहेत. ज्यावर अनेक पूरक उद्योग चालतात. इतर उद्योजकांना चालना मिळते, त्यामुळे पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही तीर्थक्षेत्रे विकसिक करणे अत्यावश्यक आहे. चारपदरी रस्ते व इतर अनेक विकासकामे खूप अगोदर होणे आवश्यक होते, पण सर्वांचे पोट भरल्यानंतर उरले सुरले तर सोलापूरला देऊ, तेही मिळेल तेव्हा मिळेल, अशी दुजाभावाची वागणूक शासनकर्त्यांनी सोलापूरला दिली आहे. सकारात्मक भूमिका घेत सोलापूरचा अपप्रचार थांबवून शहराचा व सोलापूरकरांचा विधायक प्रचार करणे अत्यंत आवश्यक आहे. सोलापूरकर असुविधांमुळे इच्छा नसतानाही नाईलाजाने सोलापूर सोडून पुण्या, मुंबईला जात आहेत, हे थांबले पाहिजे. चांगली चाललेली असतानाही शताब्दी एक्स्प्रेस का बंद केली? तर डीआरएम म्हणतात की, जागा नाही. तर मग जेव्हा चालू होती तेव्हा जागा होती का? असा प्रश्न उपस्थित होतो. तर यावर रेल्वे प्रशासनाने तात्काळ तोडगा काढून शताब्दी पुन्हा सुरू करावी. सोलापूर हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. बहुधा भ्रष्टाचारात सोलापूर अग्रक्रमावर असावे. अशी शासनाची वाईट स्थिती असताना भ्रष्ट वातावरणात सोलापूरची प्रगती कशी होणार? उद्योगाबाबत सोलापुरात सर्वात जास्त पूरकता आहे ती कृषी क्षेत्राला. कृषीच नव्हे तर सर्वच बाबतीत सोलापूर पूरक आहे. प्रगतीला प्रचंड वाव आहे, पण हे सर्व होईल फक्त कृतीतूनच. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरच सोलापूरला सोन्याचे दिवस येतील, असा आशावाद सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.
……………………………………………………………………………..
दै. तरुण भारत, सोलापूर. सोलापूरची उद्योग भरारी, दि.०३ ऑक्टोबर २०१०