‘‘आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा बँकेला आणि ग्राहकांना खूप फायदा झाला आहे. सोलापुरात जवळ जवळ १ हजार लोक इंटरनेट बँकिंगचा वापर करू लागले आहेत. ई-ट्रँझॅक्शनचे खूप फायदे असून, याचा वापर आणखी मोठ्या प्रमाणात वाढणे गरजेचे असल्याचे मत बावस्कर यांनी व्यक्त केले. आयकर ई-रिर्टन, इतर कर भरण्यासाठी अजूनही सोलापुरात मोठ्या प्रमाणात ई-ट्रँझॅक्शन होताना दिसत नाहीत, तुलनेत या प्रणालीचा वापर वाढणे आवश्यक आहे. सध्या बँकिंग क्षेत्रात खूप वेगाने बदल होत आहेत. येती दोन वर्षे खूप महत्त्वाची आणि मोठ्या बदलाची आहेत. आर्थिक योजनांचे नियोजन हे येत्या काळात मोठे आव्हान असेल. अजूनही भारतातील ४८ टक्के लोकांपर्यंत बँका पोहोचलेल्या नाहीत. ग्रामीण भाग, वाड्या-वस्त्यांवर मोबाईल बँकिंग सुरू करून शेवटच्या माणसापर्यंत महाराष्ट्र बँकेच्या सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. येत्या दोन वर्षांत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मानस बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्र.रा. बावस्कर यांनी व्यक्त केला.
पत सुविधा
ग्राहक अर्थसहाय्य योजना, गृह अर्थसहाय्य योजना, व्यक्तींसाठी, व्यावसायिकांसाठी, उद्योजकांसाठी, औद्योगिक क्षेत्रासाठी, व्यक्तिगत कर्जे, शैक्षणिक कर्जे, कृषितज्ज्ञांसाठी, महाबँक किसान क्रेडिट कार्ड, शेतकर्यांसाठी शेती यांत्रिकीकरण, पशुपालन, बागायती शेतकर्यांकरिता दुचाकीसाठी, अर्थसहाय्य योजना, उच्च तंत्रज्ञान प्रकल्प, वाहनकर्ज योजना.
अनिवासी भारतीयांसाठी सेवा – अनिवासी सामान्य खाते, अनिवासी बाह्य खाते, परकीय चलन अनिवासी खाते, निवासी परकीय चलन खाते, अंतर्गत रकमा पाठवणे, – स्विफ्टद्वारे अंतर्गत रकमा पाठवणे, – परकीय चलन शाखा/केंद्र.
बँकिंग सेवा – टेलिबँकिंग, क्रेडिट कार्ड, एटीएम, लॉकर्स.
ठेव योजना – मासिक व्याज ठेव योजना, निश्चित ठेव योजना (फिक्स्ड डिपॉझिट स्कीम), वर्धिष्णु ठेव योजना, पुनरावर्ती ठेवयोजना, शीतल ठेव योजना, सुलभ जमा योजना, महासरस्वती योजना, महाबँक लोकबचत योजना, त्रैमासिक ठेव योजना, मिक्सी ठेव योजना, चलनदर ठेव योजना, महाबँक घटक ठेव योजन, परिवर्तनीय पुनरावर्ती ठेव योजना.
भकिष्यकालीन उपक्रम : महाबँक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था म्हणजेच स्वयंरोजगाराची दिशा दाखणारा मार्ग होय. – उद्योजकतेला प्रोत्साहन देणे. – आर्थिक प्रगतीत बेरोजगार तरुणांनी योग्य तो वाटा उचलावा म्हणून त्यांना सक्षम करणे. – नियमित पाठपुरावा, आकलन मेळावे.- उद्योजकांचे गटवार मेळावे घेणे.
ग्रामीण विकास योजना : महाबॅँक कृषिसंशोधन व ग्रामीण विकासाची उद्दिष्टे : कृषी, पशुपालन व प्राणीज उत्पादने इत्यादी क्षेत्रांतील संशोधनाची जबाबदारी स्वीकारून ते सुरू करणे व अशा संशोधनास चालना देणे.
वैयक्तिक स्पर्श असलेले तंत्रज्ञान असे तत्त्वज्ञान बाळगणार्या महाराष्ट्र बँकेचे बोधचिन्ह आहे मोठ्या उंचीपर्यंत आपल्या अनंत दिव्यांसह झेपावणारी दीपमाला. हे सतत प्रगतीचे प्रतीक आहे. आजच्या युगात सामर्थ्य हे आर्थिक क्षमतेवर मोजले जाते. त्यामुळे महाराष्ट्र बँक म्हणजे देशाचे आणि ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. संपूर्ण देशात संपूर्ण परिवारांच्या सर्वप्रकारच्या गरजांची पूर्तता करणे, असाच बँकेचा मानस आहे. हेच आमचे उद्दिष्ट आहे. ‘एक परिवार, एक बँक, महाराष्ट्र बँक’ हे बँकेचे स्वप्न आहे.
