Home » Blog » चीनला रोखण्याचा एकच मार्ग : व्हिएतनाम

चीनला रोखण्याचा एकच मार्ग : व्हिएतनाम

चीनला रोखण्याचा एकच मार्ग : व्हिएतनाम 

अन्वयार्थ : तरुण विजय
 हे क्षेत्र गेल्या १० शताब्दींपासून भारताची संस्कृती आणि बुद्धाच्या उपदेशामुळे आपल्यासाठी मैत्रीपूर्ण राहिले आहे. मात्र मानसिक दास्यामुळे आपली नजर केवळ पाश्‍चिमात्य देशांकडे राहिली आणि चीनने या क्षेत्रात त्यांचा प्रभाव विस्तार करून टाकला. व्हिएतनाम चंपा देश या नावाने भारतीय साहित्यात ओळखला जातो. येथील शिवमंदिरे हजारो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली आहेत. दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये अनेक कारणांसाठी व्हिएतनामचे महत्त्व आहे. चीन चहू बाजूंनी घेरून भारताला अस्थिर करण्याच्या कामाला लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर चीन ज्या देशांना आपले प्रभावक्षेत्र मानतो अशा दक्षिण, दक्षिणपूर्व आशियाई तसेच पूर्व आशियातील राष्ट्रांशी पारंपरिक मैत्री संबंध मजबूत करून भारताने प्रत्युत्तर द्यायला हवे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांच्या व्हिएतनाम दौर्‍याने चीनची झोप उडवून दिली. १५ ते १७ सप्टेंबरपर्यंत कृष्णा व्हिएतनाम दौर्‍यावर होते. चीनच्या दक्षिण सागरात भारत लवकरच तेल आणि वायूचा शोध घेण्याचे काम सुरू करणार आहे. कृष्णा यांचा दौरा सुरू होण्याच्या प्रारंभीच चीनने भारताच्या या शोध मोहिमेला विरोध करून उभय देशांमधील संबंध अजून विसविशीत झाल्याचे संकेत दिले. यापूर्वी ऐरावत हे भारतीय नौसेनेचे जहाज व्हिएतनामच्या सद्भावना यात्रेवर असताना चीनच्या नौसनेने २२ जुलैला या जहाजाला चीनच्या दक्षिण सागरी सीमेतून बाहेर जाण्यास सांगितले होते. भारताने ही घटना फारशी गांभीर्याने घेतली नाही. तथापि, चीनच्या दक्षिण सागरी किनार्‍यावर तेल संशोधनाला चीनने केलेला विरोध झुगारून आंतरराष्ट्रीय सीमेत मुक्तपणे संचार करण्याचा आमचा हक्क कोणीही डावलू शकत नाही, या शब्दात चीनला खडसावले.
खरे तर व्हिएतनामशी चीनचे शत्रुत्व हे फार जुने आहे. पूर्वी व्हिएतनामवर चीनचे वर्चस्व होते. १८८४ मध्ये चिनी सेनेचा फान्सने पराभव केला आणि हिंद चीनवरील (कम्बोडिया, लाओस आणि व्हिएतनाम) चीनचे अधिपत्य संपले. तथापि, कंबोडियात व्हिएतनामची ढवळाढवळ सुरू राहिल्याने चीनने तेथील खमेर रुज संघटनेचे पॉल पॉट यांच्या सरकारला समर्थन दिले. नंतर व्हिएतनामने सोव्हिएत रशियाशी केलेल्या मैत्री करारामुळे चीनची नाराजी वाढतच गेली. सरतेशेवटी चीनने फेब्रुवारी १९७९ मध्ये व्हिएतनामवर हल्ला केला. त्यावेळी भारतात जनता पार्टीचे सरकार होते व या सरकारचे परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी चीनच्या दौर्‍यावर होते. त्या दरम्यान, झालेल्या हल्ल्यामुळे नाराज होऊन वाजपेयी चीन दौरा अर्ध्यावर टाकून भारतात परतले होते. या युद्धात चीनचे ४० हजार सैनिक, तर व्हिएतनामचे १ लाख सैनिक धारातीर्थी पडलेे. चीनच्या सेनेने हनोईपर्यंत मुसंडी मारली. आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीनला दोन आठवड्यातच आपले बस्तान तेथून हलवावे लागले. पण, सोव्हिएत संघ मोडीत निघेपर्यंत उभय देशांमध्ये तणाव कायम होता. व्हिएतनामच्या सागरी किनार्‍यावरही तेल आणि वायूचा शोध घेण्याच्या निमित्ताने कब्जा करण्याचे प्रयत्न चीनने करून पाहिले. संपूर्ण दक्षिण चिनी सागरच नव्हे तर परसेल्स आणि स्प्रेतली द्वीपसमूह घशात घालण्यासाठी चीन व्हिएतनामशी संघर्ष करीत आहे. याचे कारण म्हणजे या दोन्ही द्वीपांमध्ये मुबलक प्रमाणात तेल आणि वायूचा साठा सापडण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे दक्षिण चीनी सागरी क्षेत्रातून व्हिएतनामला हुसकावून लावण्याचे चीनचे प्रयत्न सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी सीमा नियमानुसार या क्षेत्रावरील व्हिएतनामचे नियंत्रण वैध आहे. ओएनजीसी विदेशी, ही भारतीय कंपनी आणि पेट्रो व्हिएतनाम यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार भारताने तेथे तेल आणि वायू शोध मोहीम हाती घेताच चीनची अस्वस्थता वाढली. व्हिएतनाम हे आपले प्रभावक्षेत्र असल्याची धारणा असल्याने, या प्रभावक्षेत्रातील भारताची उपस्थिती आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्याचे प्रयत्न त्याला खपले