Home » Blog, इतर
सरहद को प्रणाम!

सरहद को प्रणाम!

Author : •प्रशांत देशपांडे• सरहद को प्रणाम हा कार्यक्रम देशाच्या आजच्या नवीन  पीढीला देशाची  भूसीमा किती आहे, तेथील भागात राहणार्‍यांचे जीवन. परिवारासोबत परिचय व्हावा तेथील पर्यावरण व सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करावा आपल्या ज्ञानात भर पडावी ‘देश रक्षा धर्म हमारा देश रक्षा कर्म हमारा’ हा मंत्र जपत आपण एक चांगले नागरिक आहोत या नात्याने सीमावासीयांच्या समस्या, जीवनमान समोर याव्यात या समस्यांचे निराकरण व्हावे, असा प्रयत्न करावयाचा हा उद्देश ‘सरहद को प्रणाम’ या कार्यक्रमाचा आहे. ‘सरहद को प्रणाम’ २०१२ राष्ट्र जागरणाचा हा...
ऐतिहासिक निवडणूक

ऐतिहासिक निवडणूक

Author : •सडेतोड : अरुण रामतीर्थकर• केशुभाईंचा गुजरात परिवर्तन पक्ष भाजपाची मते खाईल यात तथ्य आहे, पण त्याच वेळी कॉंग्रेसची मोदीविरोधी आणि सेक्युलर मते आहेत त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस, जनला दल संयुक्त आणि बसपा असे तिघेजण कुरतडत आहेत. त्यामुळे पुन्हा मोदी हे निर्विवाद सत्य १००-१२५ की १५० एवढीच उत्कंठा. गेले वर्षभर गाजत असलेली गुजरात, विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आता अगदी अखेरच्या टप्प्यात आहे. आणखी १०० तासांनी जेव्हा चित्र स्पष्ट होईल ते इतिहास घडवणारे असेल. मग निकाल कसा का लागेना. गुजरातबरोबर हिमाचल प्रदेशचीही...
एका विश्‍वविद्यालयाची स्थापना

एका विश्‍वविद्यालयाची स्थापना

Author : •सडेतोड : अरुण रामतीर्थकर• जुन-जुलै मधील वृत्तपत्रे काढली तर शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेली अनधिकृत शाळांची यादी दिसेल. एकीकडे शिक्षण हा मूलभूत अधिकार असे म्हणताना मुलांना शिक्षण देणार्‍या शाळा अनधिकृत ठरतातच कशा? अडाणी नागरिकांपेक्षा अनधिकृत शाळेत शिकून साक्षर झालेले नागरिक देशाला लांच्छानास्पद आहेत काय? काही महिन्यांपूर्वी पंढरपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची मान्यताच परीक्षेपूर्वी सोलापूर विद्यापीठाने रद्द केली. खुद्द सोलापूर विद्यापीठालाच अजून यु.जी.सी.ची मान्यता नाही. ही उदाहरणे एवढ्यासाठीच की, ‘शहाणे करून सोडावे सकळजन’ ही उक्ती आचरणात आणायची झाल्यास किती सव्यापसव्य करावे लागते...
अजमल संपला, आता अफझलचे बोला

अजमल संपला, आता अफझलचे बोला

Author : •सडेतोड : अरुण रामतीर्थकर• कसाबला फाशी देणे यात सरकारच्या देशभक्तीचा लवलेश नाही. यात फक्त राजकारण आहे. कसे ते पहा. २६/११ च्या हल्ल्यात साळस्कर, करकरे, कामटे आणि ओंबाळे यांच्यासह १९ पोलीस शहीद झाले. करकरेंना कसाब नव्हे, तर हिंदुत्वावाद्यांनी मारले असे कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह म्हणाले नव्हते? खटला चालू असताना हे विधान म्हणजे कसाबला वाचवण्याचाच प्रकार नव्हता काय? अजमल अमीर कसाब या पाकिस्तानी अतिरेक्याला बुधवारी सकाळी येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. फाशीनंतर ही बातमी जगाला सांगण्यात आली. बातमीचा प्रवास ५ नोव्हेंबरला...
फक्त बाटलीच नवी

फक्त बाटलीच नवी

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर या बाटलीचा शिरोभाग म्हणजे आतील द्रवावर राहुल गांधी यांचा असलेला प्रभाव. ही बाब खरी असेल तर या मंत्रिमंडळाच्या पात्रतेबद्दल अपेक्षाच ठेवायला नको. मुळात राहुल गांधी किती कार्यक्षम हाच यक्षप्रश्‍न आहे. उगीच कलावतीच्या घरी जाऊन जेवायचे आणि बाह्या सावरत अडाणी जनतेला खोटी आश्‍वासने द्यायची या पलीकडे त्यांच्या बुद्धीची झेप गेलेली दिसत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाचा सोमवारी जो विस्तार आणि खातेबदल झाला त्याचे एका वाक्यात वर्णन करायचे तर फक्त बाटलीच नवी आतील ** जुनीच असेच करावे लागेल....
मुकी बिचारी कुणी हाका

