सडेतोड : अरुण रामतीर्थकर
कॉंग्रेसच्या दृष्टीने भावी पंतप्रधान असलेले राहुल गांधी यांनी स्वतःला ब्राह्मण घोषित केले. कोणत्या आधारावर? जन्माच्या आधारावर की कर्माच्या आधारावर? मातृसत्ताक वारशाने की पितृसत्ताक वारशाने? त्यांच्या वंशावळीचे तपशील तपासले तर त्यांना हिंदुही म्हणता येणार नाही? मग ब्राह्मण ही लांबची गोष्ट. मात्र राहुललाही जातीचा आश्रय घ्यावा लागला, यावरून कॉंगे्रसची हताशा स्पष्ट झाली.
गेल्या आठवड्यात राहुल गांधींने मजाच केली. एकदम स्वतःला ब्राह्मण म्हणून घोषित करून टाकले. जातीभेद मिटवण्याची खोटी का होईना पण प्रतिज्ञा केलेल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला आपली जात घोषित करावी लागली, यातच सर्व आले. सत्य हे आहे की जातीचे राजकारण खेळणारा कॉंग्रेस पक्ष हाच भारतातील क्रमांक एकचा जातीयवादी पक्ष आहे. भले श्रीमंत असेल, परदेशात शिकून पदवी घेतलेला असेल तरीही जातीचा आधार घेतल्याशिवाय राहुलचेही चालत नाही. आता प्रश्न एवढाच की, हा राहुल स्वतःला काही म्हणो, त्यात सत्याचा अंश किती याची तपासणी व्हायलाच हवी.
एक तर जन्मावर आधारित जात ही आता कालबाह्य ठरत आहे. आता कर्मानुसार जात ठरते. एखादा दलित महाविद्यालयात प्राध्यापक असेल तर तो ब्राह्मण समजला जाईल. एखादा ब्राह्मण सैन्यात असेल तर तो क्षत्रिय होईल ही व्यवस्था अजून पूर्णपणे अंगवळणी पडलेली नाही. तरीही आगामी काळातील जातीव्यवस्था ही जन्मावर नव्हे तर कर्मावर आधारित असेल. मुळात जातीव्यवस्थाच संपवण्याचा प्रामाणिक प्रयत्न रा.स्व.संघासारख्या हिंदुत्ववादी संघटना करीत आहेत. त्यांचे प्रयत्न काही प्रमाणात फलद्रुपही झाले आहेत. मात्र जातीव्यवस्था संपवू पाहणार्यांनाच जातीयवादी म्हणावे ही नेहरूंपासून कॉंग्रेसने शिकवण दिली. यादव, जाट, कुर्मी, वाल्मिकी, नायर असे जातीचे नेते सेक्युलर झाले. या देशात नेता व्हायचे तर जातीच्या कुबड्या घ्याव्या लागतात. याचे ज्ञान राहुलला आता झाले आहे. जात जन्माने मानतात किंवा कर्माने. आपण राहुलच्या ब्राह्मण्याचा दोन्ही अंगानी विचार करू. आणखी एक सवलत देऊ. मातृसत्ताक पद्धत म्हणत असेल तर त्या पद्धतीने आणि पितृसत्ताक म्हणत असेल तर तसेही पाहू. राहुलची आई सोनिया या जन्माने रोमन कॅथॉलिक. त्यांचे आईवडील हेही कॅथॉलिक. मातृसत्ताक पद्धतीने राहुलचे ब्राह्मण्य पहिल्या टप्प्यातच संपते. पितृसत्ताक पद्धतीने विचार केला तर वडील राजीव गंाधी. त्यंाच्या वडिलांचा कोणी विचारच करत नाही. राहुलच्या आजोबांचे नाव होते. फिरोजखान दारूवाला. फिरोज हे नाव मुस्लिम आणि पार्शी लोकात असते. राजीव गांधी यांचे पिता आणि इंदिरा गांधी यांचे यजमान फिरोज गांधी हे पार्शी होते. असे भासवले गेले. का? नेहरू आणि गांधी यांचे मुस्लिम प्रेम जगजाहीर आहे. १९४७ साली पाकिस्तानात लाखो हिंदुंची कत्तल झाली, लाखो हिंदु इस्टेट सोडून नेसत्या वस्त्रानिशी निर्वासित म्हणून भारतात आले. अगणित हिंदु स्त्रियांवर बलात्कार झाले. हे सर्व चालू असताना नवजात पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्यासाठी हट्ट करणार्या गांधींना फिरोजचे दारूवाला हे मुस्लिम नाव का चालले नाही. इतरांना दिला तो सल्ला गांधींनी नेहरूंना का दिला नाही? प्रियदर्शिनी जवाहर नेहरू आणि फिरोजखान नबाबखान दारूवाला अशा नावाने विवाह होण्याची नेहरू आणि गांधी या दोघांना लाज का वाटली? ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’ ही वृत्ती नेहरू-गांधींची होती. ती या लग्नातून स्पष्ट झाली.
नेहरूंचे स्वीय सहाय्यक जॉन मथाई यांनी ‘रेमिनीसेन्स ऑफ द नेहरू एज’ या नावाचे एक पुस्तक लिहिले असून, त्यात राहुलच्या आजोबा-आजीच्या लग्नाचा व्यवस्थित उल्लेख आहे. खुद्द नेहरूंना मुसलमान जावई मान्य नव्हता. नेहरू स्वतः दारू पित होते, सिगारेट ओढत होते. पण दारूवाला हे नाव त्यांना स्टेटसला योग्य वाटत नव्हते. मग गांधींनी फिरोजखान दारूवालास आपले गांधी आडनाव दिले. आडनाव दिले म्हणजे त्याला दत्तक घेतला की काय केले हे माहिती नाही. नुसते आडनाव दिले. नबाबखान दारूवाला म्हणजे इंदिरा गांधींच्या सासर्यांना हा प्रकार बिलकूल मान्य नव्हता. सुनेने मुस्लिम धर्म स्वीकारला तरच लग्न होईल असे ते म्हणाले.