आर्थिक नियोजन हे मोठे आव्हान : प्र. रा. बावस्कर
प्र. रा. बावस्कर
क्षेत्रीय महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र.कृषी उत्पादन, खत उत्पादन, बी-बियाणे आणि टेक्स्टाईल उद्योगांत सोलापूर अग्रेसर असून, या क्षेत्रांतील सोलापूरची प्रगती समाधानकारक आहे. हे उद्योग सोलापूरच्या औद्यागिक प्रगतीचा कणा आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही! असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक प्र.रा. बावस्कर यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
सोलापूरमध्ये या उद्योगांबरोबरच काही मोजक्या मेकॅनिकल इंडस्ट्रीज आहेत, यात वाढ झाली पाहिजे. आयटी, बीपीओ हे उद्योग मेट्रो शहरातच आहेत. अद्याप सोलापूरसारख्या शहरात हे उद्योग यायला अवकाश आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सोलापूरकडे येण्याचा कल कमीच आहे. सोलापूरच्या औद्योगिक प्रगतीसाठी उद्योजकांना कमीत कमी सुविधा पुरवल्याशिवाय हे उद्योजक येथे येणार नाहीत. सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी मूलभूत सुविधा, विमानसेवा, रेल्वे, सहापदरी रस्ते होणे अत्यावश्यक आहे. कमीतकमी सोलापूर-हैदराबाद किंवा सोलापूर-बंगळुरू विमानसेवा व्हाया सोलापूर सुरू करावी.सोलापूरचा औद्योगिक कणा या उद्योगांमुळे मजबूत असला तरीही बदलत्या काळाबरोबर सोलापूरच्या उद्योजक, शेतकरी व सोलापूरकरांनी आपली मानसिकता बदलणे नितांत गरजेचे आहे. आजच्या संगणकीय युगात या उद्योगांचे आधुनिकीकरण होणे महत्त्वाचे आहे. येथील उद्योजक व शेतकरी मंडळीही या उद्योगांत परंपरागत असल्यामुळे ते अतिशय तज्ज्ञ आहेत. त्यांना त्यांच्या उद्योगातील बारकाव्यांचा अभ्यास खूप चांगला आहे. बदलत्या काळाबरोबर पारंपरिक पद्धतीला आधुनिकीकरणाची जोड देत भांडवल आणि गुंतवणूक वाढवून आपला उद्योग किंवा शेती ही अधिक व्यापक केल्यास सोलापूरची प्रगती अधिक वेगाने होईल, असा विश्वास बावस्कर यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, पारंपरिक पद्धतीने शेती करीत असताना त्यात बदल करून नवे प्रयोग करणे आवश्यक आहे. आज सोलापुरातील अनेक प्रगतीशील शेतकर्यांनी असे प्रयोग केलेले आहेत आणि ते त्यात यशस्वी झालेले असून, त्यांना त्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे. द्राक्ष, डाळिंब आदी सोलापूरच्या पारंपरिक उत्पादनांबरोबरच कलिंगड, फुलशेती, भाजीपाला उत्पादन घेणे जास्त फायदेशीर असल्याचे दिसून येते. याशिवाय मनुका, बेदाणे उत्पादन देखील फायदेशीर आहे.बँक ऑफ महाराष्ट्र शेतीकर्ज व पीक कर्जांना विशेष प्राधान्य देत असल्याचे बावस्कर यांनी सांगून, शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने सोलापूर विभागातील ५२ शाखांमधून शेतीच्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेलेेेेेेे १४ फील्ड ऑफिसर नेमलेले असून, ते शेतकर्यांना याबाबत मार्गदर्शन करीत असतात.आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा बँकेला आणि ग्राहकांना खूप फायदा झाला आहे. सोलापुरात जवळ जवळ १ हजार लोक इंटरनेट बँकिंगचा वापर करू लागले आहेत. ई-ट्रँझॅक्शनचे खूप फायदे असून, याचा वापर आणखी मोठ्या प्रमाणात वाढणे गरजेचे असल्याचे मत बावस्कर यांनी व्यक्त केले. आयकर ई-रिर्टन, इतर कर भरण्यासाठी अजूनही सोलापुरात मोठ्या प्रमाणात ई-ट्रँझॅक्शनचा वापर होताना, करताना दिसत नाहीत. तुलनेत या प्रणालीचा वापर वाढणे आवश्यक आहे. सध्या बँकिंग क्षेत्रात खूप वेगाने बदल होत आहेत. येती दोन वर्षे खूप महत्त्वाची आणि मोठ्या बदलाची आहेत. आर्थिक योजनांचे नियोजन हे मोठे आव्हान असेल. युनिक आयडेंटिटी कोड सिस्टिम संकल्पना राबविण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने सहकार्य करार केला असून, हा महत्त्वाकंाक्षी प्रयोग आहे. अजूनही भारतातील ४८ टक्के लोकांपर्यंत बँका पोहोचलेल्या नाहीत. ग्रामीण भाग, वाड्या-वस्त्यांवर मोबाईल बँकिंग सुरू करून शेवटच्या माणसापर्यंत महाराष्ट्र बँकेच्या सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. येत्या दोन वर्षांत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचा मानस बावस्कर यांनी व्यक्त केला.
दैनिक तरुण भारत, रविवार, दि. १४ नोव्हेंबर २०१०