मुकी बिचारी कुणी हाका

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर   मला आश्‍चर्य वाटते ते कॉंग्रेस पक्षाचे. मतांसाठी लाचारी ही तर त्यांच्या रक्तात भिनली आहे. कोंडवाड्यात जनावरे घातल्यावर कॉंगे्रस पुढार्‍यांचे तेथे काय काम! तेथे ते कोणाची बाजू घेत होते? पोलीस अधिकार्‍यांना फार दोष देता येत नाही कारण त्यांनी कायद्यानुसार कारवाई केली की कॉंग्रेसवाला तेथे कडमडलाच म्हणून समजा. मग दडपण आणायचे. केलेली कारवाई मागे घेण्याची नामुष्की नको म्हणून कारवाईच करायची नाही अशी वृत्ती यामुळे तयार होते. हा वाक्यप्रयोग मनुष्यप्राण्यांबाबत वापरला जातो. मात्र त्यात चतुष्पाद प्राणी...
केजरीवाल कोणाचा घात करणार?

केजरीवाल कोणाचा घात करणार?

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर भाजपाला सत्तेवर येण्याची संधी असताना केजरीवाल दिल्ली विधानसभेच्या सर्व जागा लढवून कॉंग्रेसविरोधी मतात फूट पाडत आहेत. निकराच्या लढाईत हजार बाराशे मते घेऊन केजरीवालांचे उमदेवार पडतील. त्यांची हजार बाराशे मते कॉंग्रेस विरोधातील असतील. साहजिकच केजरीवाल यांची ही खेळी कॉंग्रेसला चौथ्यांदा दिल्लीची सत्ता मिळवून देणारी आहे. अशारीतीने भाजपची मते खाण्यासाठी कॉंग्रेसची सुपारी घेऊन केजरीवाल नवा पक्ष काढत आहेत. अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला चॉकलेटच्या बंगल्याला बिस्किटाचे दार अशा ओळीचे एक बालगीत आहे. चॉकलेटचा बंगला बिस्कीटाची दारं, खिडक्या...
वैचारिक घुसखोरीचा गोंधळ

वैचारिक घुसखोरीचा गोंधळ

Author : •डॉ. मनमोहन वैद्य• अखिल भारतीय प्रचारप्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घुसखोर म्हटलं की आपल्या मनात सीमेपलीकडून आपली सुरक्षा व्यवस्था भेदून आपल्या देशात घुसणारी परदेशी माणसंच येतात. त्यांच्यामुळे निर्माण होणार्‍या राष्ट्रीय सुरक्षा, देशांतर्गत कायदा व्यवस्था, रोजगार, सामाजिक तणाव आदी देशाला भेडसावणारे प्रश्न डोळ्यांपुढे येतात. ही भौतिक  पातळीवरील घुसखोरी झाली; व त्याचा योग्य बंदोबस्त करायला हवा व आपली सीमा सुरक्षा दले आपल्या परीने त्यासाठी प्रयत्न देखील करीत असतात. परंतु घुसखोरीचा विचार असा केवळ भौतिक पातळीवरच करून चालणार नाही. आपल्या राष्ट्रजीवनात, सामाजिक...
सोशल मीडियाचा समाजविघातक वापर

सोशल मीडियाचा समाजविघातक वापर

Author : •पंचनामा : भाऊ तोरसेकर• ज्या दिवशी अवघी मुंबई रस्त्यावर लोटली होती, आणि कलानगर वांद्रे ते शिवाजीपार्क सेनाभवनच्या तीन चार किलोमिटर्स रस्त्यासह आसपासच्या इमारतीवर जनसागराची त्सुनामी आली होती, तेव्हा मुंबईपासून ७०-८० किलोमिटर्स दूर असलेल्या पालघर या छोटेखानी शहरामध्ये एका विशीतल्या मुलीने फ़ेसबुकवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. ‘जगात रोज कित्येक माणसे मरत असतात, पण जग चालूच असते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या मृत्यूनंतर दोन मिनिटांची शांतता पाळली गेली, त्यांच्याच बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मग सक्तीने बंद पाळावा का?’ काहीशी तशीच पण अस्पष्ट...
हिमाचल प्रदेशमध्ये ‘मिशन रिपीट’ यशस्वी ठरणार?

हिमाचल प्रदेशमध्ये ‘मिशन रिपीट’ यशस्वी ठरणार?

Author :  राज्याला स्वावलंबी आणि आर्थिकदृष्टया सक्षम बनविणे हे या सरकारने आपले लक्ष्य ठेवले. भाजपा सरकारने केलेली हीच विकासकामे निवडणूक अजेंडयावर घेऊन भाजपा नेते आणि कार्यकर्ते प्रचाराच्या रणभूमीत उतरले आहेत. ‘मिशन रिपीट’चा नारा देत भाजपाने जनतेच्या मनात स्वतःचे स्थान पक्के करण्याचा प्रयत्न केला आहे.हिमाचल प्रदेशमध्ये नवरात्रीचे ढोल वाजण्याच्याही आधी  निवडणुकांचे ढोल वाजू लागले. पितृपंधरवडा संपताच सर्वच उत्सुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी रांगा लावल्या. जागोजागी लागलेल्या बॅनर्स व स्वागत फलकांवरून, सणासुदीच्या दिवसात उत्साहाने व चैतन्याने भारलेल्या या वातावरणाचा निवडणूक प्रचारासाठी फायदा करून...