मग सारी मंडळी लंडनला गेली. तेथे प्रियदर्शिनी नेहरू यांनी मुस्लिम धर्म कबूल केला. मैमुना बेगम असे त्यांचे नाव ठेवले. लंडनच्या मशिदीत फिरोजखान आणि मैमुना बेगम यांचा म्हणजे राहुलच्या आजोबा आजीचा विवाह झाला. नबाबखान खुश झाले. परत आल्यावर फिरोजखान दारूवालाचा फिरोज गांधंी झाला. तो पार्शी आहे असे सांगण्यात आले. आणीबाणीला अनुशासनपर्व म्हणणारे सरकारी संत विनोबा भावे यांनी हिंदु आणि पार्शी धर्माची भेळ करून हे लग्न लावून दिले. हे फिरोज गांधी पुढे विरोधी पक्षाचे खासदार झाले. नेहरूंना अनेक प्रकारे डोकेदुखी झाली. अखेर इंदिरा-फिरोज यांनी काडीमोड करण्याचे घ्यायचे ठरले. तो प्रत्यक्ष होण्यापूर्वीच फिरोज गांधींचे निधन झाले. गेल्या ५० वर्षांत कॉंग्रेसने किंवा नेहरू घराण्यातील कोणी फिरोज गांधींची जयंती-पुण्यतिथी सोडा, नावही काढले नाही. इंदिरा गांधींनी आपले नाव इंदिरा फिरोज गांधी असे न ठेवता इंदिरा नेहरू गांधी असे केले. या लोकांनी फिरोज नावावर काट मारली तरी राहुलची वंशावळ न्याहाळताना त्याचे आजोबा फिरोजखान आणि पणजोबा नबाबखान होते, या गोष्टी कशा विसरता येतील.
या पार्श्वभूमीवर राहुल ब्राह्मण नाहीच पण हिंदु आहे का याचीच शंका आहे. तो मुस्लिम आहे म्हणावे तर आई ख्रिश्चन, बहीणही ख्रिश्चन. असे म्हणतात की, इंग्लंडमध्ये त्याची कोलंबियन मैत्रिण असून राहुलने ख्रिस्ती धर्म स्वीकारून तिच्याशी लग्नही केले आहे. म्हणूनच तो भारतात लग्नाचे नाव काढत नाही. प्रश्न एवढाच की बहीण, आई ख्रिश्चन, आईचे वडील ख्रिश्चन, वडिलांचे वडील मुस्लिम. तरीही राहुल मी ब्राह्मण आहे असे म्हणतो, किती कावेबाजपणा.
ब्राह्मण्य विद्येवरही ठरते. राहुल परदेशातून मोठी पदवी घेऊन आला असे म्हणतात. एक सांगतो विदेशी पदवी आणि फाडफाड इंग्रजी बोलणे म्हणजे फार अक्कल असे समजण्याचे दिवस संपले. परदेशात अनेक बोगस विद्यापीठे आहेत. इंग्रजी बोलण्याचे म्हणाल तर लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील हमालही फाडफाड इंग्रजी बोलतो. खुद्द सोनिया आपण केंब्रिजचे पदवीधर असल्याचे म्हणत होत्या. डॉ. सुब्रमण्यम स्वामी तेथे शिकवायला जात होते. त्यांनी तेथे चौकशी केली असता, सोनिया तेथील पदवीधर नाहीत असे कळले. १९९९ च्या निवडणूक अर्जात सोनिया केंब्रिजच्या पदवीधर होत्या. डॉ. स्वामींनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करताच २००४ च्या निवडणूक अर्जात केंब्रिजची पदवी गायब झाली.
आईचे हेच संस्कार राहुलवर झाले. डॉ.स्वामी यांनी ८ एप्रिलच्या ‘जनता की अदालत’ या टी.व्ही. कार्यक्रमात राहुलचे शिक्षण काढले. केंब्रिजमधून राहुलला ४ महिन्यांत हाकलून देण्यात आले. त्यानंतर प्लोरिडाच्या एका बोगस विद्यापीठातून त्याने पदवी आणली. प्रत्यक्षात भारतीय परिमाणानुसार राहुल दहावी नापास आहे. राहुल गांधी हे पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत असे पहाण्यासाठी ज्यांचे डोळे आणि ‘भारत की प्रभुता और अखंडता प्रक्षुण्ण रखुंगा’ असे ऐकायला ज्यांचे कान आतुरलेले आहेत त्यांना हे वाचून संताप येणे स्वाभाविक आहे. पण त्यांनी आता आपल्या नेत्याची लायकी ओळखावी. प्रकरण येेथेच संपत नाही. प्रियंकाशी लग्न झाल्यापासून रॉबर्ट वडेराची संपत्ती किती वाढली, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे विदेशी बँकेत किती पैसे आहेत असे आरोप डॉ.स्वामी नेहमी करतात. मानहानीचा दावा दाखल करा, असे सोनिया-राहुल-रॉबर्ट यांना आव्हान देतात. तिघेही गप्प आहेत.
असा हा राहुल. आपण ब्राह्मण असल्याचे सांगून त्याने जातीव्यवस्थेेस उत्तेजन देण्याचे पाप केलेच. पण तो स्वतः नेमका कोण याची शहानिशा करण्याची संधी देऊन घोडचूक केली.
रविवार, दि. २२ एप्रिल २०१२