नाही. भारताच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून चीन पाकव्याप्त काश्मीरध्ये आपल्या लष्कराच्या मदतीने जलविद्युत आणि रस्ते निर्माण प्रकल्प राबवीत आहे. कराचीजवळील ग्वादरमध्ये बंदर निर्माण करण्याचे कार्यदेखील चीनने हाती घेतले असून त्याद्वारे भारताच्या सुरक्षेला हा देश थेट आव्हान देऊ लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताच्या विदेश धोरणात अचानक झालेल्या वेगवान घडामोडींमुळे चीनचा उष्मा वाढला आहे. वास्तविक भारताच्या अंतर्गत राजकारणातील गोंधळामुळे मनमोहनसिंगांच्या पूर्व आशियाई देशांच्या संदर्भातील परराष्ट्र धोरणाने दिलेला लष्करी संदेश झाकोळला गेला. भारतासाठी आता अमेरिका किंवा युरोपपेक्षाही, पूर्व आशिया, जपान, कोरिया आणि चीनच्या भूप्रदेशातील लष्करी सामर्थ्य आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे देश फायद्याचे ठरणार आहेत.
हे क्षेत्र गेल्या १० शताब्दींपासून भारताची संस्कृती आणि बुद्धाच्या उपदेशामुळे आपल्यासाठी मैत्रीपूर्ण राहिले आहे. मात्र मानसिक दास्यामुळे आपली नजर केवळ पाश्‍चिमात्य देशांकडे राहिली आणि चीनने या क्षेत्रात त्यांचा प्रभाव विस्तार करून टाकला. व्हिएतनाम चंपा देश या नावाने भारतीय साहित्यात ओळखला जातो. येथील शिवमंदिरे हजारो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली आहेत. दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये अनेक कारणांसाठी व्हिएतनामचे महत्त्व आहे. चीन चहू बाजूंनी घेरून भारताला अस्थिर करण्याच्या कामाला लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर चीन ज्या देशांना आपले प्रभावक्षेत्र मानतो अशा दक्षिण, दक्षिणपूर्व आशियाई तसेच पूर्व आशियातील राष्ट्रांशी पारंपरिक मैत्री संबंध मजबूत करून भारताने प्रत्युत्तर द्यायला हवे.
व्हिएतनाम हे प्रखर राष्ट्रभक्तीने परिपूर्ण असलेले राष्ट्र आहे. गेल्या शतकात त्याने चीन, फान्स आणि अमेरिकेसारख्या महाशक्तींना पराभूत करून जगाला आश्‍चर्यचकित करून टाकले होते. गेल्या १० वर्षांत व्हिएतनामशी आपले आर्थिक संबंध दहापटीने वाढलेले असून उभय देशांमध्ये सुमारे तीन अरब डॉलर्सची देवाणघेवाण होते. भारत व्हिएतनामच्या वायुसेनेच्या पायलटांना प्रशिक्षित करीत आहे. या देशाला गैरपरमाणू क्षेपणास्त्रे देण्याचाही भारताचा विचार आहे. पूर्व आणि दक्षिण-पूर्व क्षेत्रात चीनचे वाढत जाणारे युद्धखोर धोरण आणि आर्थिक प्रभाव आटोक्यात आणण्यासाठी व्हिएतनाम हा देशच आपला स्वाभाविक आणि विश्‍वसनीय मित्र आहे. नोव्हेंबर २०००मध्ये भारताने व्हिएतनानसोबत गंगा मेकोंग सहयोग करारावर स्वाक्षर्‍या केल्या. त्यावेळी जसवंतसिंह आपले परराष्ट्र मंत्री होते. त्यांच्यासोबत पत्रकार प्रतिनिधी म्हणून मी गेलो होतो. व्हिएतनामी जनतेत भारताबद्दल एक सहजभाव आणि आत्मीय प्रेमाची भावना दिसून येते. जगातील महाशक्तींना देशभक्तीच्या प्रबळ भावनेच्या ताकदीमुळे हरवणार्‍या या देशाबद्दल भारतीयांच्या मनातही आदराचे स्थान आहे.
आमचे प्ररराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी त्यांच्या व्हिएतनाम दौर्‍यात संरक्षण, व्यापार, शिक्षण, संस्कृती आणि आर्थिक गुंतवणूक आदी विषयांवर चर्चा केली. २०११ ते २०१३ या काळात भारतातर्फे व्हिएतनामला दिली जाणारी मदत, तेल आणि वायू संशोधन, संरक्षण सहयोग, स्थलसेना, वायुसेना आणि नौसेनेचा संयुक्त अभ्यास, मीडिया प्रतिनिधींचे आदानप्रदान आणि पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत करार झाले. कृष्णा यांच्या हस्ते २० लाख अमेरिकी डॉलर्सच्या भारतीय मदतीतून साकार झालेल्या एका संशोधन केंद्राचे उद्घाटन झाले. या केंद्रात व्हिएतनामचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेता येईल. इंग्रजी भाषा शिकवण्याचे केंद्र तसेच संगणक प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीतही भारत या देशाला मदत करीत आहे. या क्षेत्राचे लष्करीदृष्ट्या महत्त्व आणि चीनच्या आव्हानाच्या संदर्भात त्याची आवश्यकता लक्षात घेता भारताचा या देशाशी सहयोग आणखी वाढू शकतो. सध्याच्या घटकेला भारताने व्हिएतनामशी केलेल्या करारांची सफलता हीच आमच्यासाठी एक मोठी उपलब्धी म्हटली जाऊ शकते.
(लेखक राज्यसभा सदस्य आहेत)
तरुण भारत, 9/23/2011

Posted by : | on : 28 Sep 2011
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *