Home » Blog
मोदींच्या नेतृत्वाचे दशक

मोदींच्या नेतृत्वाचे दशक

Author :  गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या सलग कार्यकाळाला दहा वर्षे नुकतीच पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आपल्या प्रभावी नेतृत्वाने गुजरातला प्रगतीची एक नवी दिशा देत, सर्वधर्मसमभावाचे धोरण अंगीकारीत, आपल्या राज्याला त्यांनी विकासाच्या अत्युच्च शिखरावर नेऊन विराजमान केल्याची ही पावती म्हणावी लागेल. शेती असो, शेतकरी असो, उद्योग असो, रस्ते असोत, पिण्याचे पाणी असो, सामाजिक सुधारणांच्या योजना असोत… मोदींचा गुजरात नेहमी क्रमांक एकवर राहिला आहे. सर्वांना समान न्याय या तत्त्वाचे त्यांनी खर्‍या अर्थाने पालन केले. त्यामुळेच आज गुजरातचा शेतकरी मोटारीतून फिरतो...
गज़लविराम!

गज़लविराम!

Author :  ‘ये दौलतभी ले लो, ये शौहरतभी ले लो भले छिन लो मुझसे मेरी जवानी मगर मुझको लौटा दो बचपन का सावन वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी’ या ओळींनी असंख्य रसिकांच्या हृदयात अढळ सिंहासन प्राप्त केलेल्या गजलसम्राट जगजित सिंह यांनी आज अखेर मृत्यूला कवटाळले. ‘मौत भी मै शायराना चाहता हूँ-आ तुझे मै गुनगुनाना चाहता हूँ|’ या मुलायम स्वरांमध्ये मृत्यूलाही सहज स्वीकारण्याचे स्वप्न पाहणार्‍या जगजित सिंह यांनी गजलच्या क्षेत्रावर अक्षरशः राज्य केले. दोन आठवडे झुंजल्यानंतर अखेर जगजित...
गरिबी हटविण्याची इच्छा कुणाची आहे?

गरिबी हटविण्याची इच्छा कुणाची आहे?

Author : अन्वयार्थ: तरुणविजयगरिबीच्या दस्तावेजांवरून सुरू झालेल्या वादविवादाने अमेरिकेत होणार्‍या गेल्या काही वर्षांतील ‘गरीब थिम’वाल्या पार्ट्यांची आठवण झाली. या पार्ट्यांमध्ये करोडपती कुबेर गरिबांसारखे कपडे घालून मलाईदार आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत असत. शहरात दररोज ३२ रुपये आणि खेड्यांमध्ये दररोज २६ रुपये कमावणार्‍या व्यक्तीला गरीब म्हणता येणार नाही, त्याचप्रमाणे अशी व्यक्ती केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या मदतीस पात्र ठरणार नाही, यावर मॉण्टेकसिंग अहलुवालिया आणि अर्थशास्त्रातील मोठ-मोठ्या विद्वानांनी सहजासहजी शिक्कामोर्तब केले. तथापि, विरोधकांनी हो हल्ला केल्यानंतर मॉण्टेकसिंग अहलुवालिया आणि जयराम रमेश यांनी एका...
जॉन आणि जॅकी

जॉन आणि जॅकी

Author : विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले    आपल्या कारकीर्दीत तर ते लोकप्रिय होतेच, पण आजही जनतेच्या मनातलं ज्यांचं स्थान जराही ढळलेलं नाही, असे काही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होऊन गेलेत. त्यांनी खरोखरच इतिहास घडवलाय्. पहिला मान अर्थातच जॉर्ज वॉशिंग्टनचा. मग बेंजामिन फ्रँकलीन, अब्राहम लिंकन, फर्डिनांड रुझवेल्ट आणि शेवटी जॉन केनेडी. सुरुवातीच्या काळात राष्ट्राध्यक्षांची पत्नी हा फारसा कुतूहलाचा, बातमीचा वगैरे विषय नव्हता. फर्डिनांड रुझवेल्ट यांच्या वेळेपर्यंत हा काळ पालटला होता. त्यामुळे रुझवेल्ट यांची पत्नी एलेनॉर हिला प्रसिद्धिमाध्यमांनी खूप प्रसिद्धी दिली. मुळात रुझवेल्ट लोकप्रिय...
दिल्ली दरबार

दिल्ली दरबार

Author : दिल्ली दरबार: रविंद्र दाणीरेकॉर्ड    जम्मू- काश्मीर विधानसभेत सोमवारी एक अभूतपूर्व घटना घटली. सदस्यांनी- मंत्र्यांनी असांसदीय शब्दांचा वापर करणे आणि सभापतींनी ते शब्द कामकाजातून काढून टाकणे ही सामान्य बाब समजली जाते. लोकसभा- विधानसभांमध्ये हे होत आलेले आहे.पण, जम्मू – काश्मीर विधानसभेत सभापती मोहम्मद अकबर लोन यांनी पीडीपीच्या नेत्यासाठी- मौलवी इफ्तिखार अन्सारी यांच्यासाठी अतिशय आक्षेपार्ह असे शब्द वापरले. दूरचित्रवाणी वाहिन्यांनी ते शब्द गाळून वृत्त दिले. पण, सभागृहाच्या कामकाजात त्यांची नोंद झालेली आहे. हे शब्द कामकाजातून कसे बाहेर काढले जाणार, त्यातील...
सरकारचे प्राण आले कंठाशी !

