Home » Blog » षंढांच्या राजवटीत दुसरे काय होणार?

षंढांच्या राजवटीत दुसरे काय होणार?

सडेतोड : अरुण रामतीर्थकर
११ ऑगस्टला मुंबईत मुस्लिमांच्या मोर्चानंतर दंगल झाली. त्यात ५२ जखमींपैकी ४१ पोलीस आहेत. पोलिसांच्या काही गाड्या जाळण्यात आल्या. महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला. काही पोलिसांचे गणवेश फाडले, पदचिन्हे उचकटून फेकून दिली. हे सर्व कमी म्हणून की काय काही अधिकार्‍याच्या कमरेची पिस्तुलेही काढून घेतली. मला राहून राहून आश्‍चर्य वाटते की, एवढे सर्व होताना मुंबईचे पोलीस गप्प कसे राहिलेे. किमान कमरेचे पिस्तुल काढून घेताना एकाने जरी त्या पिस्तुलाचा वापर केला असता तर पोलिसांची एवढी बेअब्रू झाली नसती.
आझाद मैदानावर जमलेल्या जिहांदीपुढे शरणागती पत्करणार्‍या पोलिसांना कितपत दोष द्यायचा हाही प्रश्‍न आहे. एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करा हा गांधीवाद मंत्रालयातूनच आदेश म्हणून कळवला गेला असेल. पोलीस आदेशाप्रमाणे वागणार. गेल्याच वर्षी मावळ भागात पाण्यासाठी आंदोलन झाले. फक्त रस्ता रोको होते. तरी हट्टाला पेटलेल्या मंत्र्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी शेतकर्‍यांवर गोळीबार करून चौघांना मारले. त्या आधीच्या वर्षी शेगावच्या गजानन महाराज पालखीचा विश्राम होता. वारकरी झाडाखाली रस्त्यापासून दूर विश्रांती घेत होते. एक ट्रक रस्ता सोडून वारकर्‍यात शिरला. ८ जण चिरडून मरण पावले. संतापून वारकर्‍यांनी ट्रक पेटावला. पोलीस आले. त्यांनी वारकर्‍यांवरच गोळीबार करून तिघांना ठार केले. १० ऑगस्टलाच आबांच्या तासगावमध्ये दहीहंडी फोडल्यावर आनंदाने नाचणार्‍या गोविंदाना पोलिसांनी लाठ्या मारून पकडून चौकीत आणले. शेकडो तरुण चौकीसमोर जमताच शेपूट घालत सर्वांना सोडले. हे सर्व प्रकार लक्षात घेता मुंबईत पोलिसांच्या अंगात एकदम लकवा कसा मारला. भगवंतराव मोरे, कृष्णप्रकाश यांसारखे पोलीस अधिकारी अफझल खान वधाच्या ऐतिहासिक चित्राला हरकत घेणार आणि मुंबईत अरुण पटनाईक, राकेश मारिया यांच्यासारखे अधिकारी जिहादींना शरण जाणार. आज दिसते ते महाराष्ट्र पोलिसांचे हे चित्र आहे. भिवंडीत चार पोलिसांची हत्त्या झाल्यावर ते वृत्त वार्ताफलकावर लिहायलाही भगवंतराव मोरे यांनी बंदी घातली होती. मग अशा म.पो.से. वर आपत्ती कोसळल्यावर खेद का व्यक्त करायचा! जिहांदीकडून पोलिसांना मार बसणे हे मनाला पटत नाही, पण मपोसे म्हणजे हिंदूंना छळणारे आणि जिहांदीपुढे हिजड्यांची फौज होणारे असे चित्र असेल तर पोलीस आणि त्यांचे नशीब.
मोर्चा काढणारी रझा ऍकॅडमी दंगलीबद्दल कुख्यात आहे. सलमान रश्दीचे सॅटॅनिक व्हर्सेस हे पुस्तक, बाबरी ढाच्याचे पतन, डेन्मार्कमधील व्यंगचित्रकाराने काढलेली पैगंबरांची व्यंगचित्रे या बद्दल पूर्वी मुंबईतच काढलेले मोर्च हिंसक झाले होते. अशा संघटनेवर पूर्वीच बंदी घालायला हवी होती. तसे नाहीच, उलट पुन्हा मोर्चास परवानगी दिली. या परवानगीसाठी दोन मंत्र्यांनी (नसीमखान, फौजीयाखान) आग्रह धरला होता. दंगलीची चौकशी यथावकाश करा, पण रझा ऍकॅडमीच्या मोर्चास परवानगी देण्यासाठी आग्रह धरणारे मंत्री कोण त्यांची नावे जाहीर करून त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात आहे का? नक्कीच नाही. कालापव्यय करीत थातुर मातुर चौकशी करून सोडून द्यायचे हे सरकारचे धोरण असणार. खरे गुन्हेगार मंत्री म्हणूनच वावरणार. आम्हाला सेक्युलॅरिझमचे डोस पाजणार. 