सरकारचे प्राण आले कंठाशी !

Author : प्रहार : दिलीप धारुरकर     केंद्र सरकारचे प्राण अगदी कंठाशी आले होते. प्रणव मुखर्जी यांनी चांगलीच हाराकिरी केली होती. जे झाकली मूठ उघडली गेली आणि पी. चिदंबरमच नव्हे तर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याही अंगाशी हा प्रवण मुखर्जी यांचा लेटरबॉम्ब आला होता. अखेर सोनिया गांधी यांनी डोळे वटारले आणि प्रणव मुखर्जी यांनी कशीबशी कसरत करत न पटणारा खुलासा करून वादावर पडदा टाकल्यासारखे केले. या देशातील प्रसारमाध्यमे ही सुद्धा बातम्या आणि घटना कशात तोलतात असा प्रश्‍न पडावा अशी स्थिती आहे. असाच...
सरकारमधील युद्धबंदीत गृहमंत्री जायबंदी!

सरकारमधील युद्धबंदीत गृहमंत्री जायबंदी!

Author :  दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी     कुरुक्षेत्रावरील युद्धात सूर्यास्त झाला की त्या दिवसाचे युद्ध थांबत असे. गुुरुवारच्या सायंकाळी, सूर्यदेवता राष्ट्रपतिभवनाच्या भव्य घुमटामागे अस्तास जात असताना सरकारमधील वरिष्ठ मंत्री नॉर्थ ब्लॉकच्या प्रांगणात येऊन स्पेक्ट्रम प्रकरणी सरकारमध्ये सुरू झालेले ‘महाभारत’ संपल्याची घोषणा करीत होते. पण, तेथे उपस्थित असणार्‍यांना ही युद्धबंदी फक्त काही दिवसांची आहे, हेही दिसत होते. देशाचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, गृहमंत्री पी. चिदंबरम् , विधिमंत्री सलमान खुर्शीद, दळणवळण मंत्री कपिल सिब्बल गंभीर चेहर्‍याने बाहेर आले. मुखर्जींनी १२ ओळींचे एक निवेदन...
अण्णा, तेथे कशासाठी जाणार?

अण्णा, तेथे कशासाठी जाणार?

Author : मुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैनकाही दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी पाकिस्तानातून एक प्रतिनिधी मंडळ, त्यांच्या राळेगणसिद्धीच्या निवासी आले. अण्णांना भेटल्यानंतर प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी त्यांना पाकिस्तानच्या दौर्‍यावर येणाचा आग्रह केला. मागील काही दिवसांपासून अण्णांचे प्रसारमाध्यमांशी जोडले जाणे, हाच या दौर्‍याचाही उद्देश होता. दिल्लीमध्ये अण्णांचे उपोषण चालू असताना पाकिस्तानातील वर्तमानपत्रांत बातम्या प्रकाशित होत होत्या की, पाकिस्तानमध्येही काही लोक अण्णांप्रमाणे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू करू इच्छितात. अण्णांचे आंदोलन सङ्गल झाल्याने पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाने भारतात येऊन अण्णांना विनंती केली की, त्यांनी पाकिस्तानमध्ये येऊन भ्रष्टाचार...
मोदींच्या उपवासाने राजकीय उष्मा वाढला!

मोदींच्या उपवासाने राजकीय उष्मा वाढला!

Author : मोदींच्या उपवासाने राजकीय उष्मा वाढला!•दिल्ली दिनांक : रवींद्र दाणीविजयाची अभिव्यक्ती दोन प्रकारे करता येते. उन्माद आणि विनम्रता. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सर्वोच्च न्यायालयात त्यांना मिळालेला विजय विनम्रतेनेे साजरा करण्यासाठी तीन दिवसांचा उपवास करीत आहेत. मोदी हा विजय  ढोल-नगारे वाजवूनही साजरा करू शकत होते. पण, अभिव्यक्तीचा तो प्रकार योग्य ठरणार नाही याची मोदींना पूर्ण कल्पना होती. म्हणून त्यांनी उपवास करून  सर्वोच्च न्यायालयात त्यांना मिळालेल्या विजयाची अभिव्यक्ती केली, असे दिसते. २००२ सालात गुजरातमध्ये दंगली झाल्या. त्यात मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाली....
स्पेक्ट्रम घोटाळ्यातील  राजा आणि रावण!

स्पेक्ट्रम घोटाळ्यातील राजा आणि रावण!

Author : स्पेक्ट्रम घोटाळ्यातील  राजा आणि रावण!•दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी   ‘मृत्युंजय’ या गाजलेल्या कादंबरीत पहिल्याच प्रकरणातील पहिल्या पृष्ठावर  म्हटले आहे, ‘जेव्हा हाडामांसाची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागत.’ यात किंचित बदल करून म्हणावं लागेल, उच्चपदांवर  बसलेले  जेव्हा  अबोल होतात, निष्प्राण अशा कागदी दस्तावेजांना बोलावं लागतं.  स्पेक्ट्रम घोटाळ्यावर पंतप्रधान, गृहमंत्री मौन पाळत असताना, अर्थमंत्री प्रणव मुखर्जींचे चार वर्षांपूर्वींचे एक पत्र बोलू लागले आहे.     ‘अति गोपनीय.’ एका बंद लखोट्यावर हे दोन शब्द  लिहून अर्थमंत्री प्रणवकुमार  मुखर्जी...