थातुर मातुर कारवाई हा शब्द उगीच वापरला नाही. २६/११ च्या हल्ल्यानंतर र्फोसवन स्थापन केल्याचा गाजावाजा केला. मपोसेमधील निवडक अधिकारी घेऊन हे दल तयार केले. मुंबईत कोठेही गडबड झाली की ५ मिनिटांत हे दल तेथे जाऊन कारवाई करेल असे त्यावेळी सांगण्यात आले. ११ ऑगस्टला हे जिहादी ३ तास गोंधळ घालत होते. छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये घुसून गाड्या बंद पाडल्या. हे फोर्सवन झोपा काढत होते का? असे दल आपण स्थापन केले होते हेच सरकार विसरून गेले किंवा २६/११ नंतर नागरिकांना उल्लू बनवण्यासाठी फोर्सवन हे एक नाटक होते.
गृहखात्याकडे गुप्तचर यंत्रणा आहे. माझा गृहमंत्र्यांना प्रश्‍न आहे की, बजरंग दल, रा.स्व.संघ, सनातन, हिंदू जनजागृती यांचीच माहिती काढण्याचे काम त्यांना दिले आहे का? होटगी, उदगीरचे मुस्लिम तरुण पाकिस्तानात जाऊन घातपातचे शिक्षण घेऊन येतात. रझा ऍकॅडमीच्या मोर्चाची प्रक्षोभक पोस्टर्स भेंडीबाजार, आग्रीपाडा, भायखळा अशा अनेक भागांत लागली. तरीही गुप्तचरांना थांगपत्ता लागला नाही. धर्मांध जिहादींकडे दुर्लक्ष करणारे आर.आर.पाटील पाकिस्तानचे गृहमंत्री आहेत का महाराष्ट्राचे?
प्रमुख मुद्दा म्हणजे मोर्चाचे कारण तरी समर्थनीय आहे का? आसाममध्ये दंगल झाली. नेहेमीप्रमाणे बुळचट मीडियाने ५८ ठार एवढेच वृत्त दिले. त्यात मुस्लिम अधिक होते हे रझा अकादमीमुळे समजले. कारण आत्तापर्यंतच्या प्रत्येक दंगलीत बेसावध हिंदूंनीच मार खायचा हे ठरलेले आहे. मरण पावलेले मुस्लिम भारतीय होते का परदेशी? ते परदेशीच होते कारण जगातील सर्व मुस्लिमांबद्दल आम्हाला आस्था आहे असे अबू आझमी म्हणालेत. हे घुसखोर त्यांचे बांधव असतील तर पाकिस्तान आणि पाकिस्तानातील मुस्लिम हेही अबू आझमीचे बांधव असणार. असा उघड देशद्रोह करणारा अबु आझमी मोकाट फिरतो. मग दहशतवादाला प्रतिबंध कसा करणार? परकीय अतिरेक्यांना स्थानिक आश्रय मिळतो. अबु आझमीचे वक्तव्य त्याला अधिक पुष्टी देते.
या दंगलीत काही वाहिन्यांच्या ओ.बी.व्हॅन जाळून वार्ताहरांना मारहाण झाली. बरे झाले असे मी म्हणेन. कारण एवढे होऊही दंगलखोरांना धर्म सांगताना त्यांची जीभ टाळ्याला चिकटली. मात्र पुण्यातील स्फोटानंतर ‘हिंदू संघटनांनाचा हात’ असे खोटे वृत्त हेच हरामी देत होते. असे अजून चार-पाच हल्ले झाल्याखेरीज यांची मानसिक गुलामगिरी जाणार नाही. खोटे बोलताना उत्साही, खरे बोलताना तोतरा अशांना पत्रकार तरी कशाला म्हणायेच. पोलीस आणि मीडियाने आजवर साप म्हणून मुद्दाम भुई धोपटली. सापाला मोकळे सोडले. त्या सापाचा आता अजगर झाला आहे. अजगर मारणे अवघड नाही. त्यासाठी १०० कोटीतील २० कोटी हिंदू जागृत होण्याची गरज आहे. तोपर्यंत या षंढांच्या राज्यात असे अनर्थ होतच राहणार. २० कोटी कट्टर हिंदूंनो
क्लैव्यं मास्मम- षंढत्व सोडून द्या
युद्धाय कृतनिश्चय: युद्धासाठी तयार राहा.
रविवार, दि. १९ ऑगस्ट २०१२                                               
Posted by : | on : 20 Aug 2012
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *